शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Train Update: डोंबिवली स्टेशनवर लोकलचा डबा रुळावरून घसरला! ट्रेन सेवा २० ते ३० मिनिटे विलंबाने सुरू
2
अमेरिका-इराणमधील तणाव पुन्हा वाढला! 'होर्मुझ'च्या वादामुळे अचानक कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ
3
आजचे राशीभविष्य, २० एप्रिल २०२६: कार्यात यश, स्वादिष्ट भोजन; काहीसा वेगळा दिवस
4
“KDMCतील वाहतूक कोंडी कमी होण्यासाठी, पाणी प्रश्न सुटण्यासाठी प्रकल्पांना गती देणार”: DCM शिंदे
5
369 हा एक आकडा नाही, ब्रह्मांडाची ताकद आहे; मनात आणाल, पूर्ण होईल, २१ दिवसांत संकेत मिळतील!
6
३ दिवस गजकेसरी राजयोग २०२६: ७ राशींना शुभ-लाभ, वरदान काळ; पद-पैसा वाढ, सुख-सुबत्ता!
7
Heatwave: तिकडे अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’, इकडे सांगलीमध्ये गारांसह वादळी पाऊस!
8
Tamil Nadu Explosion: तामिळनाडूतील फटाका कारखान्यात भीषण स्फोट; २३ जण ठार, अनेक गंभीर जखमी
9
Akshay Tritiya: अक्षय्य मुहूर्तावर १ हजार कोटींची सुवर्णझळाळी
10
नाश्त्यावरून वाद, कार्यकर्त्यांसमोरच नगरसेविकेने जिल्हाध्यक्षांना लगावली कानशिलात!
11
Middle East War: करार करा अन्यथा तुमचा विनाश अटळ; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
Drugs Racket: टिटवाळ्याच्या आलिशान घरातून ‘ती’ मुंबईत चालवत होती ड्रग्ज रॅकेट!
13
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
14
लेख: तहान लागल्यावर विहीर खोदायची, तर कोरड पडणारच !
15
आजचा आग्रलेख: विमान सुरक्षेचे पंख वाऱ्यावर, प्रवाशांचा जीव टांगणीला!
16
विशेष लेख: उपकार नव्हेत, हा महिलांचा हक्क आहे!
17
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
18
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
19
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
20
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
Daily Top 2Weekly Top 5

सेट टॉप बॉक्सवर अतिरिक्त वसुली

By admin | Updated: January 14, 2016 02:01 IST

भारत सरकारने संपूर्ण देशात केबलधारकांना सेट टॉप बॉक्सची सक्ती केली आहे. सेटटॉप बॉक्स लावण्याची ही मोहीम शहरातून गडचिरोली जिल्ह्यात पोहोचली आहे.

ग्राहकांवर भुर्दंड : १४०० च्या बॉक्सची १५०० रूपयांत विक्री देसाईगंज : भारत सरकारने संपूर्ण देशात केबलधारकांना सेट टॉप बॉक्सची सक्ती केली आहे. सेटटॉप बॉक्स लावण्याची ही मोहीम शहरातून गडचिरोली जिल्ह्यात पोहोचली आहे. दरम्यान जिल्ह्यातील केबल नेटवर्क संचालक सेटटॉप बॉक्सवर अधिकची किंमत आकारून ग्राहकांची लूट करण्याचा धंदा सुरू केला आहे. सेट टॉप बॉक्सवरील छापील किमतीपेक्षा अधिकचा दर इन्स्टॉलेशन चॉर्जेचच्या नावावर लावत असल्याने ग्राहकांची सर्रास लूट सुरू आहे. संपूर्ण देशातील करमणूक करावर आळा घालण्यासाठी शासनाकडून सेट टॉप बॉक्स लावण्याची सक्ती करण्यात आली. सुरुवातीला मेट्रो शहर व त्यानंतर आता लहान शहरात सेट टॉप बॉक्स लावण्याची मोहीम सुरू झाली आहे. १ जानेवारीपासून गडचिरोली जिल्ह्याच्या सर्व शहरांमध्ये सेट टॉप बॉक्स लावणे बंधनकारक केले आहे. मात्र न्यायालयाच्या आदेशान्वये सेटटॉप बॉक्स लावण्याच्या कामाला तुर्तास स्थगिती मिळाली आहे. भविष्यात सेट टॉप बॉक्स लावून घेणे आवश्यक असल्याने केबलधारक केबल संचालकांकडून सेट टॉप बॉक्स लावून घेत आहेत. गडचिरोली जिल्ह्यात दुर्गम व मागास भागात अनेक तालुक्यात नागरिकांकडे स्वत:च्या डीश उपलब्ध आहेत. त्यांच्याकडे केबल आॅपरेटरकडून सेटटॉप बॉक्स लावले जात नाही. डिश टीव्हीच्या माध्यमातून थेट प्रसारणाची सोय असल्याने जिल्ह्यात अनेक टीव्ही संच अजूनही सुरूच आहेत. मात्र शहरी भागात सेट टॉप बॉक्स लावण्यासाठी टीव्हीधारकास मनस्ताप होत आहे. (वार्ताहर)