शहरं
Join us  
Trending Stories
1
सिंधू जल करारासंदर्भात भारताची आक्रमक भूमिका! हेग लवादाचा निकाल फेटाळला; आता काय करणार पाकिस्तान?
2
मोठी कारवाई! TMCच्या कार्यालयावर छापे; सरकारी जमिनीची कागदपत्रे, १००हून अधिक आधार कार्ड जप्त
3
लोकसंख्या वाढीसाठी चंद्राबाबू नायडूं यांची मोठी घोषणा! तिसऱ्या आणि चौथ्या अपत्यासाठी सुरू केली 'कॅश ऑफर' योजना! कारण काय?
4
क्रिकेटरशी जोडलं नाव, आता करोडपती यूट्युबरची बायको होणार 'ही' अभिनेत्री? लग्नाची रंगली चर्चा
5
लातूर ते पुण्याची 'ती' बिल्डिंग... नीट पेपर फोडण्यासाठी विषयांची वाटणी, प्राध्यापिका CBIच्या ताब्यात
6
Virat Kohli : किंग कोहलीचा विक्रमी धडाका! IPL इतिहासात कुणालाच जमलं नाही ते करून दाखवलं
7
Mouni Roy : संसार मोडल्यावर मौनी रॉय आणि दिशा पाटनी रिलेशनशिपमध्ये? जाणून घ्या, व्हायरल पोस्टचं 'सत्य'
8
आयडियाची कल्पना! सूट-बूट घालून विकतोय फ्राईड राईस; दरमहा ७ लाखांची कमाई
9
पंतप्रधान मोदी यांचा ८ वर्षांनी स्वीडन दौरा; व्यापार, तंत्रज्ञान, संरक्षण मुद्द्यांवर चर्चा
10
Summer Tips: उन्हाळ्यात लोक टक्कल का करतात? जाणून घ्या त्यामागील आरोग्यदायी फायदे!
11
मुलीचं मौन म्हणजे 'कबूल है-कबूल है-कबूल है...!' अफगाणिस्तानात तालिबानची बालविवाहाला मंजूरी
12
Rahul Gandhi: "शिक्षणमंत्र्यांवर अजूनही कारवाई का नाही?" NEET पेपरफुटी प्रकरणावर राहुल गांधींचा संताप
13
युद्धातून वाट काढत २०००० टन LPG सह जहाज भारतात! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये IRAN-US ला अशी दिली हुलकावणी
14
निरोपाचा सामना खेळण्यासाठी मैदानात उतरणार? समोर येतेय अशी अपडेट
15
Komal Ganatra : संघर्षगाथा! लग्नानंतर १५ व्या दिवशी पतीने सोडलं, लोकांच्या टोमण्यांना दिलं सडेतोड उत्तर, झाली IRS
16
फ्रान्समध्ये मराठीचा डंका, प्राजक्ता माळीने 'कान्स'मधून शेअर केला व्हिडीओ; तिचा लूक पाहिलात?
17
हनिमूनच्या दिवशीच नवविवाहितेवर लैंगिक अत्याचार; मसाजच्या बहाण्याने ६१ महिलांचे आयुष्य केलं उद्ध्वस्त
18
पोसाईडन, सरमत आणि... पुतीन यांचे सुपरवेपन्स, रशिया गोळा करतोय विध्वंसाची सामुग्री, कारण काय?  
19
संकटं संपता संपेना! ना लस, ना औषध... 'हे' आहे इबोलाचं किलर व्हर्जन; 'या' देशांमध्ये खळबळ
20
"रजनीकांत इतका नीच नाही की...", CM विजय यांच्यावरुन ट्रोल करणाऱ्यांना थलायवाने सुनावलं, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

धान काट्यासाठी शेतकरी वेटींगवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2019 06:00 IST

आदिवासी विकास महामंडळाअंतर्गत गडचिरोली प्रादेशिक कार्यालयाच्या हद्दीतील गावांमध्ये आविका संस्थांच्या वतीने एकूण ५३ केंद्र सुरू करण्यात आले आहे. अहेरी उपविभागात पाच तालुक्यांसाठी महामंडळाचे ३६ केंद्र आहेत. याशिवाय मार्केटिंग फेडरेशनचे २० वर केंद्र आहेत. गडचिरोली जिल्ह्यात धान खरेदी करणारे अनेक खासगी व्यापारी आहेत.

