शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीचा मुहूर्त ठरला! 'या' तीन नावांची चर्चा
2
पराभवानंतरही टीवीकेसोबत सत्तेत येण्याची काँग्रेसला संधी; तामिळनाडूत सत्ता समीकरण कसं जुळणार?
3
ममता बॅनर्जींनी पश्चिम बंगाल गमावला! संजय राऊत राहुल गांधींना म्हणाले, "जागे व्हा, आता आपण..."
4
प्रेयसीच्या भावावर सूड उगवण्यासाठी दीड वर्षाच्या चिमुरडीचा काटा काढला; १३ वर्षांनंतर न्याय मिळालाच!
5
हाय राईज बिल्डिंगमध्ये फ्लॅट घ्यायचे स्वप्न... नजारा काय दिसतो...; पण लाईट गेली की, धक्कादायक वास्तव
6
पाकिस्तानचा प्रसिद्ध मौलाना इदरीस तरंगजईची गोळ्या झाडून हत्या; दोन पोलीस गंभीर
7
निवडणूक संपताच सैन्याकडून बंगालच्या उपसागरात NOTAM जारी; पाकिस्तानशी आहे खास संबंध
8
भाजपचा बंगालमध्ये ऐतिहासिक विजय! मुख्यमंत्रीपदासाठी ४ नावांची चर्चा; शपथविधी सोहळ्याची मोठी तयारी
9
लग्नाच्या प्रश्नांना अन् दडपणाला कशी सामोरी जातेस? प्राजक्ता माळी म्हणाली, "जे तुमचं असतं..."
10
भीषण, भयंकर, भयावह! चीनमध्ये फटाक्याच्या फॅक्ट्रीत मोठा स्फोट; २१ जणांचा मृत्यू, ६१ जखमी
11
चिनी नागरिक स्वत:ला नेपाळी भासवत होता, नेपाळी नंबरची स्कूटर घेऊन भारतात घुसला अन्...
12
LNG Supply: कतारकडून पुरवठा थांबला, भारतानं कंबर कसली; ७ नव्या टाक्यांचा 'यासाठी' उपयोग होणार, काय आहे संपूर्ण प्लॅन
13
तिघांनी हल्ला केला, कोयता डोक्यात अडकला; सायन रुग्णालयातील थरारक व्हिडिओ, तो तरुण नेमका कोण?
14
Adhik Maas 2026: तब्बल ११ वर्षांनंतर दुर्मिळ योग! अधिक मासात सुख समृद्धीसाठी 'या' तीन गोष्टींचे करा दान!
15
ब्राझीलमध्ये विमान थेट इमारतीला धडकले; अपघाताचा थरारक Video आला समोर, ३ जण दगावले
16
लग्नाच्या पहिल्या वाढदिवसापूर्वीच संसार उद्ध्वस्त; शेजारणीवर जीव जडला, बायकोचा काटा काढला
17
‘सरकारने कुठलाही विचार न करता या आरोपीला हालहाल करून संपवावं’, नसरापूर प्रकरणी राज ठाकरेंचा रोखठोक सल्ला
18
Crude Oil Price Today: कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ: इराणच्या UAE वरील हल्ल्यानंतर ब्रेंट क्रूड $११४ पार; जाणून घ्या पेट्रोल-डिझेलचे दर
19
आता पुढचे लक्ष्य अखिलेश यादव; ममता बॅनर्जींचा पराभव करणाऱ्या सुवेंदू अधिकारींनी थोपटले दंड
20
Gold Silver Price Today : सोनं महागलं, चांदी झाली स्वस्त; आज काय आहेत नवे दर? पटापट चेक करा
Daily Top 2Weekly Top 5

सावकारांचा शेतकऱ्यांना ठेंगा; व्यापाऱ्यांना कर्ज

By admin | Updated: March 18, 2015 01:42 IST

राज्य शासनाकडून काही खासगी लोकांना सावकारी परवाना दिला जातो. गडचिरोली जिल्ह्यात ५४ परवानाधारक सावकार आहे.

दिगांबर जवादे गडचिरोलीराज्य शासनाकडून काही खासगी लोकांना सावकारी परवाना दिला जातो. गडचिरोली जिल्ह्यात ५४ परवानाधारक सावकार आहे. या सर्व सावकारांनी मागील एक वर्षात नोकरदारांना भरगच्च कर्ज वाटप केल्याची माहिती पुढे आली आहे. या खासगी सावकारांनी सात कोटींच्या वर कर्जाचे वितरण जिल्ह्यातील नोकरदार लोकांना केले.राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील ज्या शेतकऱ्यांनी खासगी सावकारांकडून कर्ज घेतले आहे. त्यांचे संपूर्ण कर्ज शासन भरेल, असे आश्वासन विधानसभेत दिले. त्यामुळे शेतकऱ्यांना आता सावकाराचे कर्ज भरण्याची गरज राहणार नाही. या पार्श्वभूमीवर गडचिरोली जिल्ह्यात सावकारांनी शेतकऱ्यांना किती कर्ज वितरण केले, याची माहिती जाणून घेतली असता, ५४ पैकी एकाही परवानाप्राप्त सावकाराने जिल्ह्यातील कोरडवाहू व ओलीत शेती असलेल्या शेतकऱ्याला कर्ज वाटप केले नसल्याची माहिती पुढे आली आहे. या सर्व परवानाप्राप्त सावकारांनी सात कोटी एक लाख ७४ हजार रूपयांचे कर्ज मागील एक वर्षात चार तालुक्यांमध्ये नोकरदारांना वितरित केल्याची माहिती सहायक निबंधक कार्यालयाने दिली आहे. गडचिरोली जिल्ह्यात गडचिरोली, कुरखेडा, आरमोरी, देसाईगंज या चार तालुक्यात ५४ परवानाप्राप्त सावकार आहे. यामध्ये गडचिरोलीत पाच, कुरखेडात १३, आरमोरीत ११, देसाईगंजमध्ये २५ सावकारांचा समावेश आहे. या सावकारांनी गतवर्षी १६ हजार ९०५ नागरिकांना कर्ज पुरवठा केला. एकूण सात कोटी १३ लाख ९ हजार रूपयांचे कर्ज वितरण त्यांनी गेल्या वर्षी केले. तर यंदा १२ हजार ७१६ नागरिकांना सात कोटी एक लाखांचे कर्ज वितरण केले. सर्वाधिक कर्ज वितरण देसाईगंज येथील परवानाप्राप्त सावकारांनी नागरिकांना केलेले आहे. एकाही शेतकऱ्याला या सावकारांनी कर्ज दिल्याची माहिती शासनदप्तरी नोंद नाही. त्यामुळे जिल्ह्यातील एकाही परवानाप्राप्त सावकाराला शासनाच्या निर्णयाचा लाभ होणार नाही, अशी माहिती प्रशासकीय सुत्रांनी दिली आहे. परवानाप्राप्त सावकार मौल्यवान वस्तू गहाण ठेवूनही कर्ज वितरण करतात. त्यामुळे नोकरदार त्यांच्याकडे जातात व सुलभपणे कर्ज घेतात, अशी माहिती लोकमतला मिळाली आहे.