शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाचे परराष्ट्र मंत्री PM मोदींना भेटले; तेल संकट, युक्रेन, परस्पर संबंध वाढवण्यावर चर्चा
2
देशातील परिस्थिती गंभीर, सर्वपक्षीय बैठक बोलवा, त्यात पंतप्रधानांनी हजर राहावे- शरद पवार
3
CM देवेंद्र फडणवीसांनी चालवलेली बुलेट कुणाची? PUC वरून काँग्रेस-भाजपात का जुंपली?
4
Jasprit Bumrah : १३ वर्षांचा प्रवास; जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार! हार्दिक पांड्याचा विषय संपला?
5
ममता बॅनर्जी खरंच वकील आहेत का, कागदपत्र सादर करा; बार कौन्सिलचे निर्देश, झाले तरी काय?
6
Vaibhav Suryavanshi In India A Squad : वैभव सूर्यवंशीला BCCI चं मोठं गिफ्ट; भारतीय ‘अ’ संघात निवड
7
PM मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद, अग्रगण्य कंपनीचा मोठा निर्णय; 'अनावश्यक खर्च' टाळण्यासाठी बनवला मास्टर प्लॅन
8
Top Marathi News Live Updates: राष्ट्रवादी अजितदादा गटाला सोडचिठ्ठी देणारे आनंद परांजपे शिंदेंच्या शिवसेनेत जाणार
9
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
10
अंगावर शहारा आणणारी घटना! वादळात टीनशेडसोबत 'नन्हे मियाँ'ही उडाले अन्...; थरार कॅमेऱ्यात कैद -  बघा VIDEO
11
PM मोदींच्या आवाहनाला गडकरींचाही प्रतिसाद, बसने प्रवास करत केली पालखी महामार्गाच्या कामांची पाहणी; दौरा सुरू असतानाच...
12
PBKS vs MI : भावा कसा आहेस? रोहित शर्मा-श्रेयस अय्यरचा व्हिडिओ पाहिलात का?
13
HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
14
Raj Thackeray : “२२ लाख मुलांचं आणि त्यांच्या कुटुंबीयांचं आयुष्य टांगणीला लागलं त्याचं काय?”, राज ठाकरेंचा सवाल
15
PCOS नाही, आता PMOS! ८ पैकी १ ‘या’ समस्येने त्रस्त; १७ कोटी महिलांच्या आरोग्यावर थेट परिणाम
16
नाशिक-पुणे, सिंधुदुर्ग-रत्नागिरीसाठी बड्या तरतुदी मान्य; राज्य मंत्रिमंडळाचे १४ मोठे निर्णय
17
मासिक शिवरात्रि व्रत २०२६: महादेव मनोकामना पूर्ण करतील, यश मिळेल, सुख लाभेल; ‘असे’ करा व्रत!
18
Travel : अवघ्या २५ हजारांत करा 'भारताच्या स्कॉटलँड'ची ट्रिप! बजेट प्लॅनिंगसाठी फॉलो करा 'या' खास टिप्स
19
Video - मुलींना बेदम मारलं, मुलाला उलटं टांगलं; शिक्षक झाला हैवान, शाळेतील धक्कादायक प्रकार
20
Instagram अकाउंट अचानक बॅन झालंय? घाबरू नका! 'या' सोप्या ट्रिकने मिनिटांत होईल रिकव्हर
Daily Top 2Weekly Top 5

निधीअभावी माती परीक्षण प्रयोगशाळेचे वाहन धूळ खात

By admin | Updated: July 10, 2015 02:02 IST

मानव विकास मिशन अंतर्गत कृषी विज्ञान केंद्र गडचिरोलीला माती परीक्षण प्रयोगशाळेचे वाहन २०१२ मध्ये उपलब्ध करून देण्यात आले.

