शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: केंद्रीय कायदामंत्र्यांनी लोकसभेत सादर केले सीमांकन विधेयक; संसदेत गदारोळ
3
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
4
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
5
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
6
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
7
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
8
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
9
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
10
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
11
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
12
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
13
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
14
१७३ वर्षांपूर्वी प्रथम धावली, ४०० जणांचा प्रवास; आजही सेवेत, भारतीय रेल्वेची ‘ती’ ट्रेन कोणती?
15
विराट कोहली सामना संपल्यावर स्वत:हून LSGचे मालक संजीव गोयंकांना भेटायला गेला, फोटो VIRAL
16
अक्षय्य तृतीयेपूर्वीच सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं तेजी; पाहा काय आहेत २४k, 22k, 18k सोन्याचा लेटेस्ट भाव
17
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
18
'प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते'; मेहतांच्या विधानाने वाद, सरनाईक म्हणाले, "दुर्लक्ष करतोय पण..."
19
स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा! महिला अत्याचाराच्या आरोपाखाली जाऊन आलाय तुरुंगात
20
करण-तेजस्वीचं झालंय 'सीक्रेट वेडिंग?' सोशल मीडियावर चर्चा; अखेर अभिनेत्याने सोडलं मौन
Daily Top 2Weekly Top 5

बैलबंड्यांच्या माध्यमातून रेती तस्करीचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2019 06:00 IST

पावसाळा संपल्याने आता गडचिरोली शहरात घर बांधकामांना वेग आला आहे. मात्र ३० सप्टेंबरला रेती घाटांची मुदत संपली आहे. ज्या रेती कंत्राटदारांकडे स्टॉक परमिट आहे, असेच कंत्राटदार रेतीची वैध पद्धतीने विक्री करीत आहेत. रेतीची मागणी वाढली असल्याने रेतीचे भाव तीन ते चार हजार रुपये प्रतीब्रासवर पोहोचले आहेत.

ठळक मुद्देचार गाड्यांवर कारवाई : बोरमाळा घाटावरून नेत होते रेती

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : ट्रॅक्टर किंवा इतर वाहनांवर होणारी कारवाई टाळण्यासोबतच विभागाच्या डोळ्यात धूळफेक करण्यासाठी काही रेती तस्करांनी बैलबंड्यांच्या माध्यमातून रेतीची वाहतूक करणे सुरू केले आहे. बोरमाळा नदीघाटातून अशाच पद्धतीने होणारा रेती चोरीचा प्रयत्न हाणून पाडत गडचिरोली तहसील कार्यालयाने चार बैलबंड्या जप्त केल्या आहेत. प्रत्येक बंडीवर सुमारे ८ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.पावसाळा संपल्याने आता गडचिरोली शहरात घर बांधकामांना वेग आला आहे. मात्र ३० सप्टेंबरला रेती घाटांची मुदत संपली आहे. ज्या रेती कंत्राटदारांकडे स्टॉक परमिट आहे, असेच कंत्राटदार रेतीची वैध पद्धतीने विक्री करीत आहेत. रेतीची मागणी वाढली असल्याने रेतीचे भाव तीन ते चार हजार रुपये प्रतीब्रासवर पोहोचले आहेत. रेतीची अवैध वाहतूक करताना आढळून आल्यास संबंधित ट्रॅक्टरवर १ लाख १३ हजार रुपयांचा दंड बसतो. त्यामुळे ट्रॅक्टर मालक प्रत्यक्ष नदीतून रेतीची चोरी करण्याची हिंमत करीत नाही. मात्र रेती तस्करीसाठी बैलबंडींचा वापर मात्र वाढला आहे.गडचिरोली शहरापासून तीन किमी अंतरावर वैनगंगा नदी आहे. या नदीवरील बोरमाळा घाटावरून शहरात बैलबंडीच्या सहाय्याने मागील आठ ते दहा दिवसांपासून रेती आणली जात होती. याबाबतची गोपनीय माहिती गडचिरोलीचे तहसीलदार महेंद्र गणवीर यांना मिळाली. त्यांनी कारगिल चौकात पाळत ठेवून रेती चोरी करणाऱ्या बैलबंड्यांवर जप्तीची कारवाई केली. या बैलबंड्यावर प्रत्येकी ८ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. सर्व बंड्या रेतीसह तहसील कार्यालयात जमा करण्यात आल्या आहेत. दंड भरल्यानंतरच त्यांना सोडले जाणार आहे.सदर बंड्या गडचिरोली येथील हनुमान वॉर्डातील योगेश मधुकर धोडरे, सुधाकर बुधाजी धोडरे, विनोद तुळशिराम बारसागडे, ढिवर मोहल्ल्यातील अनिल माधव टिंगुसले यांच्या मालकीच्या आहेत.ट्रॅक्टर मालक खातात मलाईनदीघाटातून ट्रॅक्टरच्या सहाय्याने शहरात रेती आणताना पकडले जाण्याची भीती राहते. ट्रॅक्टर पकडले गेल्यास मोठा दंड ठोठावला जातो. त्यामुळे ट्रॅक्टरच्या सहाय्याने नदीतून रेती आणण्याची हिंमत ट्रॅक्टरमालक करीत नाही. बैलबंडी मालकांकडून २०० रुपये प्रती बैलबंडी या दराने रेती खरेदी केली जाते. एका विशिष्ट ठिकाणी रेती टाकून ढीग तयार केला जातो. त्यानंतर ट्रॅक्टर मालक ३५०० ते ४००० रुपये प्रतिट्रॅक्टर या दराने ती रेती शहरातील बांधकाम व्यावसायिकांना विकतात. यामध्ये प्रती ट्रॅक्टर दोन ते तीन हजार रुपयांची कमाई ट्रॅक्टरमालक करीत आहेत. हा गोरखधंदा गडचिरोली शहरात प्रचंड प्रमाणात वाढला आहे. बैलबंडीने स्वत:च्या घरासाठी रेती नेली जात असावी, असा अंदाज महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचारी बांधत होते. मात्र बैलबंडीने रेती आणून तिची विक्री केली जात असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे बैलबंडी मालकही आता महसूल विभागाच्या रडारवर आहेत.

टॅग्स :sandवाळू