शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

सरकारविरोधात २४ ला ‘जेल भरो’ आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2021 04:25 IST

अहेरी : महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणा व निष्काळजीपणामुळे सर्वसामान्य जनतेला अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. ...

अहेरी : महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणा व निष्काळजीपणामुळे सर्वसामान्य जनतेला अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. या निष्क्रिय सरकारला जागे करण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने २४ फेब्रुवारी रोजी संपूर्ण महाराष्ट्रात जेल भरो आंदोलन करण्यात येणार आहे. त्याच अनुषंगाने अहेरी विधानसभा क्षेत्रात २४ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता खासदार अशोक नेते यांच्या नेतृत्वाखाली जेल भरो आंदोलन करण्यात येणार आहे.

लॉकडाऊनच्या काळात सर्वसामान्य नागरिक व शेतकऱ्यांना भरमसाट वीज बिले पाठवून त्यांच्या कठीण परिस्थितीशी खेळणाऱ्या सरकारला धडा शिकविणे आवश्यक आहे. लॉकडाऊनच्या काळात सर्वसामान्य जनतेच्या हाताला काम नसताना महागाई वाढविली. शेतकऱ्यांना त्रास देणाऱ्या नाकर्त्या सरकारला जागे करून त्याला धडा शिकविण्यासाठी २४ फेब्रुवारी रोजी संपूर्ण महाराष्ट्रात जेल भरो आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती खासदार अशोक नेते यांनी दिली. आलापल्ली विश्रामगृहात आयोजित अहेरी विधानसभा क्षेत्राच्या बैठकीत मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून भाजपचे जिल्हा संघटन महामंत्री रवींद्र ओल्लालवार, अनुसूचित जनजाती मोर्चाचे प्रदेश सदस्य संदीप कोरेत, भाजपचे जिल्हा सचिव विनोद आकनपल्लीवार, ज्येष्ठ नेते दामोदरजी अरगेला, अहेरी तालुकाध्यक्ष रवींद्र नेलकुद्री, अहेरी शहराध्यक्ष मुकेश नामेवार, तालुका महामंत्री मद्दीवार, तालुका महामंत्री पोशालू चुधरी, एटापल्लीचे भाजयुमोचे निखिल गादेवार तसेच भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.