Eventually the poultry plant in the Kambalpetha will be removed | अखेर कंबलपेठातील कुक्कुटपालन केंद्र हटणार

अखेर कंबलपेठातील कुक्कुटपालन केंद्र हटणार

ठळक मुद्देपाठपुराव्याला यश : अहेरी उपविभागीय अधिकाऱ्यांनी काढले आदेश

लोकमत न्यूज नेटवर्क
सिरोंचा : तालुक्यातील कंबलपेठा गावाजवळ असलेले कुक्कुटपालन केंद्र हटवावे, असे निर्देश अहेरीचे उपविभागीय दंडाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिले आहेत. विशेष म्हणजे येथील कुकुटपालन केंद्राबाबत लोकमतने वेळोवेळी वृत्त प्रकाशित करून प्रशासनाचे लक्ष वेधले होते.
कंबलपेठा गावाच्या जवळच व्यावसायिकाने कुकुटपालन केंद्राची इमारत बांधून या ठिकाणी कुक्कुटपालन सुरू केले. कुक्कुटपालन केंद्रातील दुर्गंधी गावातील नागरिकांना असहय्य होत होती. अनेक नागरिकांच्या प्रकृती बिघडल्या होत्या. १५ दिवसांपूर्वी या गावातील २० पेक्षा अधिक नागरिकांची प्रकृती बिघडल्याने गावातच आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते. कुक्कुटपालन केंद्र हटवावे, अशी मागणी गावातील नागरिकांनी अनेकवेळा अधिकाऱ्यांकडे केली. तसेच लोकमतनेही वृत्त प्रकाशित करून सदर कुक्कुटपालन केंद्र कसे घातक आहे, याबाबत प्रशासनाचे लक्ष वेधले होते.
अहेरीचे उपविभागीय अधिकारी राहुल गुप्ता यांनी स्वत: १२ नोव्हेंबर रोजी कंबलपेठा येथे जाऊन पाहणी केली. गावात पोहोचताच दुर्गंधी येण्यास सुरूवात झाली. स्वत: गुप्ता यांनी नाकावर रूमाल ठेवून गावातील नागरिकांशी चर्चा केली तसेच परिस्थितीची पाहणी केली. परिस्थिती गंभीर असल्याचे लक्षात आल्यानंतर उपविभागीय अधिकाºयांनी सदर कुकुटपालन केंद्र ठेवण्याचे निर्देश कुकुटपालन मालकाला दिले आहेत. याबाबतचे पत्र गुरूवारी निर्गमित केले आहे.
अंकिसा येथील व्यंकटेश्वर येनगंटी यांनी पदाचा दुरूपयोग करून गावाजवळ कुकुटपालन केंद्र उभारण्यासाठी नाहरकत प्रमाणपत्र मिळविले. वीज जोडणीही करवून घेतली. मात्र नागरिकांच्या विरोधानंतर आता कुक्कुटपालन केंद्र बंद पाडावे लागणार आहे.

Web Title: Eventually the poultry plant in the Kambalpetha will be removed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.