Fund for development work | विकास कामांसाठी निधी द्या
विकास कामांसाठी निधी द्या

ठळक मुद्देमुख्यमंत्र्यांकडे मागणी : जेसा मोटवानी यांनी दिले निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्क
देसाईगंज : शेवटच्या टोकावर असलेला गडचिरोली जिल्हा विकासात मागे राहिला आहे. या जिल्ह्याचा विकास करण्यासाठी प्राधान्याने निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी देसाईगंजचे माजी नगराध्यक्ष तथा विदर्भ सिंधी सेवा संघम नागपूरचे अध्यक्ष जेसा मोटवानी यांनी मुख्यमंत्रीउद्धव ठाकरे यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
देसाईगंज येथे गडचिरोली जिल्ह्यातील एकमेव रेल्वेस्थानक आहे. मात्र या ठिकाणी एमआयडीसी नाही. पशुसंवर्धन विभागाची जवळपास ९०० एकर जागा रिकामी पडून आहे. ही जागा एमआयडीसीला दिल्यास या ठिकाणी उद्योग उभारणे शक्य होईल. त्यामुळे रोजगाराची समस्या दूर होण्यास मदत होईल. गडचिरोली जिल्ह्यात वनांवर आधारित मोठ्या प्रमाणात कच्चा माल तयार होतो. त्यावर आधारित अनेक लहान, मोठे उद्योग स्थापन करून बचत गटांना स्वावलंबी करणे शक्य होईल. आॅक्टोबर, नोव्हेंबर महिन्यात झालेल्या पावसाने धान उत्पादकांचे मोठे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे कर्ज सरसकट माफ करावे, देसाईगंज-गडचिरोली रेल्वे मार्गाच्या कामाला गती द्यावी.
देसाईगंज नगर परिषदेअंतर्गत येणाºया नैनपूर वॉर्डातील तलावाचे सौंदर्यीकरण करावे, मागील ७० वर्षांपासून सिंधी बांधव देसाईगंजात वास्तव्यास आहेत, त्यांना व इतरांना पट्टे द्यावे, अशी मागणी मोटवानी यांनी निवेदनातून केली.
यावेळी त्यांनी इतरही विषयांवर मुख्यमंत्री ठाकरे यांच्यासोबत चर्चा केली.

Web Title: Fund for development work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.