शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
2
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
3
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
4
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
5
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
6
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
7
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
8
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
9
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
10
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
11
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
12
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
13
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
14
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
15
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
16
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
17
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
18
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
19
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
20
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

पहिल्या टप्प्यातील मतदानासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 04:30 IST

गडचिरोली : ग्रामपंचायत निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी शुक्रवार, दि.१५ रोजी मतदान होत आहे. त्यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे. उत्तर ...

गडचिरोली : ग्रामपंचायत निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी शुक्रवार, दि.१५ रोजी मतदान होत आहे. त्यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे. उत्तर भागातील ६ तालुक्यांपैकी कोरची आणि धानोरा तालुक्यातील संवेदनशील मतदान केंद्रांवर ड्युटी लागलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना बुधवारी हेलिकॉप्टरने बेस कॅम्पवर पोहोचवण्यात आले. इतर केंद्रांवरील कर्मचारी गुरुवारी रवाना होतील.

कोरची, कुरखेडा, देसाईगंज, आरमोरी, धानोरा आणि गडचिरोली या सहा तालुक्यांमध्ये शुक्रवारी मतदान होणार आहे. या तालुक्यांमध्ये एकही नामांकन दाखल न झालेल्या २ ग्रामपंचायती आहेत. तसेच १३ ग्रामपंचायतींमध्ये सदस्यांची पूर्णपणे बिनविरोध निवड झाली आहे. याशिवाय १३ ग्रामपंचायतींमध्ये काही जागा बिनविरोध निवडल्या गेल्या तर काही जागांवरील नामांकन वैध ठरले नाही. त्या १३ ग्रामपंचायतींमध्येही प्रत्यक्ष मतदान होणार नाही. आता मतदानासाठी १७० ग्रामपंचायती उरल्या असून, त्यातील ११२४ जागांसाठी प्रत्यक्ष मतदान होणार आहे.

एकूण ६१८ केंद्रांवर मतदान होणार आहे. प्रत्येक केंद्रावर ४ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस व इतर सुरक्षा दल कार्यरत राहणार आहे.

धानोरा तालुक्यातील दोन ग्रामपंचायतींमध्ये एकही नामनिर्देशनपत्र दाखल न झाल्याने त्या ठिकाणी मतदान होणार नाही. तसेच पूर्णत: बिनविरोध होणाऱ्या ग्रामपंचायतींमध्ये गडचिरोली व कोरची तालुक्यात प्रत्येकी ४, आरमोरी व धानोरा तालुक्यात प्रत्येकी २ आणि कुरखेडा तालुक्यातील एका ग्रामपंचायतीचा समावेश आहे.

(बॉक्स)

मतदानाच्या दिवशी सुटी किंवा दोन तासांची सवलत

- राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केल्यानुसार मतदानाची वेळ सकाळी ७.३० ते दुपारी ३ वाजेपर्यंत राहणार आहे. सर्व मतदारांना मतदानाचा हक्क योग्यरीतीने बजावता यावा यासाठी शासनाकडून परिपत्रकाच्या आधारे सूचना करण्यात आली आहे. निवडणूक होणाऱ्या मतदान क्षेत्रात मतदार असलेले कामगार/अधिकारी/कर्मचारी यांना निवडणुकीच्या दिवशी भरपगारी सुटी देण्याची सूचना करण्यात आली आहे.

- अपवादात्मक परिस्थितीत कामगार, अधिकारी, कर्मचारी इत्यादींना पूर्ण दिवस सुटी देणे शक्य नसेल तर मतदान क्षेत्रातील कामगारांना हक्क बजावण्यासाठी केवळ दोन ते तीन तासांची सवलत देता येईल. अशी सवलत न देणाऱ्यांबद्दल तक्रार आल्यास योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी गडचिरोली यांनी कळविले आहे.