शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यातील सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये बॉम्बसदृश्य वस्तू; रुग्ण-नागरिकांमध्ये खळबळ अन् घबराट
2
‘देवाभाऊं’चा एक फोन अन् तत्काळ प्रश्न सुटला; CM फडणवीसांनी अधिकाऱ्यांना सुनावलं, नेमकं काय घडलं?
3
प्रवाशांना मोठा दिलासा, विदर्भातून गोव्याला जाणारी ट्रेन नियमित केली; नाशिक-मुंबईकरांना लाभ!
4
आकाशात संकट! एअर इंडियाच्या अनेक आंतरराष्ट्रीय उड्डाणांना 'ब्रेक'; जगभरात ६ हजारांहून अधिक उड्डाणं 'लेट' 
5
IPL 2026: KKR विरुद्ध खाते उघडल्यावर किंग कोहलीचं 'शतकी सेलिब्रेशन'; RCB चे चाहतेही झाले शॉक (VIDEO)
6
अमूलनंतर आता मदर डेअरीचाही दणका! दूध महागलं, म्हशीच्या दुधापासून फुल क्रीमपर्यंत नवे दर जाहीर; पहा संपूर्ण यादी
7
RCB vs KKR : मुंबईकर रघुवंशीची तुफान फटकेबाजी; किंग कोहलीनंही टाळ्या वाजवत दिली दाद (VIDEO)
8
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून EV वाहनाचा वापर सुरू, ताफ्यातील वाहनेही केली कमी
9
महागाईचा झटका, अमूलने दुधाचा भाव वाढवला! कधीपासून लागू होणार नवे दर? जाणून घ्या 
10
IPL All Time Record : किंग कोहलीनं रचला इतिहास; MS धोनीचा महारेकॉर्ड मोडला
11
हरियाणातील स्थानिक निवडणुकीत BJPचा दबदबा; PM मोदींनी मानले जनतेचे आभार, म्हणाले...
12
२० कोच ‘वंदे भारत’ शानदार शो… १० दिवसात ४५ हजार प्रवाशांचा प्रवास, तुफान प्रतिसाद; पण कुठे?
13
खरा मित्र… रशियाने पुन्हा सिद्ध केले, गॅरंटी दिली, “काही होऊ दे, भारताचे नुकसान करणार नाही”
14
“नेपाळ-बांगलादेशप्रमाणे GenZ ने भारतातही रस्त्यावर उतरायला हवे”; केजरीवाल असे का म्हणाले?
15
“जो सामील असेल, त्यावर कारवाई व्हायला हवी”; NEET पेपर लीक प्रकरणी CM फडणवीसांनी केले स्पष्ट
16
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
17
PBKS vs MI: "विश्वास ठेवा, ट्रॉफी जिंकून दाखवू"; पंजाबच्या पराभवाच्या मालिकेनंतर प्रभसिमरनची चाहत्यांना भावनिक साद
18
RCB vs KKR : पावसाच्या बॅटिंगचा कुणाला बसणार फटका? कट-ऑफ टाइमचा नियम काय?
19
आशिष नेहरा वर्षाला किती कमवतो? GT चा कोच म्हणून किती मानधन घेतो? आकडा वाचून थक्क व्हाल
20
"आता मुस्लिमांमध्ये राष्ट्रवादी नेता सापडणे कठीण...!"; दत्तात्रेय होसबळे यांचं मोठं विधान, कारणही सांगितलं!
Daily Top 2Weekly Top 5

परिश्रमातून फुलविले बालोद्यान

By admin | Updated: July 16, 2015 02:11 IST

चामोर्शी पंचायत समिती अंतर्गत लखमापूर बोरी येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक केंद्र शाळेच्या आवारात मुख्याध्यापक, ...

लखमापूर बोरी शाळेचा उपक्रम : विविध वृक्षांची केली लागवड
लखमापूर बोरी : चामोर्शी पंचायत समिती अंतर्गत लखमापूर बोरी येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक केंद्र शाळेच्या आवारात मुख्याध्यापक, शिक्षक व विद्यार्थ्यांनी परिश्रमातून विविध जातीच्या झाडांची लागवड करून बालोद्यान फुलविले आहे.
लखमापूर बोरी या जि.प. शाळेत इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतच्या शिक्षणाची सोय असून या शाळेत मुख्याध्यापकांसह आठ शिक्षक व चार शिक्षीका कार्यरत आहेत. शाळेला तीन एकर धानपिकाची शेतजमीन आहे. या शाळेत व्यायामशाळा, वाचनालय आदी सुविधा आहे. येथील मुख्याध्यापक व शिक्षकांनी इच्छाशक्तीच्या जोरावर विद्यार्थ्यांच्या सहकार्याने शाळेच्या परिसरात प्रशस्त बालोद्यान फुलविले आहे. दोन महिन्यांपूर्वी नाशिक येथील शिक्षण विभागाचे संचालक, गडचिरोली जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संपदा मेहता, जि.प. अध्यक्ष प्रशांत कुत्तरमारे, जीवन नाट यांनी भेट देऊन शाळेची पाहणी केली. शिक्षक व विद्यार्थ्यांच्या पुढाकारातून शाळेत फुलविण्यात आलेले बालोद्यानाबाबत या सर्वांनी शाळेचे कौतुक केले होते.
शाळेतील बालोद्यानाकरिता येथे पाणी पुरवठ्यासाठी पाईपलाईन टाकण्यात आली आहे. तसेच ठीबक व तुषार सिंचनाची व्यवस्था केली आहे. भर उन्हाळ्यातही या शाळेतील विविध प्रजातीच्या झाडाने फुललेले बालोद्यान हिरवेगार दिसत असते.
सानेगुरूजी स्वच्छ शाळेच्या पुरस्काराची मानकरी
लखमापूर बोरी येथील जि.प. उच्च प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांच्या सहकार्यातून रोज परिसर स्वच्छता करण्यात येते. शाळेतील बालोद्यान, परिसर स्वच्छता व गुणवत्ता पाहून या शाळेला सानेगुरूजी स्वच्छ शाळा हा विभागीयस्तरावरील पुरस्कार प्राप्त झाला आहे. या पुरस्कारामुळे जिल्ह्यासह नागपूर विभागात लखमापूर बोरी गावाचा नावलौकिक झाला आहे.