शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
4
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
5
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
6
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
7
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
8
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
9
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
10
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
11
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
12
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
13
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
14
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
15
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
16
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
17
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
18
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
19
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
20
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
Daily Top 2Weekly Top 5

एचआयव्ही पाॅझिटीव्ह पाच महिलांनी दिला निगेटीव्ह बाळांना जन्म

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2021 04:32 IST

एचआयव्हीचा संसर्ग हाेऊ नये, यासाठी शहरी व ग्रामीण भागातील आराेग्य यंत्रणेमार्फत काळजी घेतली जात आहे. गर्भवती महिलांची दुसऱ्या किंवा ...

एचआयव्हीचा संसर्ग हाेऊ नये, यासाठी शहरी व ग्रामीण भागातील आराेग्य यंत्रणेमार्फत काळजी घेतली जात आहे. गर्भवती महिलांची दुसऱ्या किंवा तिसऱ्या महिन्यात एचआयव्ही चाचणी केली जाते. एचआयव्हीसह इतर चाचण्या केल्यानंतर गर्भवती महिलांचे गर्भवती माता कार्ड तयार केले जाते. प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार सन२०१८-१९ या वर्षात जिल्हाभरात एकूण २० हजार ७६६ गर्भवती मातांची एचआयव्ही एड्स चाचणी करण्यात आली. यामध्ये चार माता एचआयव्ही पाॅझिटीव्ह आढळून आल्या. मात्र या चारही मातांनी निगेटीव्ह बाळांना जन्म दिला.

सन २०१९-२० या वर्षात एकूण २० हजार २३२ गर्भवती महिलांची एचआयव्ही तपासणी करण्यात आली. यात केवळ एक गर्भवती माता पाॅझिटीव्ह आढळून आली. या मातेने सुद्धा निगेटीव्ह बाळाला जन्म दिला. सन २०२१-२१ या चालू वर्षात एकूण १५ हजार १७४ गर्भवती महिलांची एचआयव्ही तपासणी करण्यात आली. यात डिसेंबर २०२० अखेरपर्यंत केवळ एक गर्भवती माता पाॅझिटीव्ह आढळून आली. या महिलेवर औषधाेपचार सुरू असून या गर्भवती मातेची ऑक्टाेबर महिन्यात प्रसूती हाेणार आहे.

बाॅक्स....

गडचिराेलीबाहेरील सहा पाॅझिटीव्ह गर्भवतींची प्रसुती

गडचिराेली येथील जिल्हा महिला व बाल रुग्णालयात लगतच्या चंद्रपूर व गाेंदिया जिल्ह्यातील रुग्ण माेठ्या संख्येने औषधाेपचारासाठी दाखल हाेतात. विशेष म्हणजे प्रसूतीसाठी वेळेवर गर्भवती महिला या रुग्णालयात येतात. जानेवारी ते डिसेंबर २०२० या कालावधीत गाेंदिया व चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक गर्भवती महिला गडचिराेलीच्या महिला व बाल रुग्णालयात दाखल झाल्यावर त्याची प्रसूती झाली. यापैकी जिल्हाबाहेरील सहा गर्भवती महिला एचआयव्ही पाॅझिटीव्ह आढळून आले. त्यांनी गडचिराेली येथे निगेटीव्ह बाळांना जन्म दिला.

बाॅक्स.....

अशी घेतली जाते काळजी

शासनाच्या निर्देशानुसार गडचिराेली जिल्ह्यात एड्स नियंत्रण कार्यक्रमाची जनजागृती व प्रभावी अंमलबजावणी आराेग्य यंत्रणेच्या वतीने केली जात आहे. गर्भवती महिला एचआयव्ही पाॅझिटीव्ह आढळून आल्यानंतर त्या महिलांचे समुपदेशन केले जाते. त्यानंतर विविध सेवा माेफत उपलब्ध करून दिल्या जात आहेत. गर्भातील बाळाला एचआयव्हीचा संसर्ग हाेऊ नये, यासाठी अतिशय काळजीपूर्वक औषधाेपचार केला जाताे. पहिल्या दीड महिन्यानंतर गर्भवती महिलांची एचआयव्ही टेस्ट केली जाते. त्यानंतर सहा महिन्यांनी टेस्ट केली जाते, त्यानंतर काही महिन्यांतन टेस्ट केली जाते.