शहरं
Join us  
Trending Stories
1
सोन्यासंदर्भात सरकारचा आणखी एक मोठा निर्णय! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं खरेदी टाळण्याचं आवाहन 
2
अरविंद केजरीवाल यांच्यासह ‘आप’च्या ५ नेत्यांच्या अडचणी वाढल्या; ‘या’ प्रकरणात खटला चालणार
3
अमेरिका इराण तणावामध्ये भारतासाठी चांगली बातमी, २ LPG टँकर्स 'होर्मुझ' पार करून पुढे निघाले!
4
Jasprit Bumrah : १३ वर्षांचा प्रवास; जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार! हार्दिक पांड्याचा विषय संपला?
5
‘एल-निनो’चा संभाव्य धोका, खरीप हंगामासाठी आवश्यक सज्जता ठेवा: शिवेंद्रसिंहराजे भोसले
6
ह्युंडाई स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणणार, काय काय फीचर्स असणार? टाटा पंच EV सह या कारना देणार टक्कर
7
जबरदस्त! १३८० किमी धावणार अन् तीन चाकांवरही पळणार! 'ही' नवी हायटेक इलेक्ट्रिक कार ऑटो विश्वात धुमाकूळ घालणार?
8
रशियाचे परराष्ट्र मंत्री PM मोदींना भेटले; तेल संकट, युक्रेन, परस्पर संबंध वाढवण्यावर चर्चा
9
देशातील परिस्थिती गंभीर, सर्वपक्षीय बैठक बोलवा, त्यात पंतप्रधानांनी हजर राहावे- शरद पवार
10
ममता बॅनर्जी खरंच वकील आहेत का, कागदपत्र सादर करा; बार कौन्सिलचे निर्देश, झाले तरी काय?
11
Vaibhav Suryavanshi In India A Squad : वैभव सूर्यवंशीला BCCI चं मोठं गिफ्ट; भारतीय ‘अ’ संघात निवड
12
Top Marathi News Live Updates: राष्ट्रवादी अजितदादा गटाला सोडचिठ्ठी देणारे आनंद परांजपे शिंदेंच्या शिवसेनेत जाणार
13
CM देवेंद्र फडणवीसांनी चालवलेली बुलेट कुणाची? PUC वरून काँग्रेस-भाजपात का जुंपली?
14
PM मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद, अग्रगण्य कंपनीचा मोठा निर्णय; 'अनावश्यक खर्च' टाळण्यासाठी बनवला मास्टर प्लॅन
15
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
16
HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
17
अंगावर शहारा आणणारी घटना! वादळात टीनशेडसोबत 'नन्हे मियाँ'ही उडाले अन्...; थरार कॅमेऱ्यात कैद -  बघा VIDEO
18
PM मोदींच्या आवाहनाला गडकरींचाही प्रतिसाद, बसने प्रवास करत केली पालखी महामार्गाच्या कामांची पाहणी; दौरा सुरू असतानाच...
19
PBKS vs MI : भावा कसा आहेस? रोहित शर्मा-श्रेयस अय्यरचा व्हिडिओ पाहिलात का?
20
Raj Thackeray : “२२ लाख मुलांचं आणि त्यांच्या कुटुंबीयांचं आयुष्य टांगणीला लागलं त्याचं काय?”, राज ठाकरेंचा सवाल
Daily Top 2Weekly Top 5

डायल १०८ ने २ हजार ८०० रूग्णांना नवसंजीवनी

By admin | Updated: July 7, 2015 01:16 IST

१०८ क्रमांकाच्या रूग्नवाहिकेने घटनास्थळी तत्काळ पोहोचून वर्षभरात सुमारे २ हजार ८१५ रूग्णांना रूग्णालयात पोहोचवून त्यांचे प्राण वाचविले आहे.

