तंत्रज्ञाअभावी ग्रामीण रुग्णालयातील ईसिजी मशीन बंद अवस्थेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:36 IST2021-04-10T04:36:06+5:302021-04-10T04:36:06+5:30

देसाईगंज शहरात आरोग्य सुविधा पाहिजे त्या प्रमाणात उपलब्ध नसल्याने लगतच्या चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी या ठिकाणीच सर्वच आरोग्यविषयक कामासाठी जावे ...

ECG machine in rural hospital closed due to lack of technology | तंत्रज्ञाअभावी ग्रामीण रुग्णालयातील ईसिजी मशीन बंद अवस्थेत

तंत्रज्ञाअभावी ग्रामीण रुग्णालयातील ईसिजी मशीन बंद अवस्थेत

देसाईगंज शहरात आरोग्य सुविधा पाहिजे त्या प्रमाणात उपलब्ध नसल्याने लगतच्या चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी या ठिकाणीच सर्वच आरोग्यविषयक कामासाठी जावे लागते. तालुक्यातील ही निकड लक्षात घेऊन स्थानिक पदाधिकारी ,आमदार यांचे शासनाकडे केलेल्या सततच्या पाठपुराव्याने ग्रामीण रुग्णालय देसाईगंज या ठिकाणी ईसीजी, सोनोग्राफी, एक्स रे मशीन यासारख्या सुविधा पुरविण्यात आल्या. जेणेकरुन तालुक्यातील तसेच इतरही ठिकाणच्या नागरिकांना आरोग्यविषयक सुविधा ह्या कमी खर्चात उपलब्ध होऊन दुसऱ्या जिल्ह्यात जाऊन उपचार करुन घेणे व सर्वसामान्यांना आर्थिक भुर्दंड पडू नये, हा दृष्टिकोन ठेवून ह्या यंत्राची उपलब्धता येथील ग्रामीण रुग्णालयात करुन देण्यात आली. परंतु आजमितीस सोनोग्राफी ,ई.सी.जी मशीन हाताळण्यासाठी लागणारे अहर्ताधारक तंत्रज्ञ उपलब्ध नसल्याने ह्या मशीन धूळखात पडलेल्या आहेत. येथील सोनोग्राफी मशीन हाताळण्यासाठी खाजगी सोनोग्राफी चालविणारे डाॕॅक्टरांना पाचारण करुन आठवड्यातील एक वा दोन दिवस काहीच वेळ देवून सोनोग्राफीचे कामे उरकवली जात आहेत. ईसीजी, सोनोग्राफी, एक्सरे मशीन हाताळण्यासाठी ग्रामीण रुग्णालयात पूर्णवेळ वरील यंत्रसामग्री हाताळण्यासाठी लागणारे अर्हताधारक टेकनिशियन वा डाॕॅक्टर यांची नेमणूक करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.

देसाईगंज तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी ग्रामीण रुग्णालयात तपासणी करण्यासाठी रेफर टु ग्रामीण रुग्णालयाची पावती संबंधित रुग्णांना देतात. मात्र रुग्ण ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असता सदर मशिनी बंद अवस्थेत असल्याचे सांगण्यात येत असल्याने रुग्णांना आरोग्य तपासणीसाठी खाजगी रुग्णालयाकडे धाव घेण्यावाचून पर्याय उरत नाही. ईसीजी काढण्याचे तीनशे रुपये तर सोनोग्राफीसाठी सहाशे रुपये घेतले जातात. अल्प दरात रुग्णांना तत्काळ सेवा मिळण्या ऐवजी नाहकचा आर्थिक भुर्दंड बसत असल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे आराेग्य विभागाने रुग्णांची होत असलेली गैरसोय लक्षात घेता सदर मशीन्स चोवीस तास रुग्णांच्या सेवेत उपलब्ध करून देण्याची मागणी नागरिक करीत आहे.

Web Title: ECG machine in rural hospital closed due to lack of technology