शहरं
Join us  
Trending Stories
1
Pm Modi Five Nation Tour : पीएम मोदींचा ५ देशांचा दौरा सुरू! 'UAE'मध्ये होणार भव्य स्वागत; कोणत्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित केले जाणार?
2
शेअर बाजाराचा 'जोश हाय'; Sensex-Nifty मधील तेजीनं गुंतवणूकदारांच्या अपेक्षा वाढल्या, 'या' क्षेत्रातील शेअर्स सुस्साट...
3
Petrol Diesel Price Hike: पहिले दूध, नंतर CNG आणि आता पेट्रोल-डिझेल महागलं... ज्याची भीती होती तेच झालं, ४८ तासांत ३ मोठे झटके
4
India-Russia Oil Import News: फक्त २४ तास बाकी! रशियन तेलाला 'ब्रेक'; भारतात पेट्रोल-डिझेलचा तीव्र तुटवडा निर्माण होणार?
5
Petrol Diesel Price: पेट्रोल- डिझेलच्या दरात वाढ; सर्वसामान्यांच्या खिशावर नेमका काय परिणाम होणार? जाणून घ्या
6
सामान्यांचा खिसा आणखी रिकामा; महागाईचा ४२ महिन्यांचा उच्चांक; महागाईत सर्वाधिक तीव्र वाढ
7
डॉक्टर आनंद नाडकर्णी यांचे निधन; ६८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
Sunil Bharti Mittal: अदानी-अंबानींच्या मार्गावर सुनील मित्तल; १० वर्षांत सोडणार Airtel ची खुर्ची, कोण असेल उत्तराधिकारी?
9
व्हॉट्सॲपवर ‘एआय’सोबतच्या गप्पा राहणार आता अतिशय गुप्त!
10
Petrol Diesel price hike: महागाईच्या झळा सुरू, पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ! प्रति लिटर ३ रुपयांनी महाग झाले इंधन
11
सेन्सेक्स लवकरच ८९ हजारांवर? ‘मॉर्गन स्टॅन्ले’चा अहवाल; १५ टक्के वाढीचा अंदाज
12
आजचे राशीभविष्य - १५ मे २०२६, आर्थिक स्थिती मजबूत दिसेल; गैरसमजा पासून जपून राहावे
13
नॉर्मल पेट्रोल आणि प्रीमियम पेट्रोल म्हणजे काय? दोन्हीच्या किमतीत किती फरक असतो? जाणून घ्या...
14
अग्रलेख : अजितदादा, हे पाहताय ना?
15
'नीट'चे पेपरचोर रडारवर, अधिकाऱ्यांवरही संशय; पुण्यातील महिलेच्या २१ बँक खात्यांत लाखोंचे व्यवहार
16
राखीव प्रवर्गाची सवलत घेतलेल्या उमेदवारांना खुल्या प्रवर्गात ‘नो एंट्री’, राज्य सरकारचा मोठा निर्णय
17
विशेष लेख: महाराष्ट्रातही लाखो मतदार वगळले जातील का?
18
चिनी जहाजांसाठी होर्मुझ पुन्हा उघडले; ट्रम्प-जिनपिंग चर्चा सुरू असताना इराणचा निर्णय
19
उत्तर प्रदेशात पावसाच्या जोरदार तडाख्याने १११ जणांचा मृत्यू; एक जण ५० फूट उडाला
20
महाराष्ट्रात एसआयआर; ३० जूनपासून होणार मतदारांची पडताळणी; १६ राज्ये, ३ केंद्रशासित प्रदेशांमध्ये तिसरा टप्पा  
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्याला विशेष पॅकेज देणार

By admin | Updated: January 4, 2015 23:13 IST

राज्यात भाजपचे सरकार सत्तारूढ झाल्याने लोकांच्या सरकारकडून अपेक्षा वाढल्या आहेत. जिल्ह्यातील रेल्वे, उद्योग, सिंचन, आरोग्य व शैक्षणिक समस्या सोडविण्यासाठी आपण पुढाकार घेऊ,

चामोर्शी : राज्यात भाजपचे सरकार सत्तारूढ झाल्याने लोकांच्या सरकारकडून अपेक्षा वाढल्या आहेत. जिल्ह्यातील रेल्वे, उद्योग, सिंचन, आरोग्य व शैक्षणिक समस्या सोडविण्यासाठी आपण पुढाकार घेऊ, तसेच शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी जिल्ह्याला विशेष पॅकेज देऊ, असे आश्वासन राज्याचे अर्थ व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले.
भारतीय जनता पार्टीच्यावतीने चामोर्शी येथे ना. सुधीर मुनगंटीवार यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गडचिरोली- चिमुर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक नेते होते. प्रमुख अतिथी म्हणून आमदार डॉ. देवराव होळी, क्रिष्णा गजबे, चंद्रपूरच्या महापौर कांचर्लावार, माजी जि. प. अध्यक्ष रवींद्र ओल्लालवार, मनोज पालारपवार, पंकज पालारपवार, रामेश्वर सेलुकर, भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष स्वप्नील वरघंटे, आनंद भांडेकर, रेखा डोळस, लता कुमरे, पं. स. सभापती शशीबाई चिळंगे, उपसभापती केशव भांडेकर, विनोद आकनपल्लीवार, सतिश गोटमवार, विलास गण्यारपवार, अशोक पोरेड्डीवार, अब्बास बेग, मनिषा देवगडे, दिलीप चलाख, जैराम चलाख, साईनाथ बुरांडे, मांतेश श्रीरामे उपस्थित होते.
दरम्यान ना. सुधीर मुनगंटीवार यांचा भाजपच्यावतीने खा. अशोक नेते यांच्याहस्ते शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. गडचिरोली जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये सोयी- सुविधांसाठी विशेष तरतुद करून टप्प्या- टप्प्याने आरोग्य केंद्राची दुरूस्ती केली जाईल, तसेच महाराष्ट्रातील अनेक रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. या रस्त्यांचा विकास केला जाईल, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्याचा दौरा करून सर्वांगिण विकासासाठी विशेष पॅकेज योजना तयार केल्या जातील, असे आश्वासन ना. सुधीर मुनगंटीवार यांनी दिले.
जनसामान्यांच्या समस्या सोडविण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत. केंद्र व राज्यशासन जिल्ह्यातील समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणार आहे. जिल्ह्याला न्याय देण्यासाठी राज्य सरकार आवश्यक निधी उपलब्ध करेल, यात तिळमात्र शंका नाही, असे प्रतिपादन खासदार अशोक नेते यांनी केले. शेतकरी, गोरगरीब जनतेसाठी चांगले दिवस आले आहेत, असे प्रतिपादन डॉ. होळी यांनी केले. आष्टी, आलापल्ली, घोट, चामोर्शी येथील नागरिक उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)