शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाचे परराष्ट्र मंत्री PM मोदींना भेटले; तेल संकट, युक्रेन, परस्पर संबंध वाढवण्यावर चर्चा
2
देशातील परिस्थिती गंभीर, सर्वपक्षीय बैठक बोलवा, त्यात पंतप्रधानांनी हजर राहावे- शरद पवार
3
CM देवेंद्र फडणवीसांनी चालवलेली बुलेट कुणाची? PUC वरून काँग्रेस-भाजपात का जुंपली?
4
Jasprit Bumrah : १३ वर्षांचा प्रवास; जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार! हार्दिक पांड्याचा विषय संपला?
5
ममता बॅनर्जी खरंच वकील आहेत का, कागदपत्र सादर करा; बार कौन्सिलचे निर्देश, झाले तरी काय?
6
Vaibhav Suryavanshi In India A Squad : वैभव सूर्यवंशीला BCCI चं मोठं गिफ्ट; भारतीय ‘अ’ संघात निवड
7
PM मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद, अग्रगण्य कंपनीचा मोठा निर्णय; 'अनावश्यक खर्च' टाळण्यासाठी बनवला मास्टर प्लॅन
8
Top Marathi News Live Updates: राष्ट्रवादी अजितदादा गटाला सोडचिठ्ठी देणारे आनंद परांजपे शिंदेंच्या शिवसेनेत जाणार
9
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
10
अंगावर शहारा आणणारी घटना! वादळात टीनशेडसोबत 'नन्हे मियाँ'ही उडाले अन्...; थरार कॅमेऱ्यात कैद -  बघा VIDEO
11
PM मोदींच्या आवाहनाला गडकरींचाही प्रतिसाद, बसने प्रवास करत केली पालखी महामार्गाच्या कामांची पाहणी; दौरा सुरू असतानाच...
12
PBKS vs MI : भावा कसा आहेस? रोहित शर्मा-श्रेयस अय्यरचा व्हिडिओ पाहिलात का?
13
HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
14
Raj Thackeray : “२२ लाख मुलांचं आणि त्यांच्या कुटुंबीयांचं आयुष्य टांगणीला लागलं त्याचं काय?”, राज ठाकरेंचा सवाल
15
PCOS नाही, आता PMOS! ८ पैकी १ ‘या’ समस्येने त्रस्त; १७ कोटी महिलांच्या आरोग्यावर थेट परिणाम
16
नाशिक-पुणे, सिंधुदुर्ग-रत्नागिरीसाठी बड्या तरतुदी मान्य; राज्य मंत्रिमंडळाचे १४ मोठे निर्णय
17
मासिक शिवरात्रि व्रत २०२६: महादेव मनोकामना पूर्ण करतील, यश मिळेल, सुख लाभेल; ‘असे’ करा व्रत!
18
Travel : अवघ्या २५ हजारांत करा 'भारताच्या स्कॉटलँड'ची ट्रिप! बजेट प्लॅनिंगसाठी फॉलो करा 'या' खास टिप्स
19
Video - मुलींना बेदम मारलं, मुलाला उलटं टांगलं; शिक्षक झाला हैवान, शाळेतील धक्कादायक प्रकार
20
Instagram अकाउंट अचानक बॅन झालंय? घाबरू नका! 'या' सोप्या ट्रिकने मिनिटांत होईल रिकव्हर
Daily Top 2Weekly Top 5

ईको चुलीने दोन रूपयात स्वयंपाक

By admin | Updated: July 8, 2015 02:01 IST

वन विभागाने ईको चूल निर्माण केली असून सदर चुलीच्या माध्यमातून केवळ दोन रूपयांच्या खर्चात कुटुंबाचा स्वयंपाक होतो.

वन विभागाचा उपक्रम : पॅलेटस्वर चालते ईको चूल
प्रतीक मुधोळकर अहेरी
वन विभागाने ईको चूल निर्माण केली असून सदर चुलीच्या माध्यमातून केवळ दोन रूपयांच्या खर्चात कुटुंबाचा स्वयंपाक होतो. विशेष म्हणजे या चुलीच्या वापरामुळे पर्यावरणास कोणतीही हानी निर्माण होत नाही.
शहरातील जवळपास सर्वच कुटुंब स्वयंपाकासाठी एलपीजी गॅसचा वापर करीत असले तरी ग्रामीण कुटुंबाला तेवढा खर्च करणे अशक्य राहते. त्याचबरोबर ग्रामीण भागात गॅसही उपलब्ध होत नाही. परिणामी ग्रामीण भागातील बहुतांश नागरिक पारंपरिक चुलीच्या माध्यमातून स्वयंपाक करतात. मात्र सदर चुलीमुळे इंधन जास्त लागते. त्याचबरोबर धूर निघत असल्याने स्वयंपाक करणाऱ्या महिलेच्या आरोग्यास धोका निर्माण होतो. पर्यावरणाची हानीही मोठ्याप्रमाणात होते. जंगलाची तोड करावी लागते.
या सर्वांवर उपाय म्हणून वन विभागाने ईको चूल निर्माण केली आहे. आलापल्ली वन विभागाच्या मार्फतीने या चुलीचे प्रदर्शन गावोगावी लावले जात असून नागरिकांना याबद्दलची माहिती दिली जात आहे. लहान ईको चुलीची किंमत २ हजार ५०० रूपये तर मोठ्या चुलीची किंमत ७ हजार ५०० रूपये आहे. एकदा थोडेफार पैसे खर्च होत असले तरी त्यामुळे होणाऱ्या बचतीमुळे नागरिकांचा फायदाच होणार आहे. आलापल्ली वन विभागातील वनरक्षक प्रभाकर आनकरी, सीनू आडे, वासुदेव घुगलोत व एकलव्य लोकसेवा संस्था आलापल्लीचे सदस्य गावोगावी जाऊन ईको चुलीबद्दलची माहिती देत आहेत. या चुलीचे उत्पादन वाढल्यानंतर सदर चूल खुल्या बाजारात नागरिकांना उपलब्ध करून दिली जाणार आहे. गडचिरोली जिल्ह्यातील ग्रामीण भागातील नागरिकांसाठी सदर चूल अत्यंत फायद्याची ठरणार असल्याची माहिती वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
अशा पद्धतीने ईको चूल होते कार्यान्वित
ही चूल बॅटरीवर चालत असून इंधन म्हणून पॅलेटस्चा वापर केला जातो. सदर पॅलेटस् पालापाचोळा, कृषी अवशेष, बायोमास यापासून बनविल्या जातात. १० रूपये किलो दराने वन विभागाच्या मार्फतीने सदर पॅलेटस् उपलब्ध करून दिले जाणार आहेत. पॅलेटस् प्रदूषण विरहीत आहे. त्यातून धूर निघत नाही. एक किलो पॅलेटस्मध्ये चार ते पाच दिवसांचा स्वयंपाक तयार होऊ शकतो. म्हणजे दरदिवशीचा स्वयंपाकाचा खर्च केवळ दोन रूपये एवढा आहे.