आविका पदाधिकारी व व्यवस्थापकांच्या बैठकीत विविध समस्यांवर चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2021 04:32 IST2021-01-17T04:32:01+5:302021-01-17T04:32:01+5:30

आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थाच्या जिल्ह्यातील अध्यक्ष, उपाध्यक्ष व व्यवस्थापक यांची बैठक आविका कुरखेडा येथे नुकतीच घेण्यात आली. ...

Discussion on various issues in the meeting of AVICA office bearers and managers | आविका पदाधिकारी व व्यवस्थापकांच्या बैठकीत विविध समस्यांवर चर्चा

आविका पदाधिकारी व व्यवस्थापकांच्या बैठकीत विविध समस्यांवर चर्चा

आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थाच्या जिल्ह्यातील अध्यक्ष, उपाध्यक्ष व व्यवस्थापक यांची बैठक आविका कुरखेडा येथे नुकतीच घेण्यात आली. या बैठकीत धान खरेदीच्या विविध मुद्यांवर सांगाेपांग चर्चा करण्यात आली.

बैठकीच्या अध्यक्षस्थानी आविका जिल्हा पदाधिकारी कर्मचारी संघटना जिल्हा अध्यक्ष तथा कुरखेडा आविका उपाध्यक्ष चांगदेव फाये हे होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रादेशिक व्यवस्थापक गजानन कोटलावार, आविकाचे संचालक व्यंकटी नागीलवार, डी.के. चुरगाये, केशव किरसान, बाबुराव तुलावी, बैरागी कुंवर, उपसभापती मोहन कुथे, माधवजी तलमले, हेमंत शेंदरे आदी उपस्थित होते. या बैठकीत आविका संस्थेचे मागील कमिशन, मंडी चार्ज त्वरित देण्यात यावे. वनपट्टेधारक शेतकऱ्याचे धान्य खरेदीकरिता येणारी अडचण दूर करावी. शेतकऱ्यांचे मागील वर्षीचे प्रलंबित बारदान्याचे पैसे देण्यात यावे. चालू हंगामात दरमहा मंडी चार्ज कमिशन देण्यात यावे. बारदान्याचा व्यवस्थित पुरवठा करावा या प्रमुख मागण्यांवर चर्चा करण्यात आली. आविका संस्थेच्या समस्या निकाली काढण्यासाठी प्रशासकीय स्तरावर निश्चितपणे पाठपुरावा करण्याचे आश्वासन प्रादेशिक व्यवस्थापक कोटलावार यांनी दिले.

याप्रसंगी सभेला चांगदेव फाये, व्यंकटी नागीलवार, संचालक हेमके, उसेंडी, तलमले यांनी मार्गदर्शन केले.

सभेचे संचालन महेंद्र मेश्राम यांनी तर आभारप्रदर्शन हेमंत शेंदरे यांनी केले.

Web Title: Discussion on various issues in the meeting of AVICA office bearers and managers