शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
5
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
6
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
7
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
8
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
9
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
10
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
11
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
12
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
13
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
14
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
15
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
16
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
17
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
18
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
19
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
20
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
Daily Top 2Weekly Top 5

पुलाअभावी जीवघेणा प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2017 00:59 IST

सिरोंचा तालुक्याचा दुर्गम भाग म्हणून ओळख असलेल्या झिंगानूर परिसरातील कोपेला गावालगत असलेल्या नाल्यावर पूल नसल्याने पावसाळ्यात नाला भरून वाहत असतो.

ठळक मुद्देशासनाचे दुर्लक्ष : पावसाळ्यात तीन महिने तुटतो कोपेला परिसरातील गावाचा संपर्क

लोकमत न्यूज नेटवर्कझिंगानूर : सिरोंचा तालुक्याचा दुर्गम भाग म्हणून ओळख असलेल्या झिंगानूर परिसरातील कोपेला गावालगत असलेल्या नाल्यावर पूल नसल्याने पावसाळ्यात नाला भरून वाहत असतो. परिणामी जवळपास तीन महिने या परिसरातील गावांचा तालुक्याशी संपर्क तुटतो. पावसाळ्यात नागरिक सायकल, दुचाकीवाहने खांद्यावर उचलून नाला पार करतात. पुलाअभावी नागरिकांना असा जीवघेणा प्रवास करावा लागतो.झिंगानूरपासून आठ किमी अंतरावर असलेल्या कोपेला लगत नाला पावसाळ्यात दुथडी भरून वाहत असतो. थोडाफार पाऊस झाला तरी नाल्याला पूर येतो. या नाल्यावर डोंगा व अन्य साधनाची उपलब्धता नसल्याने नागरिकांना नाल्यातील पाण्यातून प्रवास करावा लागतो. अनेकदा नागरिकांना पुराच्या पाण्याचा अंदाज येत नाही. शिवाय पुराच्या पाण्याचा प्रवाह तीव्र राहत असल्याने अनेकदा साखळी करून अथवा घोळक्याने नागरिकांना नाला पार करावा लागतो. या नाल्यावर पुलाची निर्मिती झाल्यास परिसरातील गावातील नागरिकांसाठी सोयीचे होऊ शकते. पावसाळ्यात या परिसरातील गावांचा संपर्क तुटलेला असतो. पावसाची रिपरिप चार ते पाच दिवस सुरू राहिल्यास सदर मार्ग बंद होतो. परिणामी नागरिकांना आवागमन करणे, कठिण होते. अशावेळी नागरिकांची अनेक कामे अडतात. त्यामुळे या मार्गावर पुलाची निर्मिती करावी, अशी मागणी आहे.पक्क्या रस्त्यांचाही अभावझिंगानूर परिसरातील बहुतांश भाग घनदाट जंगल व डोंगर दºयांनी व्यापला आहे. या परिसरात पक्के रस्ते अद्यापही झालेले नाही. पावसाळ्यात सदर मार्गाने चारचाकी वाहनांना अडसर निर्माण होतो. तरीसुद्धा या भागात रस्त्यांची निर्मिती केली जात नाही. लोकप्रतिनिधीही याकडे दुर्लक्ष करतात. या भागात पक्क्या रस्त्याची प्रतीक्षा आहे.