शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत मशिदीत अंदाधुंद गोळीबार; दोन अल्पवयीन संशयितांसह ५ जणांचा मृत्यू, पोलिसांकडून 'हेट क्राईम' घोषित
2
SRH चा 'ई'शानदार विजय! आपल्यासोबत GT लाही मिळवून दिलं प्लेऑफ्सचं तिकीट; CSK चं काय?
3
उद्योगपती गौतम अदानी यांना मोठा दिलासा! अमेरिकेच्या न्याय विभागाने सर्व फौजदारी खटले केले बंद
4
आफ्रिकेत इबोला व्हायरसचा धोका वाढला, भारत सरकार 'अलर्ट मोड'वर, तपासणी अधिक तीव्र
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला नॉर्वेचा सर्वोच्च सन्मान; जगातील ३२वा मानाचा पुरस्कार प्रदान
6
चेन्नई सुपर किंग्सचा डाव संपल्यावर MS धोनी मैदानात उतरला; फोटो सेशनसह त्याचा IPL प्रवास थांबला? (VIDEO)
7
हिंदू बांधव रस्त्यावर पूजा करतात, एअरपोर्टवर गरबा खेळतात, आम्ही काही बोलतो का?- वारिस पठाण
8
संतापजनक! कार-टमटम अपघातात ५ जण गंभीर जखमी; अर्धा तास उलटूनही रुग्णवाहिकेचा पत्ताच नाही...
9
संजूचा आणखी एक पराक्रम! पठ्ठ्यानं MS धोनीचा १३ वर्षांपासून अबाधित असलेला सर्वकालीन विक्रम मोडला
10
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
11
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
12
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
13
चालत्या रस्त्यावर किंवा जाममध्ये मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली तर चूक नक्की कुणाची? वाचा काय सांगतो ट्रॅफिक नियम
14
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
15
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
16
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
17
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
18
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
19
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
20
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाच्या सावटात कर्मचाऱ्यांचे कामबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2020 05:01 IST

राष्ट्रीय आरोग्य कर्मचारी मागील १० वर्षांपासून विविध पदांवर कंत्राटी तत्त्वावर काम करीत आहेत. त्यांना तुटपुंजे मानधन दिले जात आहे. आरोग्य विभागातील विविध पदांची जबाबदारी कंत्राटी तत्त्वावर असलेले अधिकारी व कर्मचारी सक्षमरित्या पार पाडत आहेत. यातील बहुतांश कर्मचाऱ्यांची शासकीय नोकरी लागण्याची वयोमर्यादा निघून गेली आहे.

ठळक मुद्देएनएचएम कर्मचाऱ्यांचे गुरूवारपासून आंदोलन : सेवेत कायम करण्याची मागणी; आरोग्य सेवा विस्कटण्याची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्क
आष्टी/कुरखेडा : शासन सेवेत बिनशर्त सामावून घ्यावे या मुख्य मागणीसाठी एनएचएम कर्मचाºयांनी ११ जूनपासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले आहे. राज्यभरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. अशा परिस्थितीत आरोग्य कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन सुरू केल्याने आरोग्य व्यवस्था विस्कळीत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
राष्ट्रीय आरोग्य कर्मचारी मागील १० वर्षांपासून विविध पदांवर कंत्राटी तत्त्वावर काम करीत आहेत. त्यांना तुटपुंजे मानधन दिले जात आहे. आरोग्य विभागातील विविध पदांची जबाबदारी कंत्राटी तत्त्वावर असलेले अधिकारी व कर्मचारी सक्षमरित्या पार पाडत आहेत. यातील बहुतांश कर्मचाऱ्यांची शासकीय नोकरी लागण्याची वयोमर्यादा निघून गेली आहे. मात्र या कर्मचाऱ्यांना आरोग्य विभागात काम करण्याचा अनुभव आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत सामावून घेण्याची मागणी मागील अनेक वर्षांपासून सदर कर्मचारी करीत आहेत. आजपर्यंत अनेकवेळा लोकशाही मार्गाने आंदोलने केली आहेत. मात्र त्यांच्या मागणीकडे शासन जाणूनबुजून दुर्लक्ष करीत आहे. सध्या राज्यभरात कोविड-१९ या आजाराची साथ पसरली आहे. गडचिरोली जिल्ह्यातही बिकट परिस्थिती आहे. तरीही एनएचएम कर्मचारी स्वत:चा जीव धोक्यात घालून रुग्णांना सेवा देत आहेत. एनएचएम कर्मचाºयांच्या मागणीचा विचार करून त्यांना सेवेत कायम करावे, या मागणीसाठी गुरूवारपासून कामबंद आंदोलन सुरू केले आहे.
जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. अशा स्थितीत आंदोलनाचे हत्यार उपसले असल्याने रुग्णांची गैरसोय होण्याची शक्यता आहे. आष्टी येथील एनएचएम कर्मचाऱ्यांनी ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांना निवेदन देऊन कामबंद आंदोलन सुरू केले. निवेदन देतेवेळी डॉ.प्रशांत धाकडे, डॉ.मृणालीनी उईके, श्रीदेवी पुप्पलवार, आशा सोनवाने, करिष्मा पेरमवार, मनोज बघमारे, गेमचंद गोंगले हजर होते. जोपर्यंत मागणी मान्य होत नाही. तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा दिला आहे.

देसाईगंजात निवेदन
देसाईगंज - येथील ग्रामीण रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांनी सुद्धा कामबंद आंदोलन सुरू केले आहे. याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी व मुख्याधिकारी यांना पाठविण्यात आले आहे. कामबंद आंदोलनात संगीता सरदार, कुंदा सहारे, किरण शिंदे, अरूण खरमाटे, अशोक जयसिंगपुरे, बाजीराव कांबळे, दिलीप उटाणे या एनएचएमच्या कर्मचाºयांनी सहभाग घेतला आहे.

कुरखेडातील कर्मचारी आंदोलनावर
कुरखेडा - उपजिल्हा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.संभाजी ठाकर यांच्यामार्फत शासनाकडे निवेदन पाठविले. यावेळी राष्ट्रीय आरोग्य अभियान अधिकारी, कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष प्रशांत बांबोळे, हेमंत बोरकर, विनोद दुफारे, धम्मप्रिया झाडे, टिकेश्वरी करमकर, शुभांगी गहाणे, ममता कन्नाके, निशा चचाणे, डॉ.जगदीश राऊत, डॉ.प्रिया जुमनाके, डॉ.अर्चना ठलाल, डॉ.योगेश मानकर, डॉ.स्नेहा कृपाल, डॉ.तुषार बावनकुडे, फाजिल शेख, स्वाती मांडरे, चेतना भैसारे, अस्मिता सुरपाम, प्रियंका म्हशाखेत्री, मेघा राणे, कल्पना भट्ट, रश्मी मोगरे, सुषमा झंझाळ, आनंद नैताम, जावेद शेख, इरफान खान, प्रियंका धमगाये हजर होते.

टॅग्स :Socialसामाजिक