शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
3
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
4
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
5
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
6
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
7
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
8
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
9
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
10
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
11
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
12
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
13
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
14
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
15
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
16
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
17
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
18
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
19
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
20
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
Daily Top 2Weekly Top 5

गडचिराेली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने ग्राहकांचा विश्वास जिंकला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2022 05:00 IST

दुर्गम भागातील नागरिक गावाला गेल्यास ते घराला कुलूप लावले तरी त्याची चावी शेजाऱ्याकडे देतात व घराकडे लक्ष ठेवण्यास सांगतात. एवढा एकमेकांबाबत विश्वास नागरिकांमध्ये आहे. हा स्वभाव टिकवून ठेवण्याची गरज आहे. जिल्हा बँक आधुनिक तंत्रज्ञान व डिजिटल साधनांचा जास्तीत जास्त वापर करून ग्राहकांची कामे सुसह्य हाेतील, याकडे लक्ष देत आहे. डिजिटल साधनांच्या वापराबराेबरच सायबर क्राईमचे धाेके वाढले आहेत.

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : राज्यात सहकार चळवळीची अतिशय वाईट अवस्था आहे. अशा स्थितीत गडचिराेली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची स्थिती अतिशय मजबूत आहे. ही बँक  सहकारी चळवळीला अपवाद आहे. या बॅँकेने नाबार्ड व ग्राहकांचा विश्वास जिंकला आहे. त्यामुळे ग्राहक या बँकेसाेबत जाेडून आहे, असे प्रतिपादन गाेंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डाॅ. प्रशांत बाेकारे यांनी केले. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभागृहात ५ एप्रिल राेजी क्यूआर काेड सेवेचा शुभारंभ डाॅ. बाेकारे यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी ते मार्गदर्शन करीत हाेते. या कार्यक्रमाला बँकेचे ज्येष्ठ संचालक अरविंद पाेरेड्डीवार, अध्यक्ष प्रंचित पाेरेड्डीवार, उपाध्यक्ष श्रीहरी भंडारीवार, मानद सचिव अनंत साळवे, बँकेचे सीईओ सतीश आयलवार आदी मान्यवर उपस्थित हाेते. पुढे बाेलताना डाॅ. बाेकारे म्हणाले, खासगी व राष्ट्रीयीकृत बँकांना मात देईल, अशा सेवा जिल्हा बँकेमार्फत दिल्या जात आहेत. बँका अडचणीत आहेत. अशा स्थितीत गडचिराेली जिल्हा बँकेची स्थिती मजबूत आहे. ही अपवादात्मक स्थिती आहे. खासगी बँका सामान्यांसाठी काम करीत नाही. मात्र जिल्हा बँक दुर्गम व ग्रामीण भागातील नागरिकांना सेवा देण्याचे काम करीत आहे, असे प्रतिपादन डाॅ. बाेकारे यांनी केले. बँकेचे अध्यक्ष प्रंचित पाेरेड्डीवार यांनी मार्गदर्शन करताना जिल्ह्यातील सामान्य ग्राहक लक्षात घेउन जिल्हा बॅंकेचे धाेरण आखले जाते. जिल्ह्यातील नागरिक प्रामाणिक व विनम्र आहेत. त्यांच्या सहकार्यामुळेच जिल्हा बँक प्रगती करीत आहे, असे  मार्गदर्शन  केले.प्रास्ताविकातून सीईओ सतीश आयलवार यांनी बँकेच्या स्थितीबाबतची माहिती दिली. कार्यक्रमाला जिल्हाभरातील जवळपास १०० व्यापारी उपस्थित हाेते.

 संस्कृती व स्वभाव टिकविण्याची  गरज- अरविंद पाेरेड्डीवार दुर्गम भागातील नागरिक गावाला गेल्यास ते घराला कुलूप लावले तरी त्याची चावी शेजाऱ्याकडे देतात व घराकडे लक्ष ठेवण्यास सांगतात. एवढा एकमेकांबाबत विश्वास नागरिकांमध्ये आहे. हा स्वभाव टिकवून ठेवण्याची गरज आहे. जिल्हा बँक आधुनिक तंत्रज्ञान व डिजिटल साधनांचा जास्तीत जास्त वापर करून ग्राहकांची कामे सुसह्य हाेतील, याकडे लक्ष देत आहे. डिजिटल साधनांच्या वापराबराेबरच सायबर क्राईमचे धाेके वाढले आहेत. याकडे ग्राहकांनी लक्ष द्यावे, असे मार्गदर्शन बँकेचे ज्येष्ठ संचालक अरविंद पाेरेड्डीवार यांनी केले.

क्यूआर काेडचे फायदे 

व्यापाऱ्यांसाठी क्यूआर काेड अतिशय फायद्याचा आहे. संबंधित खात्याचा क्यूआर काेड असल्यास बँक खाते क्रमांक सांगण्याची गरज नाही. संबंधित क्यूआर काेड ग्राहकाने स्कॅन केल्यानंतर थेट व्यापाऱ्याच्या खात्यात पैसे पाठविता येतात. त्यामुळे व्यापाऱ्याचा श्रम, वेळ वाचण्यास फार माेठी मदत हाेते.

 

टॅग्स :bankबँक