शिक्षण आयुक्तांचा विसोरा शाळेत विद्यार्थ्यांशी संवाद

By Admin | Updated: January 20, 2016 02:57 IST2016-01-20T02:57:59+5:302016-01-20T02:57:59+5:30

गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेले राज्याचे शिक्षण आयुक्त डॉ. पुरूषोत्तम भापकर यांनी देसाईगंज तालुक्यातील विसोरा

Education Commissioner's interaction with students in Vishara school | शिक्षण आयुक्तांचा विसोरा शाळेत विद्यार्थ्यांशी संवाद

शिक्षण आयुक्तांचा विसोरा शाळेत विद्यार्थ्यांशी संवाद

विसोरा : गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेले राज्याचे शिक्षण आयुक्त डॉ. पुरूषोत्तम भापकर यांनी देसाईगंज तालुक्यातील विसोरा जिल्हा परिषद शाळेला मंगळवारी भेट देऊन येथील विद्यार्थ्यांची मुक्त संवाद साधला.
गडचिरोली जिल्ह्यात प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र हा उपक्रम राबविला जात आहे. या उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातील सर्वच शाळा शिक्षण आयुक्तांनी दत्तक घेतल्या आहेत. जिल्ह्यातील अनेक शाळांमध्ये विविध उपक्रमांतर्गत शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी काम सुरू आहे. या कामाची पाहणी करण्याच्याच उद्देशाने विसोरा जिल्हा परिषद शाळेला भेट देऊन तेथील विद्यार्थ्यांशी त्यांनी चर्चा केली. याप्रसंगी भापकर यांनी शाळाबाह्य, विद्यार्थ्यांच्या समस्यावर शिक्षकांशीही जि.प. शाळेत चर्चा केली. यावेळी शिक्षकांनीही अनेक अडचणी आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिल्या. विद्यार्थिनींना विविध विषयांबाबत त्यांनी प्रश्न विचारले. (वार्ताहर)

बसस्थानकावर विद्यार्थिनींशी बोलले
४विनायक विद्यालयात शिक्षण घेणाऱ्या अकरावी, बारावीच्या कसारी, शंकरपूर येथील विद्यार्थिनी एसटीची प्रतीक्षा करीत बसल्या असताना आयुक्त भापकर तेथे पोहोचले. त्यांनी या मुलींशीही संवाद साधला. वेळेवर बस येत नाही, आली तर कधीकधी आम्हाला बसमध्ये घेतही नाही, अशी माहिती विद्यार्थिनींनी आयुक्त भापकर यांना यावेळी दिली. या संदर्भात आपण जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करू, असे त्यांनी विद्यार्थिनीला सांगितले.

Web Title: Education Commissioner's interaction with students in Vishara school