शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
2
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
3
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
4
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
5
IRS अधिकाऱ्याच्या मुलीवर अत्याचार आणि हत्या; हाय-टेक सुरक्षा भेदून घरात कसा घुसला आरोपी?
6
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
7
विशेष लेख: नॉनस्टॉप ७० तास गेमिंग! खाणं, झोपणं तिथेच!
8
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
9
लेख: काँक्रीटच्या जंगलात चतकोर तरी मोकळी जागा ठेवाल का?
10
लेख: डोनाल्ड ट्रम्प यांना झुकवणाऱ्या होर्मुझ सामुद्रधुनीचे रहस्य!
11
आजचा अग्रलेख: शस्त्रे म्यान, गळचेपी सुरूच !
12
महापालिका अधिकारी कैलास गायकवाड यांच्या घरात रात्रभर झाडाझडती, पोलिसांना सापडलं मोठं घबाड
13
'...तर कॉन्सर्टला परवानगी नाहीच' पोलीस आयुक्तांची भूमिका; कठोर कारवाईचे आदेश
14
१ मे पासून ऑनलाइन गेमिंग्सबाबत नवे नियम; सरकारचा मोठा निर्णय, 'या' गेम्सवर बंदी तर इतरांना सूट
15
Bombay High Court: ‘त्या’ दोन महिलांना गर्भधारणेसाठी वैद्यकीय चाचण्यांना मुभा- मुंबई उच्च न्यायालय
16
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
17
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
18
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
19
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
20
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी पाण्यापासून वंचित

By admin | Updated: February 28, 2017 00:51 IST

चामोर्शी तालुक्यातील रेगडी जलाशयालगतची १४ गावे अद्यापही जलाशयाच्या पाण्यापासून वंचित आहेत.

रेगडी जलाशय : कालवा खोदण्याची १४ गाववासीयांची मागणीभाडभिडी : चामोर्शी तालुक्यातील रेगडी जलाशयालगतची १४ गावे अद्यापही जलाशयाच्या पाण्यापासून वंचित आहेत. इतर गावांना ज्या प्रकारे पाणी पुरवठा केला जातो. त्याप्रमाणे १४ गावातील शेतकऱ्यांना जलाशयातून कालवा खोदून पाणीपुरवठा करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. संपूर्ण जिल्ह्यातील एकमेव सिंचन प्रकल्प म्हणजे चामोर्शी तालुक्यातील रेगडी गावालगतच्या दिना नदीवर असलेले कन्नमवार जलाशय होय. १९६२ मध्ये चामोर्शी तालुक्यातील रेगडी गावालगत वाहणाऱ्या दिना नदीवर धरण बांधून तालुक्यातील ६६ गावातील ९ हजार ६६० हेक्टर जमीन सिंचनाखाली आणण्यात आली. असे असले तरी दिना धरणालगतच्या १४ गावातील शेतींना दिना धरणाचे पाणी मिळत नाही. धरणाचा कालवा जात असला तरी शेतीला पाणी मिळ नाही. अशी स्थिती आहे. त्यामुळे १४ गावांना नेहमीच दुष्काळाचा सामना करावा लागतो. त्यामुळे नवीन कालवा बांधून शेतीला पाणी देण्याची मागणी दिना धरणालगतच्या १४ गावातील शेतकऱ्यांनी लोकप्रतिनिधी व प्रशासनाकडे केली. मात्र प्रत्यक्षात काहीच घडले नाही. दिना धरणालगतच्या चापलवाडा, चनकापूर, मक्केपल्ली, गोलबोंदरी, गांधीनगर, वरूर, पुसगुडा, पलसपूर, पोतेपल्ली, माडेआमगाव, सीमुलतला, श्यामनगर, कोळसेगट्टा, मछली आदी १४ गावांना पाणीपुरवठा होत नसल्याने येथील शेतकऱ्यांना दुष्काळाचा सामना करावा लागतो. सदर गावातील शेतीही उंच भागात विस्तारली आहे. त्यामुळे येथे कालव्याचे बांधकाम करण्यात आले नाही. मात्र मुख्य कालव्याचे पाणी उंच भागात अडवून नवीन उपकालव्याद्वारे पाणी पुरवठा करून सिंचन पुरवठा केल्या जाऊ शकते, अशी फार जुनी मागणी १४ गावातील शेतकऱ्यांची आहे. निवडणुकीच्या तोंडावर लोकप्रतिनिधी केवळ आश्वासन देण्याचे काम करतात मात्र प्रत्यक्षात काहीच होत नाही. आजवर दिलेले आश्वासन केवळ दिवास्वप्न ठरत आहे. त्यामुळे शासनाने लक्ष देण्याची गरज आहे. (वार्ताहर)