राज्य शासनासह इतर विभागांचेही दुर्लक्ष : तीन वर्षांत केवळ ५८० नमुण्यांचे परिक्षण
दिगांबर जवादे  गडचिरोली
मानव विकास मिशन अंतर्गत कृषी विज्ञान केंद्र गडचिरोलीला माती परीक्षण प्रयोगशाळेचे वाहन २०१२ मध्ये उपलब्ध करून देण्यात आले. मात्र त्यासाठी आवश्यक असलेला निधी मिळत नसल्याने सदर वाहन कृषी विज्ञान केंद्राच्या आवारातच पडून आहे. तीन वर्षाच्या कालावधीत नाममात्र ५८० नमुन्यांचे माती परीक्षण केले आहे.
पिकांची निवड व मातीच्या प्रकारानुसार खताची मात्रा देण्यासाठी माती परीक्षण करणे गरजेचे आहे. माती परीक्षणाचे महत्त्व ओळखून प्रत्येक जिल्ह्यात माती परीक्षणाच्या प्रयोगशाळा स्थापन करण्यात आल्या आहेत. प्रयोगशाळेत शेतकऱ्यांच्या शेतातील मातीचे परीक्षण केल्यानंतर त्याच्या शेताची आरोग्यपत्रिका वितरित केली जाते. या आरोग्य पत्रिकेत मातीचा कोणता प्रकार आहे. हे दर्शविण्यात येते. जिल्हास्थळावर असलेल्या प्रयोगशाळांमध्ये माती आणणे प्रत्येकच शेतकऱ्याला शक्य होत नाही. कधीकधी माती परीक्षापेक्षाही अधिकचा खर्च शेतकऱ्याला करावा लागतो. ही बाब लक्षात घेऊन राज्य शासनाने मानव विकास मिशनच्या निधीतून प्रत्येक जिल्ह्याला माती परीक्षण प्रयोगशाळेचे वाहन उपलब्ध करून दिले आहे.
गडचिरोली जिल्ह्यात कृषी विज्ञान केंद्राला सदर वाहन २०१२ मध्ये उपलब्ध झाले आहे. या वाहनाच्या खर्चासाठी मात्र शासनाने कोणत्याही अतिरिक्त निधीची तरतूद केली नसून शेतकऱ्यांकडून माती परीक्षणाचे पैसे घेऊन त्यातून वाहनाचा खर्च भागविण्यात यावा, असे निर्देश दिले आहेत. अत्याधुनिक माती परीक्षणाची प्रयोगशाळा असलेले हे वाहन जवळपास १० लाख रूपये किमतीचे आहे. गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती कमकुवत असल्याने स्वत: माती परीक्षणाचा खर्च देण्यास शेतकरी वर्ग तयार नाही. परिणामी सदर वाहन शेतकऱ्यांच्या शेतावर नेऊन माती परीक्षण करण्यास कृषी विज्ञान केंद्राला अनेक अडचणी येत आहेत. तीन वर्षांच्या कालावधीत केवळ ५८० माती परीक्षाचे नमुने घेण्यात आले. खर्च मिळत नसल्याने सदर वाहन कृषी विज्ञान केंद्राच्या कार्यालयासमोर पडून आहेत. या वाहनाचा पुरेपूर उपयोग होत नसल्याचे दिसून येत आहे.
तत्काळ मिळते आरोग्यपत्रिका
या वाहनामध्ये माती परीक्षणाची अत्याधुनिक लॅब बसविण्यात आली आहे. शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन माती घेऊन त्याच ठिकाणी मातीचे परीक्षण केले जाते. काही तासात शेतकऱ्याला माती परीक्षणाचा अहवाल दिला जातो व आवश्यक ते तांत्रिक मार्गदर्शनही केले जाते. यासाठी केवळ १५० रूपये शुल्क आकारल्या जाते. राज्य शासनाची जिल्हास्थळावर माती परीक्षणाची लॅब आहे. या ठिकाणी १०० ते २०० किमीचे अंतर पार करून माती आणणे व त्याचा अहवाल प्राप्त करणे या तुलनेत वाहनातील प्रयोगशाळा शेतकऱ्यांच्या दृष्टीने फायदेशीर आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांची अर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन शासनाने या वाहनासाठी निधीची तरतूद करावी यासाठी राज्य शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे. आदिवासी विकास विभागाने दोन हजार माती परीक्षणाचे नमुने तपासण्यास परवानगी दिली होती. मात्र अजुनपर्यंत त्यासाठीचा निधी प्राप्त झाला नाही. त्याचाही पाठपुरावा केला जात आहे. शेतकरी स्वत: पैसे देऊन माती परीक्षण करून घ्यावे, यासाठीही कृषी विज्ञान केंद्राच्या मार्फतीने नजागृती केली जात आहे.
-डॉ. एस. पी. लांबे, कार्यक्रम समन्वय, कृषी विज्ञान केंद्र गडचिरोली