शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? 
2
“IPLप्रमाणे राजकारणात बोली लागतात, जिकडे जास्त बोली, तिकडे लोक अधिक”; ठाकरेंचा रोख कुणाकडे?
3
"चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात?
4
मोदींचा 'झाल मुरी'चा व्हिडीओ, ममता बॅनर्जी म्हणाल्या, "कोणाचा विश्वास बसेल का की, पंतप्रधानांच्या पाकिटामध्ये..."
5
"भारत विसरत नाही, मर्यादा ओलांडल्यास..."; पहलगाम हल्ल्याला वर्ष होण्याआधी PAK ला सूचक संदेश
6
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा प्रेग्नेंट; नवरा फरमान खानचा मोठा दावा, पोलीस पोहोचले पण...
7
Latest Marathi News LIVE Updates: भाजपाने मतदारसंघ पुनर्रचना केलेल्या अधिकाऱ्यांनाच नोकरीवर घेतले, रोहित पवारांचा आरोप
8
Narasimha Navratri 2026: २२ एप्रिलपासून 'नृसिंह नवरात्र' प्रारंभ! जाणून घ्या महत्त्व, अचूक पूजा विधी आणि लाभ 
9
IPL 2026: विराट कोहली-अनुष्का शर्मा वृंदावनमध्ये, प्रेमानंद महाराजांचे आशीर्वाद घेतले!
10
“राहुल गांधींना शक्य नाही, प्रियंका गांधी INDIA आघाडी चांगल्या प्रकारे पुढे नेऊ शकतात”; कुणाचा दावा?
11
"भाजपाचा २०२७ मध्येच निवडणुका घेण्याचा प्रयत्न, त्यासाठी घाईघाईत...", आमदार रोहित पवारांचा दावा
12
अभ्यासक्रम प्रशिक्षण, जनगणना, मतदारयादी पडताळणी; राज्यातील प्राथमिक शिक्षकांवर कामाचा डोंगर
13
सोलापूर-पुण्याहूनही सुटणार पहिली स्लीपर वंदे भारत ट्रेन? जाणून घ्या, कुठे जाणार अन् थांबणार!
14
चीनने इराणला पाठवले मिसाईल्ससाठीचे केमिकल्स, अमेरिकेने पकडलेल्या जहाजात सापडला साठा; निक्की हेलींचा दावा
15
माजी क्रिकेटपटू, तृणमूल खासदार युसूफ पठाणचे सासरे आणि मेहुण्याला अटक, मुंबई पोलिसांनी केली कारवाई
16
अरे बापरे! मोमोज खाणं ठरलं जीवघेणं; १० वर्षांच्या मुलीचं लिव्हर फेल, आठवेना, चालताही येईना
17
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या कोट्यवधीच्या प्रॉपर्टीवर येणार तात्पुरती टाच; 'अशी' होणार कुटुंबियांची अडचण
18
MHADA Lottery: गिरणी कामगारांच्या २,५२१ घरांच्या लॉटरीला विलंब लागण्याची चिन्हे 
19
जिनिलियाचं रितेशवरील प्रेम पाहून भारावली भाग्यश्री, 'राजा शिवाजी' सेटवरचा किस्सा सांगत म्हणाली...
20
उरणमधील नियोजित ८५० मेगावॅटचा प्रकल्प रखडला, केंद्राकडे गॅस पुरवठ्याचा प्रस्ताव धूळखात पडून
Daily Top 2Weekly Top 5

वर्षभरात तीन काेटींची दारू जिल्हा पाेलिसांच्या ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2021 05:00 IST

गडचिराेली जिल्ह्यात १९९३ पासून दारूबंदी करण्यात आली आहे. तरीही नजीकच्या भंडारा, गाेंदिया, चंद्रपूर जिल्हे तसेच छत्तीसगड व तेलंगणा राज्यातून दारू आणून विकली जाते. अवैध दारूची विक्री, वाहतुक हा काही नागरिकांचा राेजगारच बनला आहे. अवैधरित्या आणलेली दारू दामदुप्पट दराने विक्री केली जाते. तसेच त्यामध्ये काही प्रमाणात भेसळही केली जाते. यातून दारू तस्कर गब्बर हाेत असले तरी अनेकांचे कुटुंब उद्ध्वस्त आहेत आहेत.

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : पाेलीस प्रशासनाने २०२१ या वर्षात जिल्हाभरात ३०१ कारवाया करून ३९२ दारूविक्रेत्यांना अटक केली. त्यांच्याकडून सुमारे २ काेटी ९४ लाख ३० हजार रुपयांची दारू व अन्य साहित्य जप्त केले आहेत. गडचिराेली जिल्ह्यात १९९३ पासून दारूबंदी करण्यात आली आहे. तरीही नजीकच्या भंडारा, गाेंदिया, चंद्रपूर जिल्हे तसेच छत्तीसगड व तेलंगणा राज्यातून दारू आणून विकली जाते. अवैध दारूची विक्री, वाहतुक हा काही नागरिकांचा राेजगारच बनला आहे. अवैधरित्या आणलेली दारू दामदुप्पट दराने विक्री केली जाते. तसेच त्यामध्ये काही प्रमाणात भेसळही केली जाते. यातून दारू तस्कर गब्बर हाेत असले तरी अनेकांचे कुटुंब उद्ध्वस्त आहेत आहेत. दारूविक्री व वाहतुकीला आळा घालण्यासाठी पाेलीस विभाग प्रयत्न करीत असला तरी पाेलिसांच्या डाेळ्यात धूळ झाेकून दारूविक्री केली जाते. पाेलिसांमार्फत विविध ठिकाणी सापळा रचून कारवाई केली जाते. गाेपनीय सुत्रांकडून माहिती काढून पाेलीस विभागामार्फत सापळे रचले जात असले तरी पाेलिसांनाही गुंगारा देत दारू वाहतूकदार दारूविक्रेत्यांपर्यंत दारू पाेहाेचवितात. त्यामुळेच जिल्ह्यातील प्रत्येक तालुकास्थळी व माेठ्या गावांमध्ये खुलेआम दारू मिळते.

देशी बंद असताना माेहाच्या दारूवर भरचंद्रपूर जिल्ह्यात शासनाने जवळपास सहा वर्षे दारूबंदी केली हाेती. राज्य शासनाने २७ मे २०२१ राेजी दारूबंदी उठविण्याचा निर्णय घेतला. चंद्रपूर जिल्ह्याची सीमा गडचिराेली जिल्ह्याला लागून आहे. चंद्रपूर जिल्ह्यातून येणारी दारू बंद झाल्याने येथील दारूशाैकीन माेहफुलाच्या दारूकडे वळले. दुर्गम भागात माेहफुलाची दारू वर्षभर काढली जाते. ग्रामीण भागातील काही नागरिक या दारूची विक्रीसुद्धा करतात.

युवकांना गांजाचाही छंद

-    गांजा पिणे व विक्रीवर राज्यभरात बंदी असली तरी याचीही तस्करी जिल्ह्यात केली जाते. गांजाच्या आहारी प्रामुख्याने युवक गेले असल्याचे दिसून येते. पाेलीस विभागाने वर्षभराच्या कालावधीत २७ हजार २२० रुपयांचा गांजा जप्त केला आहे. जिल्ह्यात गांजा पिणाऱ्यांचे प्रमाण वाढत असल्याने गांजाच्या विक्रीवर पाेलीस विभागाने करडी नजर ठेवण्याची गरज आहे. 

 

टॅग्स :liquor banदारूबंदी