शहरं
Join us  
Trending Stories
1
बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
3
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
4
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
5
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
6
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
7
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
8
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
9
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
10
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
11
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
12
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
13
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
14
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
15
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
16
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
17
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
18
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
19
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
20
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
Daily Top 2Weekly Top 5

रेती चोरी करणारे पाच ट्रॅक्टर जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2020 06:00 IST

रेती तस्करांवर कारवाई करण्यासाठी यापूर्वी केवळ मंडळ कार्यालयापुरतेच पथक तयार करण्यात आले होते. या पथकाला त्यांच्याच क्षेत्रात कारवाई करण्याचे अधिकार देण्यात आले होते. त्यामुळे दुसऱ्या मंडळात जाऊन कारवाई करणे अशक्य होत होते.

ठळक मुद्देस्वतंत्र पथकाची निर्मिती । कठाणी नदीच्या बोदली रेतीघाटावरील कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : कठाणी नदीच्या बोदली रेती घाटातून रेतीची तस्करी करणारे पाच ट्रॅक्टर महसूल विभागाच्या पथकाने शनिवारी सकाळी सात वाजता जप्त केले.बोदली रेती घाटातून मागील दोन महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात रेतीची अवैध वाहतूक केली जात होती. सदर रेती गडचिरोली शहरात आणून चार हजार रूपये प्रती ब्रॉस दराने विकली जात होती. याबाबत गडचिरोलीचे उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांच्याकडे तक्रारी वाढल्या होत्या.रेती तस्करांवर कारवाई करण्यासाठी यापूर्वी केवळ मंडळ कार्यालयापुरतेच पथक तयार करण्यात आले होते. या पथकाला त्यांच्याच क्षेत्रात कारवाई करण्याचे अधिकार देण्यात आले होते. त्यामुळे दुसऱ्या मंडळात जाऊन कारवाई करणे अशक्य होत होते.यावर उपाय म्हणून तालुकास्तरावरील पथकाचे गठण करण्यात आले. या पथकाला संपूर्ण गडचिरोली तालुक्यात कारवाईचे अधिकार देण्यात आले आहेत.या पथकाने शनिवारी सकाळी सात वाजता बोदली घाटावर धाड टाकली. यामध्ये सुमारे ९ ट्रॅक्टर रेती भरताना आढळून आले. त्यापैकी चार ट्रॅक्टर पळून जाण्यात यशस्वी झाले. पाच ट्रॅक्टर जप्त करून ते तहसील कार्यालय गडचिरोली येथे जमा करण्यात आले आहेत. सदर ट्रॅक्टर श्यामराव गणपत भुरले, सुशील दिवाकर कोठारे, सुशांत सदाशिव आंबोरकर, रमेश सुकमाजी भांडेकर व पंकज नैताम यांच्या मालकीचे आहेत. प्रत्येक ट्रॅक्टरवर सुमारे १ लाख १३ हजार रुपयांचा दंड ठोठावला जाणार आहे. त्यामुळे त्याच्यावर अतिरिक्त दंड आकारला जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे.सध्या तयार केलेल्या पथकाला संपूर्ण तालुक्यात कारवाई करण्याचे अधिकार दिले आहेत. तसेच स्वतंत्र वाहनही उपलब्ध करून दिले आहे. हे पथक आता संपूर्ण तालुका पिंजून काढणार आहे. त्यामुळे आणखी कारवाया वाढण्याची शक्यता आहे.

टॅग्स :sandवाळू