शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: पुण्यात थरारक फायरिंग; टोळी युद्धातून आणखी एकाचा खून, वनराज आंदेकर खून प्रकरणाशी दुवा
2
Hormuz Strait Crisis : तेलाची किंमत ११० डॉलरच्या पार, जगभरात घबराट! इराणने सहमती दर्शवली नाही, तर नाटो होर्मुझमध्ये प्रवेश करणार
3
Top Marathi News LIVE Updates: १५ लाखांपेक्षा जास्त मेडिकल दुकानांना कुलूप! औषध विक्रेत्यांचा देशव्यापी संप 
4
मनोज जरांगेंकडून प्रसाद लाड यांना चर्चेचं निमंत्रण; गावागावांतील बैठका २३ तारखेपर्यंत स्थगित, दिला 'हा' इशारा
5
Giorgia Meloni: बारटेंडर ते देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान; जाणून घ्या इटलीच्या PM जॉर्जिया मेलोनी यांची न ऐकलेली कहाणी
6
Twisha Sharma : 'लिगेचर रिपोर्ट' समोर आल्याने मृत्यूचे कारण स्पष्ट; पण संशयाची सुई अजूनही सासरच्यांवर!
7
अधिक मास २०२६: गुरुपुष्यामृताचा सुवर्ण योग, भाग्योदयाचा शुभ काळ; ५ कामे करा, अमृत पुण्य लाभ!
8
'Welcome to Rome, my friend' म्हणत पंतप्रधान मेलोनींनी केले स्वागत, PM मोदींनीही शेअर केले रोममधील भेटीचे फोटो
9
राज्यभरात इंधन टंचाई! बऱ्याच पेट्रोल पंपांवर पेट्रोल, डिझेल संपलेले; ट्रॅक्टर थांबले, डिझेलसाठी शेतकरी रांगेत  
10
"...तर मीदेखील मेलो असतो", 'नटसम्राट'बद्दल नाना पाटेकरांनी केलेल्या वक्तव्याने उंचावल्या भुवया, म्हणाले...
11
नीट पेपरफुटीचा भांडाफोड कसा झाला? या शिक्षकाच्या लक्षात आले नसते तर...
12
गोव्यात कमी किमतीत पेट्रोल विसरा, दराने ओलांडली शंभरी; डिझेल ९० पैशांनी महाग, ताजे रेट पाहा
13
गश्मीर महाजनी 'देऊळ बंद २'मध्ये दिसणार? मोहन जोशींना म्हणाला, "स्वामींनी आदेश दिलाय तर..."
14
Vastu Shastra: बाथरूममध्ये बादली रिकामी ठेवताय? घरात दारिद्र्य आणणाऱ्या 'या' ३ चुका आजच सुधारा
15
कागोशिमा भूकंपाने जपान पुन्हा हादरले; ५.९ रिश्टर स्केल तीव्रतेचे हादरे, प्रशासनाने जारी केला महत्त्वाचा अलर्ट!
16
मृत्यू कलिंगडामुळे नाही तर...; ४ जणांच्या मृत्यू प्रकरणात पोलिसांच्या हाती लागला खळबळजनक माहिती
17
Deepika Nagar :"रात्री साडेबाराला मोठा आवाज झाला अन्..." शेजाऱ्याने उघड केली 'त्या' रात्रीची संपूर्ण कहाणी!
18
PM Modi Donald Trump: भारताचे पंतप्रधान आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष पुढच्या महिन्यात भेटणार; कोणत्या देशामध्ये होणार भेट?
19
"शुक्रवार, शनिवार किंवा रविवार..." इराणवर पुन्हा होणार मोठा हल्ला; डोनाल्ड ट्रम्प यांनी केले जाहीर
20
BRICS Summit 2026: तब्बल ७ वर्षांनंतर शी जिनपिंग भारतात येणार! दिल्लीतील ब्रिक्स परिषदेला पुतिन यांचीही उपस्थिती असणार
Daily Top 2Weekly Top 5

सीओंचे पलायन; सभा तहकूब

By admin | Updated: April 24, 2015 00:03 IST

पालिकेअंतर्गत ६० कंत्राटी सफाई कामगारांना मुख्याधिकाऱ्यांनी बंद केले. नाली स्वच्छतेचे नवे कंत्राट गतवर्षीपेक्षा कमी बजेटचे व कमी कामगाराचे ठेवल्याचा मुद्दा

