शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत मशिदीत अंदाधुंद गोळीबार; दोन अल्पवयीन संशयितांसह ५ जणांचा मृत्यू, पोलिसांकडून 'हेट क्राईम' घोषित
2
SRH चा 'ई'शानदार विजय! आपल्यासोबत GT लाही मिळवून दिलं प्लेऑफ्सचं तिकीट; CSK चं काय?
3
उद्योगपती गौतम अदानी यांना मोठा दिलासा! अमेरिकेच्या न्याय विभागाने सर्व फौजदारी खटले केले बंद
4
आफ्रिकेत इबोला व्हायरसचा धोका वाढला, भारत सरकार 'अलर्ट मोड'वर, तपासणी अधिक तीव्र
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला नॉर्वेचा सर्वोच्च सन्मान; जगातील ३२वा मानाचा पुरस्कार प्रदान
6
चेन्नई सुपर किंग्सचा डाव संपल्यावर MS धोनी मैदानात उतरला; फोटो सेशनसह त्याचा IPL प्रवास थांबला? (VIDEO)
7
हिंदू बांधव रस्त्यावर पूजा करतात, एअरपोर्टवर गरबा खेळतात, आम्ही काही बोलतो का?- वारिस पठाण
8
संतापजनक! कार-टमटम अपघातात ५ जण गंभीर जखमी; अर्धा तास उलटूनही रुग्णवाहिकेचा पत्ताच नाही...
9
संजूचा आणखी एक पराक्रम! पठ्ठ्यानं MS धोनीचा १३ वर्षांपासून अबाधित असलेला सर्वकालीन विक्रम मोडला
10
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
11
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
12
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
13
चालत्या रस्त्यावर किंवा जाममध्ये मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली तर चूक नक्की कुणाची? वाचा काय सांगतो ट्रॅफिक नियम
14
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
15
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
16
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
17
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
18
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
19
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
20
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
Daily Top 2Weekly Top 5

६६२ क्विंटल बियाण्यांचे अनुदानावर वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2020 05:01 IST

गडचिरोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात जंगल आहे. या जंगलाच्या माध्यमातून शासनाला मिळणाºया उत्पन्नातून ७ टक्के महसूल जिल्हा परिषदेला उपलब्ध करून दिला जाते. या महसुलातून जिल्हा परिषद जंगलव्याप्त गाव क्षेत्रातील अल्प, अत्यल्प जमीन भूधारक, अनुसूचित जमाती, अनुसूचित जाती, भटक्या जाती तसेच दारिद्र्य रेषेखालील शेतकऱ्यांना ५० टक्के अनुदानावर बियाणांचे वितरण केले जाते.

ठळक मुद्देजिल्हा परिषदेची योजना : बहुतांश पंचायत समित्यांमध्ये बियाणे वितरणाला सुरूवात

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : अल्प, अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना पंचायत समितीमार्फत ५० टक्के अनुदानावर बियाणांचे वितरण केले जाते. जिल्हा परिषदेने यासाठी यावर्षी १४ लाख ९१ हजार रुपयांची तरतूद केली असून यातून सुमारे ६६२ क्विंटल धान बियाण्यांचे वितरण केले जाणार आहे. काही तालुक्यात वितरणाची प्रक्रिया सुरू झाली आहे.
गडचिरोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात जंगल आहे. या जंगलाच्या माध्यमातून शासनाला मिळणाºया उत्पन्नातून ७ टक्के महसूल जिल्हा परिषदेला उपलब्ध करून दिला जाते. या महसुलातून जिल्हा परिषद जंगलव्याप्त गाव क्षेत्रातील अल्प, अत्यल्प जमीन भूधारक, अनुसूचित जमाती, अनुसूचित जाती, भटक्या जाती तसेच दारिद्र्य रेषेखालील शेतकऱ्यांना ५० टक्के अनुदानावर बियाणांचे वितरण केले जाते.
गडचिरोली जिल्ह्यात सर्वाधिक धानपिकाची लागवड केली जाते. त्यामुळे धान बियाणांची मागणी सुध्दा अधिक आहे. ही बाब लक्षात घेऊन जिल्हा परिषद सर्वाधिक तरतूद धान बियाणांसाठी करते. यावर्षी १४ लाख ९१ हजार रुपयांची तरतूद केली आहे. त्यातून ६६२ क्विंटल धानाचे बियाणे उपलब्ध करून दिले जाणार आहे. पाऊस सुरू झाल्यानंतर पेरणीच्या कामाला वेग येणार आहे. त्यामुळे शेतकºयांनी बियाणे खरेदीला सुरूवात केली आहे. अनुदानावर बियाणे मिळत असल्याने पंचायत समिती गाठून बियाणांबाबत विचारपूस करीत आहेत.

मिळणारे अनुदान
५० टक्के अनुदानावर चार प्रकारच्या धानाचे बियाणे उपलब्ध करून दिले जाणार आहेत. श्रीराम १० किलो धानाच्या बॅगसाठी शेतकºयाला ५० टक्के अनुदानांतर्गत २६० रुपये द्यावे लागणार आहेत. एमटीयू १०१० च्या २५ किलोच्या बॅगसाठी ४७५, पीकेव्ही, एचएमटी २५ किलोसाठी २६९ रुपये द्यावे लागणार आहेत.

मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी
या योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित शेतकऱ्याकडे सातबारा व नमुना-८-अ असणे आवश्यक आहे. हे दोन दाखले अर्जासोबत जोडल्यानंतर संबंधित शेतकऱ्याला या योजनेंतर्गत बियाणे उपलब्ध करून दिले जातात. मात्र शेतकऱ्यांच्या मागणीच्या तुलनेत अत्यंत कमी प्रमाणात बियाणे उपलब्ध होतात. त्यामुळे बियाणांचा पुरवठा होताच शेतकºयांची पंचायत समितीमध्ये गर्दी होते. बियाण्यांसाठी अनुदानाचा निधी वाढवावा, अशी मागणी आहे.

टॅग्स :Socialसामाजिक