हरडे महाविद्यालयाला रासेयाेचा जिल्हास्तरीय पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 04:30 IST2021-01-15T04:30:50+5:302021-01-15T04:30:50+5:30

गडचिराेली : राष्ट्रीय सेवा याेजनेतंर्गत विविध उत्कृष्ट उपक्रम व कार्यक्रम राबविल्याबद्दल चामाेर्शी येथील केवळरामजी हरडे महाविद्यालयाला उत्कृष्ट रासेयाे महाविद्यालयीन ...

District level award of Raseya to Harde College | हरडे महाविद्यालयाला रासेयाेचा जिल्हास्तरीय पुरस्कार

हरडे महाविद्यालयाला रासेयाेचा जिल्हास्तरीय पुरस्कार

गडचिराेली : राष्ट्रीय सेवा याेजनेतंर्गत विविध उत्कृष्ट उपक्रम व कार्यक्रम राबविल्याबद्दल चामाेर्शी येथील केवळरामजी हरडे महाविद्यालयाला उत्कृष्ट रासेयाे महाविद्यालयीन एकक हा पुरस्कार गाेंडवाना विद्यापीठाकडून १३ जानेवारीला प्रदान करण्यात आला. तसेच उत्कृष्ट रासेयाे कार्यक्रम अधिकारी या जिल्हास्तरीय पुरस्काराने प्रा. डाॅ. पवन रमेश नाईक यांचा गाैरव करण्यात आला.

राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. पवन नाईक यांनी २०१९-२० या सत्रात विविध उपक्रम राबविले हाेते. केंद्र व राज्य शासन तसेच विद्यापीठाचे सर्व समाजोपयोगी उपक्रम यशस्वीपणे जनतेपर्यंत रासेयो स्वयंसेवकांच्या माध्यमातून पोहाेचविण्याचे कार्य सातत्याने करीत आहेत. पर्यावरण, व्यसनमुक्ती, स्वच्छता, जलसंधारण व ग्रामविकास याकरिता विविध समाजसेवी संस्थांशी डॉ. पवन नाईक यांचा सतत संपर्क येताे.

काेराेना निर्बंधांमुळे गोंडवाना विद्यापीठाच्या निर्देशानुसार ऑनलाईन परीक्षणातून उत्कृष्ट रासेयो पथक आणि उत्कृष्ट रासेयो कार्यक्रम अधिकारी म्हणून जिल्हास्तरीय पुरस्कारासाठी निवड झाली. कुलगुरू श्रीनिवास वरखेडी यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. काॅलेजच्या यशासाठी प्राचार्य डाॅ. हिराजी बनपूरकर व प्राध्यापकांचे सहकार्य लाभले. पुरस्काराबद्दल संस्थेचे अध्यक्ष अरुण हरडे यांनी काैतुक केले आहे.

Web Title: District level award of Raseya to Harde College