शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन वेळा कार बदलून रुपाली चाकणकर चौकशीला हजर, अशोक खरातप्रकरणी एसआयटीने केली प्रश्नांची सरबत्ती
2
शेतकऱ्याच्या कांद्याला मिळतात ५० पैसे, ग्राहक मोजतो २५ रुपये; उत्पादन खर्चही निघेना, शेतकऱ्यांचा आक्रोश
3
Iran US War Update: युद्धविराम मोठ्या संकटात ! मालवाहू जहाजाला आग, कुवेतवर ड्रोन हल्ला
4
विशेष लेख: अमित शाह यांच्या खेळीने ममता बॅनर्जी चारीमुंड्या चीत
5
तामिळनाडू 'विजय'पथावर! मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताच जनतेला दिले मोफत विजेचे गिफ्ट
6
सोनेखरेदी टाळा, पेट्रोल-डिझेलचा वापर कमी करा, 'वर्क फ्रॉम होम' सुरू करा; पंतप्रधान मोदींचे भारतीयांना आवाहन
7
"इराणचं हसणं आता कायमचं बंद होईल"; ट्रम्प यांचा थेट इशारा; ओबामांनी विमानाने पैसे दिल्याचा आरोप
8
RCB साठी जीव तोडून खेळला; मग MI च्या जखमेवर फुंकर घालत क्रुणाल म्हणाला, "तो काळ माझ्यासाठी…"
9
"आपल्याकडे परिस्थिती नियंत्रणात पण..."; मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं इंधन आणि गॅस बचतीचं आवाहन
10
IPL 2026 : ट्विस्टवर ट्विस्ट! शेवटच्या चेंडूवर RCB नं जिंकली मॅच; MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT
11
"...त्यामुळे, माझ्यासोबत येणंच उत्तम!"; पंतप्रधान मोदींची तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांना खास ऑफर; बघा नेमकं काय घडलं?
12
पुणे-नाशिक महामार्ग सलग दुसऱ्या दिवशी 'जाम'; लग्नसराई आणि विकेंडमुळे प्रवाशांचे प्रचंड हाल
13
"चर्चा म्हणजे शरणागती नाही!" इराणच्या राष्ट्राध्यक्षांचा अमेरिकेला थेट इशारा; मोज्तबा खामेनीही अ‍ॅक्शन मोडमध्ये!
14
कुटुंबासाठी धोकादायक ठरू शकतात 'या' ५ लोकप्रिय कार! क्रॅश टेस्टमध्ये केवळ ० ते १ रेटिंग; तुमची कार सुरक्षित आहे का?
15
"...तर ममता बॅनर्जी यांना जेलमध्ये जावे लागेल!" बंगाल पराभवानंतर का भडकले TMC चे निलंबित नेते रिजू दत्ता? साधला थेट निशाणा
16
उर्विल पटेलची विक्रमी खेळी! अशक्यप्राय लक्ष्याचा पाठलाग करत CSK नं LSG ला स्पर्धेबाहेर काढलं
17
IPL All Time Records : कमालीचा योगायोग! विराट-रोहितनं एकाच सामन्यात केली धोनीच्या विक्रमाशी बरोबरी
18
मातृदिनाचा दिवस काळरात्र ठरला! रील बनवण्याच्या नादात काळजाचे चार तुकडे हरपले; अमरावतीत शोककळा
19
Travel : मे महिन्याच्या उन्हात मिळेल डिसेंबरसारखी थंडी! 'या' ५ ठिकाणांना भेट देऊन सुट्टी करा कूल
20
सुवेंदू अधिकारी नसते तर ५,००० कार्यकर्त्यांची हत्या झाली असती; ममतांच्या प्रवक्त्याचा खळबळजनक दावा
Daily Top 2Weekly Top 5

वसतिगृह विद्यार्थ्यांचे जिल्हा कचेरीसमोर उपोषण

By admin | Updated: September 17, 2016 01:44 IST

आदिवासी विकास विभागाच्या गडचिरोली प्रकल्पांतर्गत वसतिगृहांमध्ये प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.

वाढीव कोट्यातून प्रवेश देण्याची मागणी : जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चेनंतर आंदोलन संपुष्टात
गडचिरोली : आदिवासी विकास विभागाच्या गडचिरोली प्रकल्पांतर्गत वसतिगृहांमध्ये प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. मात्र अनेक जुने विद्यार्थी प्रवेशापासून वंचित आहेत. वाढीव कोटा मंजूर करून विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात यावा, या मागणीसाठी आदिवासी विद्यार्थी संघाच्या बॅनरखाली आदिवासी वसतिगृहांमध्ये शेकडो विद्यार्थ्यांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण केले. जिल्हाधिकारी नायक यांच्याशी चर्चा झाल्यावर सकारात्मक आश्वासनानंतर विद्यार्थ्यांनी आपले उपोषण मागे घेतले.
जुन्या प्रवेशीत विद्यार्थ्यांना महाविद्यालयाने दिलेल्या बोनाफाईड सर्टिफीकेटच्या आधारावर कुठलीही आडकाठी न आणता वसतिगृहात प्रवेश देण्यात यावा, पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना ६५ टक्के जागांवर प्रवेश द्यावा, २०१३ ते २०१६ या तीन वर्षाच्या सत्रातील भारत सरकार शिष्यवृत्ती व परीक्षा शुल्क अदा करण्यात यावे, वसतिगृहात पाणी शुध्दीकरण यंत्र बसविण्यात यावे आदीसह विविध मागण्यांसाठी आविसचे जिल्हाध्यक्ष क्रांती केरामी यांच्या नेतृत्वात शहरातील आदिवासी वसतिगृहातील शेकडो विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे कूच करून कार्यालयासमोर आंदोलन सुरू केले. त्यानंतर पोलिसांच्या मध्यस्थीने आविसच्या शिष्टमंडळांना जिल्हाधिकारी कार्यालयात बोलाविण्यात आले. दरम्यान जिल्हाधिकारी ए. एस. आर. नायक यांना शिष्टमंडळाने मागण्यांचे निवेदन दिले. अनेक जुने विद्यार्थी वसतिगृह प्रवेशापासून वंचित असल्याने वाढीव कोटा मंजूर करून त्यांना प्रवेश देण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली. जिल्हाधिकारी नायक यांनी गडचिरोली प्रकल्पांतर्गत वसतिगृहात जेवढी प्रवेश क्षमता मंजूर आहे, तेवढे प्रवेश देण्यात आले आहेत. वाढीव कोट्याबाबतचा प्रस्ताव व तुमची मागणी शासनस्तरावर पाठविण्यात येईल. शासनाकडून मंजुरी मिळाल्यानंतर वाढीव कोट्यातून विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येईल. शिवाय येत्या १५ दिवसात वसतिगृहातील सर्व समस्या निकाली काढण्यात येईल, असे आश्वासन दिले. त्यानंतर १५ मिनिटांनी विद्यार्थ्यांनी आपले उपोषण मागे घेतले. या आंदोलनात गडचिरोलीतील आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थी, विद्यार्थिनी सहभागी झाल्या होत्या. (स्थानिक प्रतिनिधी)