शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
4
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
5
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
6
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
7
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
8
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
9
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
10
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
11
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
12
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
13
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
14
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
15
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
16
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
17
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
18
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
19
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
20
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
Daily Top 2Weekly Top 5

वाघिणीला जिल्ह्यात सोडू नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2017 23:45 IST

आरमोरी तालुक्यातील रवी, अरसोडा येथील जंगलातून पकडण्यात आलेल्या वाघिणीला पुन्हा गडचिरोली जिल्ह्याच्या जंगलात सोडू नये,

ठळक मुद्देअभ्यासगट निर्माण करा : अरविंद पोरेड्डीवार यांची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : आरमोरी तालुक्यातील रवी, अरसोडा येथील जंगलातून पकडण्यात आलेल्या वाघिणीला पुन्हा गडचिरोली जिल्ह्याच्या जंगलात सोडू नये, अशी मागणी दी महाराष्टÑ स्टेट को आॅपरेटीव्ह बँकेचे उपाध्यक्ष अरविंद पोरेड्डीवार यांनी केली आहे.या संदर्भात त्यांनी म्हटले आहे की, नरभक्षी वाघिणीला पकडण्याची मागणी झाल्यानंतर १२ आॅगस्ट रोजी वनाधिकाºयांनी रवी व अरसोडा गावादरम्यानच्या कक्ष क्रमांक ६७ मधील जंगलात वाघिणीला पकडले. त्यानंतर गोरेवाडा रेस्क्यू सेंटरमध्ये तिची रवानगी करण्यात आली होती. यानंतर वन्यजीव वन विभागाचे अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षकांच्या अध्यक्षतेखालील वन्यजीव तज्ज्ञांच्या समितीने पकडण्यात आलेली वाघिण नरभक्षी नाही, असा निष्कर्ष काढला. त्यामुळे समितीने या वाघिणीला नैसर्गिक अधिवासात सोडण्याचा निर्णय घेतला. सदर वाघिणीला आता गडचिरोली जिल्ह्याच्या चपराळा अभयारण्यात सोडण्याचा विचार सुरू आहे. आरमोरी परिसरात आधीच एक वाघ असून त्याची दहशत आहे. सोबतची वाघिण नसल्याने तो पुन्हा चवताळणार आहे. अशा परिस्थितीत पकडलेल्या वाघिणीला पुन्हा याच जिल्ह्यात सोडणे योग्य होणार नाही. वाघिणीला येथील जंगलात सोडल्यास बफर झोन निर्माण होईल व नागरिकांचे जगणे कठीण होईल, असे पोरेड्डीवार यांनी म्हटले आहे.चपराळा व गडचिरोली जिल्ह्याच्या अन्य भागातील नागरिक वस्तीचे प्रमाण लक्षात घेता वन्यप्राणी व मानव यांच्यातील संघर्ष तीव्र होणार नाही. याकरिता शासन, प्रशासन व स्थानिक जनता यांच्यात सुसंवाद साधण्याच्या दृष्टीने एका अभ्यासगटाची निर्मिती करावी, अशी मागणी अरविंद पोरेड्डीवार यांनी शासनाकडे केली आहे. यासाठी वन विभागाने पुढाकार घ्यावा.