ठळक मुद्देमहामंडळाची खरीप हंगामातील खरेदी : प्राप्त सातबारानुसार बनविली जाते यादी

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : आदिवासी विकास महामंडळाअंतर्गत आविका संस्थेच्या केंद्रावर धानाची विक्री करण्यासाठी शेतकऱ्यांची गर्दी होत असून केंद्रावर प्राप्त सातबारा व आणलेल्या धानानुसार शेतकऱ्यांची यादी बनविली जात आहे. तोपर्यंत केंद्र परिसरात धान देखभालीत ठेवले जात आहे. धान उत्पादक शेतकऱ्यांच्या तुलनेत महामंडळ व फेडरेशनचे केंद्र कमी असल्याने अनेक शेतकरी काटा होण्यासाठी वेटींगवरच असल्याचे दिसून येत आहे.
आदिवासी विकास महामंडळाअंतर्गत गडचिरोली प्रादेशिक कार्यालयाच्या हद्दीतील गावांमध्ये आविका संस्थांच्या वतीने एकूण ५३ केंद्र सुरू करण्यात आले आहे. अहेरी उपविभागात पाच तालुक्यांसाठी महामंडळाचे ३६ केंद्र आहेत. याशिवाय मार्केटिंग फेडरेशनचे २० वर केंद्र आहेत. गडचिरोली जिल्ह्यात धान खरेदी करणारे अनेक खासगी व्यापारी आहेत. महामंडळ धानाला जेवढा भाव देत आहे त्या जवळपासचा भाव खासगी व्यापारीही शेतकऱ्यांना देत आहेत. मात्र यावर्षी शेतकºयांचा कला खासगी व्यापाऱ्यांकडे फार कमी असून महामंडळ अर्थात आविका संस्था तथा फेडरेशनच्या केंद्राकडे आहे. काही शेतकरी खरेदी-विक्री सहकारी संघाच्या केंद्रांवरही धान विक्रीसाठी नेत आहेत.
महामंडळाच्या केंद्रांवर धानाची विक्री करणाºया शेतकऱ्यांना प्रतीक्विंटल ५०० रुपये प्रमाणे बोनस दिला जातो. बोनसची ही मर्यादा ५० हजार क्विंटलपर्यंत सरकारने ठेवली आहे. याशिवाय महाविकास आघाडीच्या सरकारने काही दिवसांपूर्वीच शेतकऱ्यांना क्विंटल मागे २०० रुपये देण्याचे जाहीर केले. त्यामुळे शासनाच्या आधारभूत धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना धानाच्या भावासोबत क्विंटलमागे ७०० रुपये मिळणार आहेत. ‘अ’ प्रतीच्या धानाला १ हजार ८३० रुपये व ‘ब’ प्रतीच्या धानाला १ हजार ११५ रुपये भाव दिला जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना बोनस पकडून एका क्विंटल मागे २ हजार ५०० रुपये प्राप्त होणार आहे. खासगी व्यापारी १ हजार ८०० रुपये भाव देत असले तरी त्यांच्याकडून बोनसची रक्कम मिळत नसल्याने शेतकऱ्यांच्या धानाला कमी भाव पडतो. त्यामुळे यावर्षी अनेक धान उत्पादक शेतकरी महामंडळ व फेडरेशनच्या केंद्राकडे धानविक्रीसाठी वळले आहेत.
आविका संस्थेच्या केंद्रावर शेतकऱ्यांना सातबारा, आधारकार्ड, नमूना आठ व बँक खाते आदी दस्तावेज द्यावे लागत आहे. धान नेल्यावर शेतकरी हे सर्व दस्तावेज केंद्राच्या व्यवस्थापकाकडे सादर करीत आहेत. मात्र एकाचवेळेस सर्व शेतकºयांच्या धानाचा काटा केला जात नाही. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना प्रतीक्षा करावी लागत आहे. केंद्राच्या वतीने प्राप्त सातबारा व इतर दस्तावेजनुसार धानाची विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांची यादी तयार करण्यात येत असून त्यानुसार टप्प्याटप्प्याने शेतकऱ्यांच्या धानाचा काटा केला जात आहे. शेतकऱ्यांना सात ते आठ दिवस तर काहींना अधिक दिवस धानाचा काटा होण्याची प्रतीक्षा करावी लागत आहे.

आधारभूत धान खरेदी केंद्र वाढवा- रमेश भुरसे
बोनस व शासनाकडून मिळणाऱ्या रकमेमुळे महामंडळ व फेडरेशनच्या केंद्रांवर धानाची आवक वाढली आहे. धानाचा काटा होण्यासाठी शेतकºयांना प्रतीक्षा करावी लागत आहे. परिणामी घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्यासाठी शेतकऱ्यांना अडचण जात आहे. त्यामुळे महामंडळाने आधारभूत धान खरेदी केंद्राची संख्या वाढवावी, जिल्हाधिकाऱ्यांनीही गडचिरोली जिल्ह्यात यावर्षी आवश्यक त्या ठिकाणी अतिरिक्त केंद्र मंजूर करावे, अशी मागणी भाजपच्या किसान आघाडीचे जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक रमेश भुरसे यांच्यासह शेतकऱ्यांनी केली आहे.

टॅग्स :Market Yardमार्केट यार्ड