गडचिरोली : पालिकेअंतर्गत ६० कंत्राटी सफाई कामगारांना मुख्याधिकाऱ्यांनी बंद केले. नाली स्वच्छतेचे नवे कंत्राट गतवर्षीपेक्षा कमी बजेटचे व कमी कामगाराचे ठेवल्याचा मुद्दा सभेच्या सुरुवातीलाच पालिकेचे उपाध्यक्ष रमेश चौधरी यांनी उपस्थित केला. यावर मुख्याधिकारी गिरीश बन्नोरे यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याचे पाहून सभागृहात काही सदस्य आक्रमक झाले. दरम्यान मुख्याधिकारी गिरीश बन्नोरे हे सभा आटोपण्यापूर्वीच सभागृहातून निघून गेले. त्यामुळे पालिकेची गुरूवारची सर्वसाधारण सभा तहकूब झाली.
विविध ३२ महत्त्वाच्या विषयावर गडचिरोली पालिकेची सर्वसाधारण सभा गुरूवारी नगराध्यक्ष निर्मला मडके यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या कक्षात बोलाविण्यात आली. या सभेला पालिकेचे उपाध्यक्ष रमेश चौधरी, बांधकाम सभापती आनंद श्रृंगारपवार, गटनेते प्रा. राजेश कात्रटवार, पाणीपुरवठा सभापती संजय मेश्राम, शिक्षण सभापती सचिन बोबाटे, माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक सुरेश पोरेड्डीवार, नंदू कायरकर, माधुरी खोब्रागडे, लता मुरकुटे, संध्या उईके, सुषमा राऊत आदी उपस्थित होते.
सभेला नगर पालिकेच्या सर्व विभागाचे विभाग प्रमुखही उपस्थित होते. मुख्याधिकारी गिरीश बन्नोरे सभागृहात आल्यानंतर सभेला सुरुवात करण्यात आली. मात्र सुरुवातीलाच पालिकेचे उपाध्यक्ष रमेश चौधरी, नगरसेवक नंदू कायरकर यांनी आक्रमक पवित्रा घेत मुख्याधिकारी बन्नोरे यांच्या कार्यप्रणालीबाबत प्रचंड नाराजी व्यक्त केली. पालिकेतील अधिकारी, विभाग प्रमुख व कर्मचारी हे पदाधिकारी, नगरसेवक यांच्या सूचनांकडे कानाडोळा करीत असल्याचा आरोप उपस्थित सदस्यांनी केला. त्यानंतर मुख्याधिकारी बन्नोरे सभागृहातून निघून गेले. त्यानंतर तीव्र नाराजी व्यक्त करीत नगराध्यक्ष निर्मला मडके यांनी ही सर्वसाधारण सभा तहकूब केली.
यावेळी उपाध्यक्ष रमेश चौधरी यांनी सांगितले की, नगर पालिका अधिनियम ५८/२ नुसार विकास कामांचे व पालिकेतील दैनंदिन कामांबाबत सभागृहात कार्योत्तर मंजुरी घेण्याचा पालिकेच्या अध्यक्षांना अधिकार आहे. मात्र मुख्याधिकारी बन्नोरे यांनी सभागृहाची मान्यता न घेता शहरातील नाली सफाईच्या कामाच्या कंत्राटाबाबत तिनदा निविदा काढली. अपूर्ण कागदपत्र असतानाही एका संस्थेला कंत्राट देण्याचा मुख्याधिकारी बन्नोरे यांचा प्रयत्न होता. मात्र पदाधिकाऱ्यांकडून विरोध झाल्यामुळे त्या संस्थेचा निविदा टेंडर रद्द करण्यात आला, अशी माहिती चौधरी यांनी दिली. मुख्याधिकाऱ्यांच्या कार्यप्रणालीमुळे शहरात अस्वच्छतेचा प्रश्न निर्माण झाल्याचा आरोप चौधरी यांनी केला. (स्थानिक प्रतिनिधी)

सीओंच्या कक्षाला कुलूप ठोकणार
मुख्याधिकारी बन्नोरे यांच्यावर निलंबनाची व बेशिस्त कर्मचाऱ्यावर वेतनवाढ रोखण्याची कारवाई करावी, या मागणीचे निवेदन न. प. च्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना दिले. कारवाई न झाल्यास येत्या दोन दिवसांत सीओंच्या कक्षाला कुलूप ठोकणार, असा इशारा पदाधिकाऱ्यांनी दिला.
पालिकेचे मुख्याधिकारी गिरीश बन्नोरे यांच्या हेकेखोर प्रवृत्तीतून पालिकेचा कारभार सुरू आहे. चर्चा न करता परस्पर नगर परिषदेतील १५० च्यावर अधिक कंत्राटी कर्मचाऱ्यांना कामावरून बंद केले. यामुळे नगर परिषद कार्यालयाचा कामकाज मंदावला आहे. १ एप्रिलपासून शहरातील नाली स्वच्छता बंद आहे. असा आरोप उपाध्यक्ष रमेश चौधरी यांनी केला.