शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याचं कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
3
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
4
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
5
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
6
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
7
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
8
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
9
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
10
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
11
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
12
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
13
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
14
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
15
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
16
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
17
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
18
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
19
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
20
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी व पशुधन वन्यप्राण्यांच्या दहशतीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 05:00 IST

घनश्याम नवघडे लोकमत न्यूज नेटवर्क नागभीड : नागभीड तालुक्यात मानव-वन्यप्राणी यांच्यातील संघर्ष बराच आहे. तालुक्यातील पशूधन आणि शेतकरी जंगली ...

घनश्याम नवघडेलोकमत न्यूज नेटवर्कनागभीड : नागभीड तालुक्यात मानव-वन्यप्राणी यांच्यातील संघर्ष बराच आहे. तालुक्यातील पशूधन आणि शेतकरी जंगली प्राण्यांच्या दहशतीत आहेत. एप्रिल ते ऑगस्ट या महिन्यात वन्यप्राण्यांच्या ४२ घटना नागभीड वनपरिक्षेत्रातच घडल्या आहेत. तळोधी वनपरिक्षेत्राची आकडेवारी वेगळीच आहे.नागभीड तालुक्याचे एकूण क्षेत्रफळ ५१ हजार ६६०.४५ हेक्टरमध्ये विस्तारले आहे. यापैकी १४ हजार २९७.२५ हेक्टर क्षेत्र जंगलव्याप्त आहे. तालुक्यातील जंगलक्षेत्र लक्षात घेऊन काही वर्षापूर्वी तळोधी ( बाळापूर) येथे स्वतंत्र वनपरिक्षेत्र कार्यालयाची निर्मिती करण्यात आली. तालुक्यातील गोविंदपूर, कचेपार, गिरगाव, सोनापूर, वाढोणा, गंगासागर हेटी,जनकापूर, बाळापूर, देवपायली,बोंड, मिंडाळा, कोसंबी गवळी, मिंडाळा, नवेगाव हुंडेश्वरी,मौशी, ढोरपा, बालापूर खूर्द, पाहार्णी, म्हसली,कोरंबी,डोंगरगाव, नवखळा आदी परिसर तर चांगलाच जंगलव्याप्त आहे. या जंगल परिसरात अनेकदा लोकांना वाघ, बिबट व अन्य जंगली प्राण्यांचे दावसाढवळ्या दर्शन झाले आहे. अनेकांच्या शेती या जंगलाला लागून आहेत. या गावांचा आणि शेतकऱ्यांचा रोजच जंगलाशी संबंध येतो. त्यामुळे वन्यप्राणी शेतकरी आणि पशुधनावर हल्ले करीत आहेत.आतापर्यंत असे झाले हल्लेनागभीड वनपरिक्षेत्रात एप्रिल महिन्यापासून १४ व्यक्तींवर रानटी डुकरांनी हल्ले केले आहेत. दोन व्यक्तींवर बिबट्यांनी तर वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात २६ जनावरे जखमी व मृत्यूमुखी पडले असल्याची माहिती आहे. या घटना केवळ घटनाच नाही तर या घटनांचा परिणाम शेतकऱ्यांच्या दैनंदिन जीवनावर होत आहे. दहशतीमुळे शेतकऱ्यांचे शेतीकडे दुर्लक्ष होते. त्याचा परिणाम उत्पादनावर होतो. वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात पशूधन मृत्यूमुखी पडत असल्याने किंवा जखमी होत असल्याने त्या शेतकऱ्याचा त्याचा जो रोजचा व्यवहार आहे तो थांबत असतो. 

तळोधी वनपरिक्षेत्र संवेदनशीलनागभीड वनपरिक्षेत्राच्या तुलनेत तालुक्यातील तळोधी वनपरिक्षेत्र अतिशय संवेदनशील आहे. गेल्या चार महिन्यात या वनपरिक्षेत्रात वाघाने थेट व्यक्तींवर हल्ला करून ठार केल्याच्या चार घटना आहेत. यात कोजबी माल येथील सरपणासाठी गेलेला व्यक्ती, मोहफूल वेचण्यासाठी जंगलात गेलेली महिला आणि आकापूर व वाढोणा येथील दोन गुराख्यांचा समावेश आहे. या वनपरिक्षेत्रातही अन्य वन्य प्राण्यांकडून पशूधनावर, व्यक्तींवर हल्ला करून ठार किंवा जखमी केल्याच्या अनेक घटना आहेत.मात्र या घटनांचा तपशील प्राप्त होऊ शकला नाही.

 

टॅग्स :FarmerशेतकरीTigerवाघ