शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
5
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
6
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
7
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
8
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
9
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
10
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
11
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
13
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
14
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
15
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
16
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
17
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
18
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
19
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
20
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
Daily Top 2Weekly Top 5

चार हजारांवर घरकूल अपूर्ण

By admin | Updated: December 28, 2016 02:58 IST

इंदिरा आवास योजनेंतर्गत शासनाने सन २०१५-१६ या वर्षात गडचिरोली जिल्ह्याला एकूण ४ हजार ८६८ घरकूल बांधण्याचे उद्दिष्ट दिले.

इंदिरा आवास योजना : जिल्ह्यात बांधकामाची गती मंदावलेलीच गडचिरोली : इंदिरा आवास योजनेंतर्गत शासनाने सन २०१५-१६ या वर्षात गडचिरोली जिल्ह्याला एकूण ४ हजार ८६८ घरकूल बांधण्याचे उद्दिष्ट दिले. तेवढेच घरकूल मंजूरही करण्यात आले. मात्र आतापर्यंत केवळ ७५० घरकुलांचे काम पूर्ण झाले असून अद्यापही ४ हजार ११८ घरकुलांचे काम अपूर्ण स्थितीत आहेत. इंदिरा आवास योजनेंतर्गत गेल्या चार-पाच वर्षांपासून गडचिरोली जिल्ह्यात घरकूल मंजूर केले जात आहेत. सदर घरकूल बांधकामासाठी शासनाकडून एक लाख रूपयांचे अनुदान लाभार्थ्यांना दिले जाते. घर बांधकामाची स्थिती पाहून टप्प्याटप्प्याने लाभार्थ्यांना घरकुलाच्या अनुदानाची रक्कम अदा केली जाते. घरकूल बांधकामाच्या प्रक्रियेवर जिल्हा विकास ग्रामीण यंत्रणा व पंचायत समिती प्रशासन लक्ष ठेवून असते. गरीब कुटुंबांना निवासासाठी हक्काचे घर मिळावे, या उद्देशाने शासनाने इंदिरा आवास योजना कार्यान्वित केली. मात्र लाभार्थ्यांमध्ये उदासिनता असल्याने गडचिरोली जिल्ह्याच्या ग्रामीण व दुर्गम भागात घरकूल बांधकामात गती नसल्याचे दिसून येते. सन २०१५-१६ या वर्षात इंदिरा आवास योजनेंतर्गत अहेरी तालुक्यातील गावांमध्ये १ हजार ९३, आरमोरी २११, भामरागड १५१, चामोर्शी ७७८, देसाईगंज ७६, धानोरा ४२३, एटापल्ली १५२, गडचिरोली ७०३, कोरची २७३, कुरखेडा ४४०, मुलचेरा २९० व सिरोंचा तालुक्यात २७८ घरकूल उद्दिष्टानुसार मंजूर करण्यात आले. यापैकी केवळ ७५० घरकुलांचे काम पूर्ण झाले असून याची टक्केवारी १४.५४ आहे. काही महिने लाभार्थ्यांपुढे बांधकाम साहित्याची अडचण होती. (स्थानिक प्रतिनिधी) जुने घरकूलही अर्धवट स्थितीत सन २०१२-१३ व २०१३-१४ या आर्थिक वर्षात गडचिरोली जिल्ह्यात इंदिरा आवास योजनेंतर्गत हजारो घरकूल मंजूर करण्यात आले. यापैकी निम्म्या घरकुलाचे बांधकाम अद्यापही अर्धवट स्थितीत असल्याचे दिसून येते. सन २०१२-१३ ते २०१५-१६ या तीन वर्षात केंवळ १० हजार ५७० घरकुलांचे काम पूर्ण करण्यात आले आहे. सदर तीन वर्षात एकूण १६ हजार ९२७ घरकूल मंजूर करण्यात आले. या कामांवर कोट्यवधी रूपयांचा खर्चही झाला आहे.