शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

चाैकाचाैकात एक्झिट पाेलची चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 04:33 IST

वैरागड : आरमाेरी तालुक्यासह गडचिराेली जिल्ह्याच्या सहा तालुक्यांतील १७० ग्रामपंचायतींमध्ये मतदान प्रक्रिया १५ जानेवारीला पार पडली. आता चौकाचौकात जय-पराजयाची ...

वैरागड : आरमाेरी तालुक्यासह गडचिराेली जिल्ह्याच्या सहा तालुक्यांतील १७० ग्रामपंचायतींमध्ये मतदान प्रक्रिया १५ जानेवारीला पार पडली. आता चौकाचौकात जय-पराजयाची चर्चा रंगत असून ज्या वाॅर्डात चुरशीच्या लढती झाल्या. त्या ठिकाणी आपलाच उमेदवार विजयी होणार, असा दावा करीत समर्थकांची चर्चा रंगात आली आहे; पण मतदार आपल्या मताची कमाल दाखवणार आहे.

ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची रंगत हे लोकसभा, विधानसभा निवडणुकापेक्षा अधिक असते. त्याचा परिणाम तालुक्यात झालेल्या मतदानाची टक्केवारी दर्शवते. वैरागड येथे सर्व मतदान केंद्रावर सकाळपासूनच मतदानासाठी मतदारांच्या रांगा लागल्या होत्या ते मतदान संपेपर्यंत रांगा कायम होत्या. आरमोरी तालुक्यातील मोहझरी, कुरंडी या दोन ग्रामपंचायतींची निवडणूक बिनविरोध झाली. इतर ठिकाणी चुरशीच्या लढती झाल्या. आता जय- पराजयाच्या खमंग चर्चा चौकात, हॉटेल, पानटपरीवर जोरात सुरू आहेत. प्रत्येक कार्यकर्ता आपला उमेदवार कसा निवडून येणार आहे, कोणत्या वाॅर्डात किती पैसा आणि दारू वाटली याची अपडेट माहिती खुलेआम देत आहे.

आता मतदार सुज्ञ झाला असून पैसा आणि चिवडा घेऊन आपले अमूल्य मत कोणाला विकत नाही, योग्य उमेदवाराची निवड करून गावाचा विकास व्हावा, अशी मतदारांची अपेक्षा असते. २२ तारखेला मतपेटीतून मतदारांचा कल व्यक्त होणार आहे. तोपर्यंत तरी जय- पराजयाच्या खमंग चर्चेने चांगलेच मनोरंजन होत आहे.