शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

नक्षलग्रस्त भागातील विद्यार्थ्यांचा सत्कार

By admin | Updated: September 6, 2016 00:53 IST

नक्षल विरोधी अभियान नागपूर व मैत्री परिवार संस्था यांच्या वतीने महाराष्ट्र दर्शन सुर्वण जयंती सहलीत सहभागी झालेल्या...

नागपुरात कार्यक्रम : विशेष पोलीस महानिरीक्षक उपस्थितगडचिरोली : नक्षल विरोधी अभियान नागपूर व मैत्री परिवार संस्था यांच्या वतीने महाराष्ट्र दर्शन सुर्वण जयंती सहलीत सहभागी झालेल्या गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम भागातील विद्यार्थी व पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांचा सत्कार रविवारी नागपूर येथे करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रंचित पोरेड्डीवार होते. यावेळी विशेष अतिथी म्हणून नक्षल विरोधी अभियानाचे विशेष पोलीस महानिरिक्षक शिवाजी बोडखे, मैत्री परिवार संस्थेचे सचिव प्रमोद पेंडके, संजय नखाते, डॉ. नरेंद्र भुसारी आदी उपस्थित होते.याप्रसंगी विशेष पोलीस महानिरिक्षक शिवाजी बोडखे म्हणाले की, नक्षलवाद्यांच्या चुकीच्या आवाहनांना बळी न पडता शिक्षणाच्या माध्यमातून स्वत:चा व आपल्या गावाचा विकास करून सर्व समाजाचे विकासदूत बनावे, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी प्रंचित पोरेड्डीवार यांनी विद्यार्थ्यांनी संकुचितपणा न बाळगता जीवनाकडे सकारात्मक दृष्टीकोणातून बघावे, मनात आत्मविश्वास निर्माण करून स्वत:ची प्रगती केल्यास गडचिरोलीतील विद्यार्थी कुठेही मागे पडणार नाही, असे सांगितले. यावेळी दुर्गम भागातील विविध शाळांच्या ४३ मुले व ३८ मुली यांचा भेट वस्तू देऊन सत्कार करण्यात आला. गडचिरोली पोलिस दलातील अधिकारी सहायक पोलिस निरीक्षक डी. डब्लू. मंडलवार, नक्षल विरोधी अभियानाचे बी.डी. झिंगरे, पोलिस उपनिरीक्षक समु चौधरी, सहायक पोलिस उपनिरीक्षक पांडुरंग चाफले, दामोदर पदा, परिमल बाला, सचिन उसेंडी, फुला कुमोटी, शोभा खोब्रागडे, शैला आत्राम, परशुराम निमरड यांचाही सत्कार करण्यात आला.