शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
4
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
5
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
6
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
7
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
8
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
9
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
10
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
11
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
12
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
13
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
14
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
15
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
16
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
17
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
18
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
19
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
20
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
Daily Top 2Weekly Top 5

चारोळीने दिला शेकडोंना रोजगार

By admin | Updated: January 18, 2016 01:34 IST

जिल्ह्यातील जंगलामध्ये मोठ्या प्रमाणात चाराची झाडे आहेत. चारांच्या बिया विक्री करण्याची व्यवस्था नसल्याने ....

८६ लाख रूपयांच्या चारोळीची विक्री : गडचिरोली वन विभागांतर्गत सर्वाधिक संकलनगडचिरोली : जिल्ह्यातील जंगलामध्ये मोठ्या प्रमाणात चाराची झाडे आहेत. चारांच्या बिया विक्री करण्याची व्यवस्था नसल्याने सदर बिया फेकून दिल्या जात होत्या. मात्र वन विभागाने या बिया खरेदी करण्यास सुरूवात केल्याने या बियांच्या माध्यमातून शेकडो कुटुंबांना रोजगार उपलब्ध झाला आहे. वर्षभरात सुमारे ८६ लाख ५० हजार रूपयांची चारोळी वन विभागाने खरेदी केली आहे. गडचिरोली जिल्ह्याच्या जंगलात मोहफूल, हिरडा, चारोळी, आवळा, बेहडा, करंज, कुसूम आदी प्रकारचे प्रकारचे झाडे आहेत. औषधी गुणधर्म असलेली सदर झाडे असल्याने त्यांना विशेष मागणी आहे. सदर वनोपज दुर्गम भागातील आदिवासी अत्यंत मेहनत करून गोळा करीत असले तरी त्यांना व्यापाऱ्यांकडून योग्य भाव दिला जात नव्हता. त्यामुळे अनेकांनी वनोपज संकलन करणेही बंद केले होते. वन विभागाने पुढाकार घेत आदिवासी स्वत: खरेदी करण्यास सुरूवात केली आहे. वन विभागामुळे वनोपजाला अधिकृत खरेदीदार प्राप्त झाला आहे. गडचिरोली वन विभागांतर्गत ४९ लाख ५७ हजार ७१४ रूपये किमतीचे सुमारे ४०० क्विंटल, वडसा वन विभागांतर्गत १३८ क्विंटल, आलापल्ली वन विभागांतर्गत १५० क्विंटल, भामरागड वन विभागांतर्गत १३० व सिरोंचा वन विभागांतर्गत पाच क्विंटल अशी एकूण ८२३ क्विंटल चारोळी खरेदी करण्यात आली. या सर्वांची किमत ८६ लाख ५० हजार ८५४ रूपये एवढी आहे. मागील वर्षी पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात गौण वनोपजाची खरेदी करण्यात आली आहे. वन विभागाच्या मार्फतीने योग्य भाव मिळत असल्याने दुर्गम भागातील नागरिक वनोपज खरेदी करण्याकडे वळत चालला आहे. चारोळीबरोबरच ५६ हजार रूपयांचा हिरडा, ४ लाख ३४ हजार ६१ रूपयांचे डिंक, ५ लाख २८ हजार १३८ रूपयांचे कुसूम गोळा करण्यात आले आहे. चारोळीला राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय बाजारात चांगली मागणी आहे. त्याचबरोबर गडचिरोली येथील चारांचा दर्जा इतर भागातील चारांच्या अतिशय चांगला आहे. त्यामुळे गडचिरोलीच्या चार बियांना अत्यंत चांगली मागणी आहे. परिणामी गडचिरोलीच्या जंगलातील चार बिया हातोहात खपत असल्याचा अनुभव वन विभागाला आला असल्याने वन विभाग सुध्दा स्वत: खरेदी करण्यास इच्छुक आहे. वनोपजाच्या माध्यमातून शेकडो कुटुंबांना बारमाही रोजगार उपलब्ध होण्यास मदत झाली आहे. (नगर प्रतिनिधी)