आंधळी येथील घटना : जनावर मालकही जखमीकुरखेडा : तालुक्यातील आंधळी येथे बुधवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास वीज पडून गोठ्यातील दोन बैल ठार तर जनावरे बांधण्यासाठी गेलेला जनावर मालक जखमी झाल्याची घटना घडली.विलास चैतराम भोंडे रा. आंधळी असे जखमी इसमाचे नाव आहे. या घटनेत विलास चैतराम भोंडे यांचे दोन बैल वीज पडून जागीच ठार झाले. बुधवारी सायंकाळी विलास भोंडे हे आपले बैल बांधण्यासाठी गोठ्यात गेले. दरम्यान वीज पडल्याने दोन्ही बैल ठार झाले. तसेच विजेचा आघात होऊन विलास भोंडे हे जखमी झाले. त्यांना लागलीच आंधळीचे सरपंच विनोद नैताम, ग्रा. पं. सदस्य विनोद खुणे, हेमंत सेंद्रे, दशरथ लाडे, सितकुरा गाडेगोणे, पोलीस पाटील प्रकाश जनबंधू यांनी १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेने उपचारासाठी कुरखेडाच्या रुग्णालयात दाखल केले. बैल ठार झाल्याने भोंडे यांचे ६० हजार रूपयांचे नुकसान झाले आहे. पं. स. सदस्य चांगदेव फाये यांनी जखमी भोंडे यांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली.
वीज पडून दोन बैल ठार
By admin | Updated: September 24, 2015 01:47 IST
तालुक्यातील आंधळी येथे बुधवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास वीज पडून गोठ्यातील दोन बैल ठार तर जनावरे ...
वीज पडून दोन बैल ठार
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}