मोफत सेवा : जिल्ह्यात आठ रूग्णवाहिका कार्यरत
दिगांबर जवादे गडचिरोली
१०८ क्रमांकाच्या रूग्नवाहिकेने घटनास्थळी तत्काळ पोहोचून वर्षभरात सुमारे २ हजार ८१५ रूग्णांना रूग्णालयात पोहोचवून त्यांचे प्राण वाचविले आहे.
देशाची ५० टक्के पेक्षा अधिक लोकसंख्या ग्रामीण भागात राहते. या भागात एखादी दुर्घटना किंवा आपातकालीन परिस्थिती निर्माण झाल्यास वेळेवर रूग्णांना किंवा जखमी नागरिकाला तत्काळ रूग्णालयात दाखल करता यावे, यासाठी राज्य शासनाने मोफत रूग्णवाहिका उपलब्ध करून दिली आहे. मोबाईल किंवा लँडलाईनवरून १०८ क्रमांक डायल केल्यानंतर या सेवेचा लाभ घेता येत असल्याने या रूग्णवाहिकेला १०८ क्रमांकाची रूग्णवाहिका असे संबोधले जाते. गडचिरोली जिल्ह्यात या सेवेचा शुभारंभ ६ मे २०१४ रोजी झाला. सद्य:स्थितीत गडचिरोली जिल्ह्यात कुरखेडा, अहेरी उपजिल्हा रूग्णालय, सिरोंचा, कोरची, भामरागड, एटापल्ली, मुलचेरा ग्रामीण रूग्णालय व गडचिरोली जिल्हा रूग्णालय अशा आठ ठिकाणी रूग्णवाहिका उपलब्ध आहेत. वर्षभराच्या कालावधीत सुमारे २ हजार ८१५ रूग्णांना जवळपासच्या रूग्णालयात वेळीच दाखल करून त्यांचे प्राण वाचविले आहे. गरीब रूग्णांकडे वेळेवर पैसेही राहत नाही. अशा परिस्थितीत वाहनाचे भाडे देण्याचा प्रश्न निर्माण होत होता. मात्र १०८ क्रमांकाची रूग्णवाहिका अगदी मोफत व घरापासून सुविधा उपलब्ध करून देत असल्याने जिल्ह्यातील नागरिकांसाठी विशेष सोयीचे झाले आहे.

अशी चालते रूग्णवाहिकेची यंत्रणा
१०८ क्रमांकाच्या रूग्णवाहिकेत अत्याधुनिक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या रूग्णवाहिकेसाठी स्वतंत्र डॉक्टर नेमण्यात आला आहे. रूग्णवाहिकेचा लाभ घेण्यासाठी मोबाईल किंवा दूरध्वनीवरून १०८ क्रमांक डायल केल्यानंतर सदर फोन या रूग्णवाहिका सेवेचे मुख्य केंद्र असलेल्या पुणे येथे लागतो. या कार्यालयाच्या मार्फतीने रूग्णाचा पत्ता विचारल्यानंतर जवळपासची रूग्णवाहिका तत्काळ त्या ठिकाणी पाठविण्यात येते. विशेष म्हणजे, ही संपूर्ण सेवा मोफत आहे.

१०० महिलांची रूग्णवाहिकेतच प्रसूती
या रूग्णवाहिकेचा लाभ गरोदर मातानाही दिला जातो. वर्षभराच्या कालावधीत जवळपास १०० महिलांची रूग्णवाहिकेतच प्रसूती झाली असल्याची माहिती रूग्णवाहिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. या रूग्णवाहिकेत प्रशिक्षित डॉक्टर राहत असल्याने माता व नवजात बालकांचे प्राण वाचले आहे.

यासाठी दिला जातो लाभ
रस्त्यावरील अपघात, सर्पदंश, हृदय विकाराचा झटका, प्रसूतीची गुंतागुंत, भूकंप, जीर्ण आजार, मलेरिया, साथीचे रोग व डोक्याला मार लागणे यासाठी सदर रूग्णवाहिका उपलब्ध करून दिली जाते.