शहरं
Join us  
Trending Stories
1
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
2
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
3
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
4
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
5
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
6
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
7
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
8
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
9
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
10
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
11
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
12
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
13
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
14
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
15
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
16
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
17
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
18
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
19
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
20
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

कुरखेडात ७.४६ लाखांचा सुगंधित तंबाखू जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2022 05:00 IST

प्रतिबंधित सुगंधित तंबाखूची वाहतूक होत असल्याची माहिती कुरखेडा पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी रात्री ९.३० वाजताच्या दरम्यान नाक्यावर सापळा रचला. यावेळी छत्तीसगड वरून कोरची-कुरखेडा मार्गे एक मिनी ट्रक (सीजी ०८, बी १७७३) आणि पीकअप कार (एमएच ३३ टी २३७२) संशयितरीत्या येताना दिसून आले. या वाहनांना थांबवत झडती घेतली असता त्या वाहनात प्रतिबंधित सुगंधित तंबाखूचा साठा दिसून आला. त्याची एकूण किंमत ७ लाख ४६ हजार आहे.

लाेकमत न्यूज नेटवर्ककुरखेडा : छत्तीसगड राज्यातून आरमोरी तालुक्यात येणारा प्रतिबंधित सुगंधित तंबाखू कुरखेडा पोलिसांनी गोठणगाव नाक्यावर सापळा रचून पकडला. यात दोन वाहनांसह दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आली. ही कारवाई मंगळवारी रात्री ९.३० वाजताच्या दरम्यान करण्यात आली. यात जप्त केलेल्या सुगंधित तंबाखूची किंमत ७ लाख ४६ हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.छत्तीसगड कडून येणाऱ्या अवैध तंबाखूची शहराचा बायपास असलेला गोठणगाव नाक्याकडून जिल्ह्यातील अन्य तालुक्यात प्रतिबंधित सुगंधित तंबाखूची वाहतूक होत असल्याची माहिती कुरखेडा पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी रात्री ९.३० वाजताच्या दरम्यान नाक्यावर सापळा रचला. यावेळी छत्तीसगड वरून कोरची-कुरखेडा मार्गे एक मिनी ट्रक (सीजी ०८, बी १७७३) आणि पीकअप कार (एमएच ३३ टी २३७२) संशयितरीत्या येताना दिसून आले. या वाहनांना थांबवत झडती घेतली असता त्या वाहनात प्रतिबंधित सुगंधित तंबाखूचा साठा दिसून आला. त्याची एकूण किंमत ७ लाख ४६ हजार आहे. दोन्ही वाहन जप्त करण्यात आले असून आरोपी साधू गावडे रा. बोगाटोला जि. राजनांदगाव (छत्तीसगड) व सलीम माखानी याच्याविरोधात भादंवि २७२, २७३, १८८, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी साहील झरकर, ठाणेदार अभय आष्टेकर यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक नारायण शिंदे, शिपाई ललीत जांभूळकर, नितीन नैताम, रूपेश काळबांधे यांच्या चमूने केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नारायण शिंदे करीत आहेत.

 

टॅग्स :Tobacco Banतंबाखू बंदीPoliceपोलिस