शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात १४ उमेदवारी अर्ज दाखल

By admin | Updated: September 27, 2014 01:42 IST

गडचिरोली जिल्ह्याच्या तीन विधानसभा मतदार संघात शुक्रवारी १४ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज शक्ती प्रदर्शन करून दाखल केले.

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्याच्या तीन विधानसभा मतदार संघात शुक्रवारी १४ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज शक्ती प्रदर्शन करून दाखल केले. आज उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्या प्रमुख उमेदवारांमध्ये अहेरी विधानसभा क्षेत्रातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून धर्मरावबाबा आत्राम, आरमोरी विधानसभा क्षेत्रात भाराकाँकडून विद्यमान आमदार आनंदराव गेडाम, आरमोरी क्षेत्रातच शिवसेनेकडून माजी आमदार डॉ. रामकृष्ण मडावी यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. गडचिरोली विधानसभा मतदार संघात शुक्रवारी चार उमेदवारांचे चार अर्ज दाखल झाले. आरमोरी विधानसभा क्षेत्रात सात उमेदवारांचे नऊ अर्ज तर अहेरी विधानसभा क्षेत्रात तीन उमेदवारांचे सहा अर्ज दाखल करण्यात आले आहे. आरमोरी मतदार संघात आज बहुजन समाज पक्षाच्यावतीने नामदेव शिवराम कुमरे, भाजपच्यावतीने सयाम कुवर लोकेंद्र शहा राजे फस्तेमल शहा यांनी तर अपक्ष म्हणून मनेश्वर मारोती मडावी, जयनेंद्रसिंह बजरंगसिंह चंदेल, योगेश नामदेव गोनाडे, भाकपच्यावतीने हिरालाल येरमे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहे. गडचिरोली विधानसभा क्षेत्रातून भाजपच्यावतीने शंभुविधी देवीदास गेडाम, शिवसेनेच्यावतीने वासुदेव किसन शेडमाके यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. हिंदुस्थान जनता पार्टीच्यावतीने मोरेश्वर रामचंद्र किलनाके व भारिप बहुजन महासंघाच्यावतीने पुरूषोत्तम श्रावण गायकवाड यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. अहेरी विधानसभा क्षेत्रात भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकडून संतोष मलय्या आत्राम, राष्ट्रवादी काँग्रेसकडून माजी राज्यमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी अर्ज दाखल केले. शिवसेनेकडून रामसाय पोचा मडावी यांनी अर्ज दाखल केला आहे. आजही अनेक उमेदवारांनी अर्जांची खरेदी केली. तसेच अर्ज भरण्यासाठी नोटरीकडे गर्दी दिसून येत होती. उद्या निवडणुकीच्या अर्ज भरण्याची प्रक्रिया समाप्त होणार आहे. (जिल्हा प्रतिनिधी)