शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! बच्चू कडू यांनी शिवसेनेचं धनुष्यबाण घेतले हाती; "झेंडा बदलला पण अजेंडा नाही.."
2
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
3
$१ ची किंमत ₹९५.२०: डॉलरच्या समोर रुपया धाराशाही; पहिल्यांदाच विक्रमी नीचांकी स्तरावर भारतीय चलन
4
अमेरिकन सैन्याची माघार? जगातील सर्वात मोठी युद्धनौका USS जेराल्ड आर फोर्ड परतीच्या प्रवासाला लागली
5
‘शिवाजी कोण होता?’ उर्दू आवृत्तीच्या २५ हजारांवर प्रतींची विक्री, पुस्तक पोहोचले पाकिस्तानात
6
९० च्या दशकातील सर्वात सुंदर अभिनेत्री! जिच्या नावाने भारताने पाकिस्तानवर डागलेली मिसाईल
7
स्मार्टफोन जगतात मोठी खळबळ: OnePlus आणि Realme चं मर्जर होणार? पाहा डिटेल्स
8
कोल्हापुरी ब्रँड 'प्राडा'ने स्वीकारला, नवीन चप्पल बाजारात; ३० जणांना इटलीत प्रशिक्षणाची संधी
9
अजब लग्नाची गजब कहाणी, ६६ वर्षांच्या आजोबांनी नातीच्या वयाच्या तरुणीसोबत लग्न 
10
भीषण अपघात! "जागाच नव्हती, मजुरांना अक्षरशः कोंबून भरलं"; १६ मजुरांचा मृत्यू; २५ जण जखमी
11
Maharashtra Din 2026 Wishes: महाराष्ट्र आणि कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा मराठमोळा सण
12
Crude Oil Price: कच्च्या तेलाच्या किमतींचा भडका! क्रूड प्रति बॅरल $१२० च्या पार, जागतिक अर्थव्यवस्थेवर मोठं संकट
13
पेट्रोल, डिझेल दरवाढीचा भडका?, इंधन दरवाढीचे संकट गडद; रसायने, खतांच्या किमतीतही मोठी वाढ
14
१ मे वैशाख पौर्णिमा: रात्री ९ ते १२ दरम्यान करा 'हा' सोपा उपाय; चंद्र देव पूर्ण करतील सर्व इच्छा!
15
VIDEO: मुंबई इंडियन्सच्या मॅचसाठी विनोद कांबळी वानखेडे स्टेडियमवर, अवस्था पाहून चाहते हळहळले
16
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत तेजी; पटापट चेक करा २४K, २२K आणि १८K सोन्याचा भाव
17
"मुलगाच राहिला नाही, तर महाल काय कामाचा?"; अभिनेत्याच्या आईने सोडला ८० कोटींचा बंगला, राहते झोपडीत
18
VIDEO: धडकी भरवणारा अपघात! टायर फुटला, नियंत्रण सुटले अन् १५० फूट खोल दरीत गेली कार
19
लाथाबुक्क्यांनी मारहाण अन् खुर्च्यांची फेकाफेक; लग्नात मटणावरून पाहुण्यांमध्ये मोठा राडा
20
Khandavi Recipe: कढईत पीठ न शिजवता करा परफेक्ट सुरळीची वडी; वेळ आणि मेहनत दोन्ही वाचवणारी रेसिपी
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी करणार नवीन तंत्रज्ञानाचा अभ्यास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2021 05:00 IST

जिल्ह्यातील शेतकरी जिल्ह्याबाहेर पडून, पारंपरिक शेतीला बगल देत विविध क्लृप्त्यांचा वापर करीत अत्याधुनिक शेती करतील. या उद्देशाने पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्या संकल्पनेतून व  अहेरीचे अपर पाेलीस अधीक्षक अनुज तारे याच्या मार्गदर्शनात अहेरी, जिमलगट्टा व सिरोंचा भागातील ४६ शेतकऱ्यांकरिता चौथ्यांदा कृषी दर्शन सहलीचे आयोजन करण्यात आले आहे.

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : पोलीस दादालोरा खिडकी व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने अतिदुर्गम भागातील शेतकऱ्यांसाठी कृषी दर्शन सहल व अभ्यास दौरा आयाेजित करण्यात आला आहे. ४६ शेतकरी १० दिवसांच्या अभ्यास दाैऱ्यावर गेले आहेत.  जिल्ह्यातील शेतकरी जिल्ह्याबाहेर पडून, पारंपरिक शेतीला बगल देत विविध क्लृप्त्यांचा वापर करीत अत्याधुनिक शेती करतील. या उद्देशाने पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्या संकल्पनेतून व  अहेरीचे अपर पाेलीस अधीक्षक अनुज तारे याच्या मार्गदर्शनात अहेरी, जिमलगट्टा व सिरोंचा भागातील ४६ शेतकऱ्यांकरिता चौथ्यांदा कृषी दर्शन सहलीचे आयोजन करण्यात आले आहे. यापुर्वी सुद्धा पोमके कोटमी हद्दीतील ३२ महिला शेतकऱ्यांची, उपविभाग भामरागड हद्दीतील ४० शेतकऱ्यांची, त्याप्रमाणे धानोरा, हेडरी व एटापल्ली उपविभागातील ४२ शेतकऱ्यांची कृषी सहल आयोजित करण्यात आली होती. या चौथ्या सहलीमध्ये अहेरी, जिमलगट्टा, सिरोंचा उपविभागातील अतिदुर्गम भागातील ४६ शेतकऱ्यांनी आपला सहभाग नोंदविला आहे. १६ ते २५ डिसेंबर हे १० दिवस शेतकरी विविध ठिकाणांना भेटी देणार आहेत. अभ्यास दौरा कार्यकमास मान्यवरांनी हिरवी झेंडी दाखविली. यावेळी अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) सोमय मुंडे हे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता अहेरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर, जिमलगट्टाचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुजितकुमार क्षीरसागर, सिराेंचाचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुहास शिंदे, नागरी कृती शाखेचे प्रभारी अधिकारी सपोनि महादेव शेलार यांनी सहकार्य केले. 

या ठिकाणांना देणार भेटी सहलीत सहभागी शेतकरी नागपूर, अमरावती, अकोला, जळगाव, राहुरी, बारामती, पुणे, बाभळेश्वर, औरंगाबाद, वेरूळ, अजिंठा, पैठण, अंबेजोगाई, परभणी, पोखर्णी तसेच ताडापूर येथील कृषी विज्ञान केंद्र तसेच विविध शेती प्रक्षेत्र यांना भेटी देणार आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील एतिहासिक वारसा असलेल्या अजिंठा-वेरूळ येथील प्रसिद्ध लेण्या व गुफांना भेटी देणार आहेत. 

 

टॅग्स :Farmerशेतकरीtechnologyतंत्रज्ञान