शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

पशुधन पर्यवेक्षकाअभावी औषधीचा पुरवठा रखडला

By admin | Updated: November 5, 2016 02:24 IST

चामोर्शी तालुक्यातील घोट परिसरात असलेल्या चापलवाडा येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात मागील सहा महिन्यांपासून पशुधन पर्यवेक्षकाचे पद रिक्त आहे.

चापलवाडातील स्थिती : पर्यवेक्षकाचे पद सहा महिन्यांपासून रिक्तघोट : चामोर्शी तालुक्यातील घोट परिसरात असलेल्या चापलवाडा येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात मागील सहा महिन्यांपासून पशुधन पर्यवेक्षकाचे पद रिक्त आहे. पशुधन पर्यवेक्षकाच्या सहीशिवाय जनावरांची औषधी उपलब्ध होत नाही. येथील पशुधन पर्यवेक्षकाचे मागील सहा महिन्यांपासून रिक्त असल्याने जनावरांच्या औषधीचा सुद्धा पुरवठा झाला नाही. त्यामुळे पशुपालक अडचणीत आले आहेत. चापलवाडा परिसरातील बहुतांश नागरिकांकडे पशुधन आहे. चापलवाडा पशुवैद्यकीय दवाखान्याअंतर्गत चापलवाडा, मक्केपल्ली, चेक चापलवाडा, पलसपूर, गांधीनगर, वरूर, मक्केपल्ली, चक नं. १, मक्केपल्ली चक नं. ३, मक्केपल्ली चक नं. ४, पोतेपल्ली पॅच ही ११ गावे येतात. या ११ गावांमध्ये ३ हजार ८२९ गाय, २२१ म्हैस, १ हजार २२४ शेळ्या असल्याची नोंद पशुधन विभागाकडे उपलब्ध आहे. प्रत्यक्षात यापेक्षा जनावरांची संख्या अधिक आहे. जनावरांच्या देखभालीसाठी लाखो रूपये खर्चुन चापलवाडा येथे पशुवैद्यकीय दवाखाना बांधण्यात आला. मात्र या दवाखान्यातील पशुधन पर्यवेक्षकाचे पद मागील सहा महिन्यांपासून रिक्त आहे. चापलवाडा येथील पशुवैद्यकीय दवाखान्याचे पर्यवेक्षक म्हणून डी. व्ही. नागोसे कार्यरत होते. त्यांचे हृदयविकाराने मे महिन्यात निधन झाले. तेव्हापासून या दवाखान्याला डॉक्टरच उपलब्ध झाले नाही. जनावरांसाठी घटसर्प, चौखुरा, एकटांग्या आदी आजारांचे औषध उपलब्ध होते. मात्र यासाठी पशुधन पर्यवेक्षकाची यासाठी असणे आवश्यक आहे. या दवाखान्यात पशुधन पर्यवेक्षकाचे पद रिक्त असल्याने औषधही उपलब्ध झाली नाही. परिणामी पशुपालकांना शेकडो रूपये खर्चुन खासगी औषधीच्या दुकानातून औषधी खरेदी करावी लागत आहे. (वार्ताहर)