शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
2
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
3
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
4
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
5
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
6
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
7
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
8
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
9
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
10
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
11
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
12
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
13
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
14
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
15
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
16
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
17
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
18
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
19
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
20
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
Daily Top 2Weekly Top 5

१४ वर्षांनंतर उघडले मंदिराचे द्वार

By admin | Updated: August 26, 2016 01:14 IST

गावाशेजारी असलेल्या जुन्या पडक्या हनुमान मंदिराचे नव्याने बांधकाम १९९४ मध्ये सुकाळा येथील ग्रामस्थांनी केले होते.

सुकाळा येथील घटना : भगवान हनुमानाला केले होते बंदिस्तवैरागड : गावाशेजारी असलेल्या जुन्या पडक्या हनुमान मंदिराचे नव्याने बांधकाम १९९४ मध्ये सुकाळा येथील ग्रामस्थांनी केले होते. परंतु शासकीय सेवेतील सेवानिवृत्त अधिकारी सुकाळा येथील नागरिक बाबुराव नीलकंठ राऊत यांनी मंदिरावर आणि मंदिर परिसरातील जागेवर आपला हक्क सांगितला आणि २०१३ मध्ये बेकायदेशीररित्या गाव नमुना- ८ मध्ये नोंदणी करून सार्वजनिक मंदिरातील मूर्तीला बंदिस्त करून ठेवले. सलग १४ वर्षे मंदिर दुर्लक्षित राहिल्यानंतर मंगळवार २३ आॅगस्ट रोजी मंदिर गावकऱ्यांच्या पुढाकाराने दर्शनासाठी खुले करण्यात आले. पुराना वैैरागड म्हणून महसूल दप्तरी सुकाळाची नोंद आहे. गाव वेगळे झाल्यानंतर येथे जुनाट हनुमानाचे मंदिर होते. सगळे ग्रामस्थ या मंदिरात पूजाअर्चा करायचे. काकड आरती, कार्तिक पौर्णिमेचा काला या ठिकाणी होत असे. परंतु त्यानंतर बाबुराव नीलकंठ राऊत यांनी मंदिरावर व मंदिर परिसरातील मोकळ्या जागेवर आपली मालकी सांगितली आणि देवालाच बंदिस्त केले. इतकेच नव्हे तर राऊत कुटुंबीयांकडून या मंदिरातील मूर्त्यांची विटंबना करण्यात आली. धानाचे पोते व इतर वस्तू ठेवण्यासाठी मंदिराचा वापर केला. सुकाळावासीयांनी याबाबत आरमोरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करून शेवटी ठाणेदार पाटील यांच्या मध्यस्थीने मंगळवारी मंदिरात पूजाअर्चा करून सरपंच प्रतिभा नैैताम यांनी मंदिराचे दरवाजे खुले केले. यावेळी जि. प. सदस्य लक्ष्मी मने, राजू अंबानी, उपसरपंच किशोर वाटगुरे, तंमुस अध्यक्ष भारत भैसारे, दयाराम मडावी, रामदास वाटगुरे, बालाजी मोहुर्ले, निंबाजी सोनटक्के, गुलाब सांगोळकर, सत्यवान कुमरे, जगन मेश्राम, मोतिराम कोल्हे, हरेष इन्कणे, मोतिराम गुरनुले, लोमेश्वर पेंदाम, सुशीला आत्राम, सिंधू आत्राम, कमल कोल्हे, कांता भोयर, लक्ष्मी इन्कणे, यशोदा मडावी व ग्रामस्थ उपस्थित होते. (वार्ताहर)