शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
2
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
3
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
4
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
5
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
6
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
7
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
8
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
9
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
10
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
11
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
12
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
13
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
14
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
15
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
16
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
17
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
18
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
19
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
20
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
Daily Top 2Weekly Top 5

सरपंचपदाचा तिढा न सुटल्याने भावी सरपंच संभ्रमात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 05:10 IST

देसाईगंज : तालुक्यातील देसाईगंज पंचायत समितीअंतर्गत येणाऱ्या ग्रामपंचायतींची १५ जानेवारी रोजी पार पडलेल्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी जोरदार ...

देसाईगंज : तालुक्यातील देसाईगंज पंचायत समितीअंतर्गत येणाऱ्या ग्रामपंचायतींची १५ जानेवारी रोजी पार पडलेल्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी जोरदार मुसंडी मारत जवळपास १७ ही ग्रामपंचायतींत सत्ता स्थापण्याजोगे स्पष्ट बहुमत मिळविल्याचे दिसून येते. असे असले तरी सरपंचपदाच्या आरक्षणाची सोडत पुढे ढकलण्यात आली असल्याने सरपंचपदाचा दावेदार म्हणून पुढे येण्यासाठी आपसातच जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे.

नेमकी माळ कुणाच्या गळ्यात हे सरपंचपदाच्या सोडतीनंतरच स्पष्ट होणार असल्याने या सोडतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र, सरपंच होण्याची स्वप्न रंगवणाऱ्यांची चांगलीच गोची झाली असून गुडघ्याला बाशिंग बांधून असलेले मात्र, यामुळे संभ्रमात सापडले आहेत. देसाईगंज पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या १७ ग्रामपंचायतींच्या एकूण ५९ प्रभागांतील १६१ उमेदवारांसाठी घेण्यात आलेल्या सार्वत्रिक निवडणुकीत २६ उमेदवार आधीच बिनविरोध निवडून आले होते. यात तब्बल २१ महिला तर ५ पुरुष उमेदवारांचा समावेश होता. दरम्यान, १३५ उमेदवारांसाठी निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतलेल्या तब्बल ३१४ उमेदवारांपैकी रथी महारथींना जबर धक्का देत अनेक नवखे उमेदवार निवडून आले आहेत. अशातच राजकीय पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकारी, गावातील प्रतिष्ठित नागरिकांनी गावविकासाच्या दृष्टिकोनातून सरपंचपदी योग्य उमेदवाराची निवड होण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू केली. असे असले तरी सरपंचपदाच्या सोडतीशिवाय ठोस निर्णय घेणे शक्यच नसल्याने पदावर शिक्कामोर्तब करणे अद्यापतरी शक्य होऊ शकले नाही. देसाईगंज तालुक्याच्या अनेक गावांत अनुभवी व नवखे उमेदवारांना निवडून देण्यात आले असले तरी काहींची पार्श्वभूमी पाहता जबाबदारीचे पद सोपविताना या पदावर चुकीच्या व्यक्तीची निवड होऊ नये, यासाठीही वरिष्ठांकडून प्रयत्न करण्यात येत आहेत.

बाॅक्स...

महिला उमेदवारांनाही मिळणार संधी

अनेक गावांत चुकीच्या व्यक्तीच्या हातात पद जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे तब्बल ८६ महिला उमेदवार व ७५ पुरुष उमेदवारांची १७ सरपंचपदी निवड होणेच असल्याने व सद्य:स्थितीत महाविकास आघाडी समर्पित ग्रामविकास परिवर्तन पॅनलच्या उमेदवारांचीच भाऊगर्दी झाली असल्याने आरक्षणानुसार सरपंच निवडताना तो गावासाठी कलंक तर ठरणार नाही ना? याचीही खबरदारी घ्यावीच लागणार आहे.

तथापि, पदाच्या सोडतीचा चेंडू सध्यातरी सोडतीच्या कोर्टात असल्याने लागलेल्या निकालावरून १७ ही ग्रामपंचायती महाविकास आघाडीच्या ताब्यात जाणार हे जवळपास स्पष्ट असले तरी दरम्यान घोडेबाजारही होण्याची शक्यता नाकारता येत नाही.