शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
2
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
3
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
4
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
5
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
6
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
7
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
8
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
9
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
10
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
11
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
12
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
13
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
14
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
15
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
16
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
17
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
18
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
19
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
20
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

डुम्मी नाल्यावरील पूल धोकादायक

By admin | Updated: September 5, 2016 01:35 IST

तालुका स्थळापासून केवळ एक किमी अंतरावर असलेल्या डुम्मी नाल्यावरील पुलाच्या खालची बाजू दिवसेंदिवस अधिकच खचत चालली असल्याने

पुलाच्या खालची माती उखडली : मोठी दुर्घटना होण्याची शक्यता बळावलीएटापल्ली : तालुका स्थळापासून केवळ एक किमी अंतरावर असलेल्या डुम्मी नाल्यावरील पुलाच्या खालची बाजू दिवसेंदिवस अधिकच खचत चालली असल्याने सदर पूल कधीही कोसळून पावसाळ्यादरम्यान मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाचे सदर पुलाच्या दुरूस्तीकडे किंवा नवीन पूल निर्मितीकडे दुर्लक्ष होत चालले आहे.डुम्मी नाल्याच्या पलिकडे डुम्मी जव्हेली यांच्यासह इतरही गावे आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाने डुम्मी नाल्यावर १५ ते २० वर्षांपूर्वी पाईप टाकून पूल तयार केला. पावसाचे प्रमाण ज्यावेळी जास्त होते. त्यावेळी पाईपमधून पाणी पूर्णपणे पास होऊ शकत नाही. त्यामुळे काही पाणी पुलावरूनही वाहत राहते. जवळपास या पुलावरून पावसाळ्याच्या दिवसात तीन ते चार फुटांपेक्षा अधिक पाणी राहते. पुलाची उंची कमी असल्याने पावसाळ्यात किमान पाच ते सहा वेळा सदर पूल पाण्याखाली येतो. पाण्याच्या सततच्या प्रवाहामुळे पुलाच्या खालचे पिचिंग पूर्णपणे निघून गेली आहे व माती सुध्दा वाहून जाण्यास सुरूवात झाली आहे. स्लॅबलेवलच्या खालचे दोन ते तीन फुटापर्यंतची माती वाहून गेली आहे. त्यामुळे पूल वेगळे झाले आहे. या पुलावरून चारचाकी वाहन गेल्यास सदर पूल कधीही कोसळण्याचा धोका निर्माण झाला आहे. पावसाळ्यात ही दुर्घटना घडल्यास जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सदर पुलाच्या दुरूस्तीकडे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे. (तालुका प्रतिनिधी)