शहरं
Join us  
Trending Stories
1
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
2
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
5
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
6
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
7
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
8
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
9
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
10
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
11
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
12
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
13
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
14
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
15
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
16
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
17
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
18
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
19
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
20
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
Daily Top 2Weekly Top 5

वडसा रेल्वेस्टेशनचे डिजिटलायझेशन

By admin | Updated: September 12, 2016 02:07 IST

गडचिरोली जिल्ह्यातील एकमेव असलेल्या वडसा रेल्वे स्थानकाने आधुनिकीकरणात कात टाकली आहे.

सुरक्षेत वाढ : वेळेचीही होणार बचत;रेल्वेगाडी आवागमनासंदर्भात आधुनिकीकरणदेसाईगंज : गडचिरोली जिल्ह्यातील एकमेव असलेल्या वडसा रेल्वे स्थानकाने आधुनिकीकरणात कात टाकली आहे. वडसा रेल्वे स्टेशनचे डिजिटलायझेशन झाल्याने येथील रेल्वेगाडी आवागमनाच्या सुरक्षेत वाढ झाली आहे. शिवाय रेल्वेस्थानकाच्या कामकाजाच्या वेळेतही बचत होणार आहे. बदलत्या तंत्रज्ञानासह वडसा रेल्वे स्थानकाने आधुनिक तंत्रज्ञानाचा अंगिकार केला आहे. देसाईगंज येथील रेल्वे स्थानक वडसा रेल्वेस्टेशन म्हणून ओळखले जाते. इंग्रजांच्या कार्यकाळापासून अस्तित्त्वात असलेल्या वडसा रेल्वे स्टेशनवरील संपूर्ण रेल्वे आवागमन वाहतूक मॅन्युअल होती. रस्ता रहदारीवरील गेट पाडणे, दोन रेल्वे गाडीची क्रासिंग, रेल्वेगाडी आवागमनासाठी देण्यात येणारे सिग्नल यासाठी टोकण प्रणाली कार्यान्वित होती. सदर प्रणाली किचकट व क्लिष्ट होती. यात वेळेचा अपव्यय तसेच असुरक्षिता निर्माण होत होती. तेव्हा पासून आतापर्यंत हीच कार्यपद्धती अवलंबिल्या जात होती. दरम्यान वडसा रेल्वे स्टेशनचे आधुनिकीकरण करण्याबाबत वडसा रेल्वे सलागार समितीने खा. अशोक नेते यांना तसेच दक्षिण पूर्व मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापकांना तसेच केंद्रीय रेल्वे मंत्र्यांकडे वारंवार पाठपुरावा केलेला होता. वडसा रेल्वे स्टेशनची डिजिटल कार्यपद्धती अधीक्षक पी. एस. भोंडे, वरिष्ठ स्टेशन मास्टर संजय कुमार, कनिष्ठ स्टेशन मास्टर रितेश कुमार हाताळत आहेत. (तालुका प्रतिनिधी)संगणकीकरणाने कामात गतिशीलतावडसा रेल्वे स्टेशनवर रेल्वेगाडी आवागमनसंदर्भात आमूलाग्र बदल होऊन मॅन्युअल पद्धती संपुष्टात आणून कम्पूटराईज झाला असून रेल्वे स्टेशन डिजिटल झाले आहे. यात दोन गाडीची क्रासिंगच्या दरम्यान कमीतकमी १० ते २० मिनिटांची बचत होत असून सोबतच सुरक्षितेत वाढ होणार आहे. पूर्वी सिग्नल सिस्टिममध्ये बिघाड आल्यास रेल्वेगाडीला रेल्वे स्थानकावर आगमन होण्यास फारच विलंब होत होता. मात्र आता संपूर्ण कार्यपद्धती डिजिटल होऊन कम्पूटराईज झाल्याने आता वैकल्पिक सिग्नलची व्यवस्था केल्याने वेळेचा अपव्यय थांबून बचत होणार आहे. तसेच इंग्रजांच्या कार्यकाळापासून प्रचलित कार्यपद्धतीत रस्ता रहदारीवरील गेट पाडण्यासाठी जवळ पास तब्बल २० ते २५ मिनिटे लागत होती. व वाहतूक ठप्प होत होती. आता डिजिटल झाल्याने १० ते १५ मिनीटे लागणार आहेत.