शहरं
Join us  
Trending Stories
1
Gold Rate Prediction: सोने तब्बल २७ हजारांनी महाग होणार; डॉलर वाचविण्यासाठी केंद्र सरकारचा ‘सोन्या’वर घाव
2
'नीट'ला नाट : पेपरफुटीप्रकरणी सीबीआयचे छापे, ५ जणांना अटक; डॉक्टरांची संघटना एनटीएविरोधात सर्वोच्च न्यायालयात
3
पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीच्या संपर्कातील युवकांना एटीएसने घेतले ताब्यात; ५७ जण रडारवर
4
Gold Silver Rate:आयात शुल्कवाढीचा झटका; सोने ८ हजार रुपये, तर चांदी २० हजारांनी महागली
5
Mhada Lottery 2026: म्हाडा घरांच्या लॉटरीला दुसऱ्यांदा मुदतवाढ; आता कोणत्या तारखेपर्यंत अर्ज करता येणार? 
6
11th admission: अकरावी प्रवेशावेळी तांत्रिक अडचणी, शेकडो पालक-विद्यार्थ्यांना मनस्ताप
7
संकट दारात उभे; पण कोणाकडेही उत्तर नाही; उद्योगपती उदय कोटक यांचा भारतीयांना धोक्याचा इशारा
8
पीएम मोदींसह अनेक मंत्र्यांनी केली ताफ्यात 'काट'कसर; भाजपशासित मुख्यमंत्र्यांनीही केल्या अनेक उपाययोजना
9
‘देवाभाऊं’चा एक फोन अन् तत्काळ प्रश्न सुटला; CM फडणवीसांनी अधिकाऱ्यांना सुनावलं, नेमकं काय घडलं?
10
प्रवाशांना मोठा दिलासा, विदर्भातून गोव्याला जाणारी ट्रेन नियमित केली; नाशिक-मुंबईकरांना लाभ!
11
Virat Kohli New World Record : किंग कोहलीचा शतकी धमाका! अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
12
IPL 2026 : चेज मास्टर विराट कोहली सेंच्युरीसह पुरुन उरला! KKR ला पराभूत करत RCB अव्वल ठरला
13
पुण्यातील सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये बॉम्बसदृश्य वस्तू; रुग्ण-नागरिकांमध्ये खळबळ अन् घबराट
14
आकाशात संकट! एअर इंडियाच्या अनेक आंतरराष्ट्रीय उड्डाणांना 'ब्रेक'; जगभरात ६ हजारांहून अधिक उड्डाणं 'लेट' 
15
IPL 2026: KKR विरुद्ध खाते उघडल्यावर किंग कोहलीचं 'शतकी सेलिब्रेशन'; RCB चे चाहतेही झाले शॉक (VIDEO)
16
अमूलनंतर आता मदर डेअरीचाही दणका! दूध महागलं, म्हशीच्या दुधापासून फुल क्रीमपर्यंत नवे दर जाहीर; पहा संपूर्ण यादी
17
RCB vs KKR : मुंबईकर रघुवंशीची तुफान फटकेबाजी; किंग कोहलीनंही टाळ्या वाजवत दिली दाद (VIDEO)
18
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून EV वाहनाचा वापर सुरू, ताफ्यातील वाहनेही केली कमी
19
महागाईचा झटका, अमूलने दुधाचा भाव वाढवला! कधीपासून लागू होणार नवे दर? जाणून घ्या 
20
IPL All Time Record : किंग कोहलीनं रचला इतिहास; MS धोनीचा महारेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

ट्रॅक्टर उलटून चालक जागीच ठार

By admin | Updated: July 26, 2015 02:38 IST

शेतात ट्रॅक्टरने चिखलणी करताना फसलेला ट्रॅक्टर काढण्याच्या प्रयत्नात ट्रॅक्टर उलटल्याने ट्रॅक्टरखाली दबून ट्रॅक्टरचालक जागीच ठार झाल्याची घटना ...

रांगी येथील घटना : फसलेला ट्रॅक्टर काढण्याच्या प्रयत्नात झाला घात
रांगी : शेतात ट्रॅक्टरने चिखलणी करताना फसलेला ट्रॅक्टर काढण्याच्या प्रयत्नात ट्रॅक्टर उलटल्याने ट्रॅक्टरखाली दबून ट्रॅक्टरचालक जागीच ठार झाल्याची घटना शनिवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास धानोरा तालुक्यातील रांगी येथे घडली. रवींद्र रामाजी बोरसरे (४०) रा. रांगी असे मृतक ट्रॅक्टरचालकाचे नाव आहे.
रांगी येथील शांताराम बरडे यांनी दोन महिन्यांपूर्वी नवीन ट्रॅक्टरची खरेदी केली. खरीप हंगामातील शेतातील नांगरणी व चिखलणीकरिता रवींद्र बोरसरे यांला ट्रॅक्टरचालक म्हणून कामावर घेतले. शुक्रवारी सकाळी ट्रॅक्टरचालक रवींद्र याने रांगी येथील नामदेव बैस यांच्या शेतात चिखलणी करण्यासाठी ट्रॅक्टर घेऊन गेला. चिखलणी करताना ट्रॅक्टर फसला. दुपारपासून ते सायंकाळपर्यंत चिखलातून ट्रॅक्टर बाहेर काढण्यासाठी रवींद्र बोरसरे यांनी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र ट्रॅक्टर शेतातून बाहेर काढण्यात त्याला यश आले नाही. त्यामुळे तो घरी परतला. त्यानंतर शनिवारी सकाळी पुन्हा शेतात जाऊन फसलेला ट्रॅक्टर काढण्याचा प्रयत्न करू लागला. दरम्यान काही वेळानंतर फसलेला ट्रॅक्टर बाहेर निघाला. मात्र केसबिलला लावलेल्या बल्ल्या अडकून राहिल्याने सदर ट्रॅक्टर पुन्हा कोरड्या जमिनीवर उलटला. या ट्रॅक्टरच्या खाली आल्याने दबून ट्रॅक्टरचालक रवींद्र बोरसरे याचा मृत्यू झाला.
मृतक रवींद्र बोरसरे याच्या मागे पत्नी, दोन लहान मुले व बराच मोठा आप्त परिवार आहे. मृतक रवींद्र हा रांगी येथील कार्तिक बुंडरे यांचा जावई असून तो गेल्या सात वर्षांपासून सासुरवाडी असलेल्या रांगी येथे स्थायी झाला होता. (वार्ताहर)