शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
4
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
5
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
6
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
7
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
8
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
9
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
10
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
11
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
12
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
13
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
14
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
15
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
16
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
17
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
18
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
19
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
20
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
Daily Top 2Weekly Top 5

रेशीम लागवडीला रोजगार हमी योजनेचे बळ

By admin | Updated: October 29, 2014 22:50 IST

रेशीम लागवडीचे काम आता रोजगार हमी योजनेच्या माध्यमातूनही करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यामुळे रोहयो मजुरांना वर्षभर काम मिळण्याबरोबरच रेशीम लागवड शेतकऱ्यालाही मजूर मिळणार आहेत.

गडचिरोली : रेशीम लागवडीचे काम आता रोजगार हमी योजनेच्या माध्यमातूनही करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यामुळे रोहयो मजुरांना वर्षभर काम मिळण्याबरोबरच रेशीम लागवड शेतकऱ्यालाही मजूर मिळणार आहेत. गडचिरोली जिल्ह्यात कुरखेडा, गडचिरोली, आरमोरी तालुक्यात रेशीमचे उत्पादन घेतले जाते. यातून शेकडो नागरिकांना रोजगार मिळत आहे. आरमोरी येथे रेशीमचे स्वतंत्र कार्यालयात स्थापन करण्यात आले आहे. झाडांवर रेशीम किडे सोडून त्यांची देखभाल केली जाते. गडचिरोली जिल्ह्यात ५०० हून अधिक हेक्टरवर रेशीमची शेती केल्या जाते. रेशीम उत्पादन हा शेतीशी संबंधित व्यवसाय असला तरी रेशीम उत्पादनाची कामे रोहयोच्या माध्यमातून करण्यास शासनाची परवानगी नव्हती. त्यामुळे रोहयो मजूर रेशीम उत्पादनाचे काम करतांना दिसून येत नव्हते. मात्र राज्य शासनाने नुकत्याच घेतलेल्या निर्णयानुसार रोहयो मजुरांना रेशीम उत्पादनाचेही काम दिले जाणार आहे. रेशीम उत्पादन हा वर्षभर चालणारा व्यवसाय आहे. त्यामुळे रेशीमच्या माध्यमातून रोजगार हमी योजनेच्या मजुरांना जास्तीत जास्त रोजगार मिळण्यास मदत होणार आहे. रेशीम किडे सोडणे, त्यांचे संगोपण करणे, झाडांची छाटणी करणे, रेशीम किडे गोळा करणे आदी कामांसाठी शेकडो मजुरांची गरज भासत होती. वेळेवर मजूर न मिळाल्याने वेळप्रसंगी तोटाही सहन करावा लागत होता. यातून आता रेशीम उत्पादकांची सुटका होण्यास मदत होणार आहे. या योजनेंतर्गत प्रत्येक लाभार्थ्यासाठी १ लाख ९६ हजाराचे अंदाजपत्रक तयार करावे लागणार असून त्यामध्ये नऊ हजार रूपये लाभार्थ्याचा भत्ता राहणार आहे. अजूनपर्यंत जिल्ह्यात लाभार्थ्यांची निवड करण्यात आली नसल्याची माहिती आहे. (नगर प्रतिनिधी)