उमेदवारांच्या भाग्याचा फैसला

By Admin | Updated: May 2, 2015 01:30 IST2015-05-02T01:30:50+5:302015-05-02T01:30:50+5:30

पहिल्या टप्प्यात २४ एप्रिल एप्रिल रोजी शुक्रवारला मतदान झालेल्या अहेरी, सिरोंचा व एटापल्ली तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या...

Fate of the candidates | उमेदवारांच्या भाग्याचा फैसला

उमेदवारांच्या भाग्याचा फैसला

गडचिरोली : पहिल्या टप्प्यात २४ एप्रिल एप्रिल रोजी शुक्रवारला मतदान झालेल्या अहेरी, सिरोंचा व एटापल्ली तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक व पोट निवडणुकीतील तसेच दुसऱ्या टप्प्यात ३० एप्रिल रोजी मतदान झालेल्या आठ तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीची मतमोजणी २ मे रोजी शनिवारला तालुका मुख्यालयाच्या ठिकाणी करण्यात येणार आहे. मतमोजणी प्रक्रियेसाठी प्रशासनाने तयारी पूर्ण केली आहे.
पहिल्या टप्प्यात अहेरी, एटापल्ली व सिरोंचा या तीन तालुक्यातील ५० ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची मतमोजणी होणार आहे. तसेच दुसऱ्या टप्प्यात ३० एप्रिल रोजी मतदान झालेल्या कोरची, कुरखेडा, देसाईगंज, आरमोरी, गडचिरोली, धानोरा, चामोर्शी, मुलचेरा आदी आठ तालुक्यातील ग्रामपंचयतीच्या निवडणुकीच्या मतदानाची मत मोजणी होणार आहे. (स्थानिक प्रतिनिधी)

Web Title: Fate of the candidates