शहरं
Join us  
Trending Stories
1
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
2
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
3
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
4
CSK ची नवी चाल! मुंबईकर आयुष म्हात्रेच्या जागी MI च्या माजी खेळाडूला मिळाली वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
उल्हासनगरात महापौरांचा पती भाजपच्या टार्गेटवर? आयुक्तांकडे महापौर पतीला एन्ट्री दिल्यावरून भाजपा नगरसेवकांचा धिंगाणा 
6
"झालमुडी मी खाल्ली अन् मिरची... ४ मे रोजी मिठाई वाटणार!"; पश्चिम बंगालमध्ये मोदींचा मोठा दावा, ममतांवर निशाणा
7
नवरीचा अजब निर्णय! लग्नाला नकार, सासरी जाण्याऐवजी मैत्रिणीसोबत जाण्यावर ठाम; पोलीसही चक्रावले
8
स्कोडाची ८-स्पीड गिअर बॉक्सवाली कुशाक...! तोच घाट, मायलेजवर काय फरक पडला? धक्का दिला की...
9
Video: सशस्त्र जवान, मॉस्किटो फ्लीट; 'होर्मुझ'मध्ये थरार, भारताचे जहाज इराणच्या लष्कराने कसे घेतले ताब्यात, पहा व्हिडीओ 
10
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
11
"ज्या राज्याचे उपमुख्यमंत्री विमान अपघातात जातात, त्याचा..."; सुप्रिया सुळेंचे सूचक विधान
12
Ganga Saptami 2026: पितरांना सद्गती मिळावी म्हणून आजच्या तिथीला आठवणीने म्हणा 'हा' श्लोक!
13
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
14
अमराठी वाहनचालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी साहित्यिकांचा पुढाकार- मंत्री प्रताप सरनाईक
15
Gen Z कडून 'जशास तसं' उत्तर; कामाच्या ठिकाणी 'सिनियर्स'वर विश्वासच नाही, वाटतात अकार्यक्षम
16
पत्नीचे फिट राहणे पतीला आवडले नाही; जिमला जाण्यावरून झाला वाद, चिडलेल्या नवऱ्याने बायकोला संपवले अन्.. 
17
लग्नाच्या १३ वर्षांनी मोडणार टीव्ही अभिनेत्रीचा संसार? पदरात १० वर्षांचा मुलगा, म्हणाली- "मला ड्रामा नकोय..."
18
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
19
सीझफायर कसा वाढवला...! इराणी दूतावासाकडून 'AI' फिरकी; Video केला व्हायरल
20
भारत बनला जगातील ६ वा सर्वात श्रीमंत देश; १९,८७७ जण अल्ट्रा रिच लिस्टमध्ये, 'या' शहरात सर्वाधिक श्रीमंत
Daily Top 2Weekly Top 5

खासगी लेआऊटचा पालिकेच्या निधीतून विकास

By admin | Updated: September 2, 2016 01:13 IST

जिल्ह्यातील सर्वात जुनी नगर पालिका असलेल्या देसाईगंज नगर पालिकेत खासगी लेआऊटधारकांनी टाकलेल्या व घरांचे बांधकाम न झालेल्या मोकळ्या

जिल्हाधिकाऱ्यांकडे चौकशीची मागणी : देसाईगंज नगरपालिकेतील प्रकरणगडचिरोली : जिल्ह्यातील सर्वात जुनी नगर पालिका असलेल्या देसाईगंज नगर पालिकेत खासगी लेआऊटधारकांनी टाकलेल्या व घरांचे बांधकाम न झालेल्या मोकळ्या लेआऊटमध्ये पालिकेचा निधी वापरून मोठ्या प्रमाणावर लेआऊट डेव्हलपमेंटचे काम करण्यात आले. याचा मोठा फायदा खासगी लेआऊटधारकांना झाला, असा गंभीर प्रकार उजेडात आला आहे. याबाबत देसाईगंजच्या काही नगरसेवकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करून या प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी केली आहे. यामुळे पालिकेच्या सत्ताधारी वर्तुळातही प्रचंड खळबळ उडाली आहे.देसाईगंज नगर पालिकेच्या अंतर्गत विर्शी वार्ड, आंबेडकर वार्ड, गौतम नगर, जुना भंडारी लेआऊट आदी परिसरात विशेष रस्ता अनुदानातून जवळजवळ १६ लक्ष रूपये खर्च करून रस्ता खडीकरणाचे काम करण्यात आले. हे सर्व लेआऊट एका खासगी भूखंडधारकाने निर्माण केलेले आहे. या परिसरात घरांचे बांधकामही अत्यल्प प्रमाणात आहे, असे असतानाही या ठिकाणी रस्ते, नाल्या यांचे बांधकाम करण्यात आले. आंबेडकर वार्ड, गौतम नगर येथे २५ लाख रूपयातून खडीकरणाचे काम करण्यात आले. शहर व गावाच्या परिसरात लेआऊट टाकणाऱ्या बिल्डर किंवा प्लॉट विक्रेत्यास लेआऊट डेव्हलपमेंटचे काम करून द्यावे लागते. मात्र देसाईगंज नगर पालिकेच्या हद्दीत पालिकेनेच हे काम केले आहे. यासाठी सरकारचा निधी वापरला व भूमाफियांना मोठ्या प्रमाणावर फायदा या माध्यमातून पोहोचविण्यात आला, अशी गंभीर तक्रार करण्यात आली आहे. या प्रकरणी चौकशीची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली. (जिल्हा प्रतिनिधी)जी कामे देसाईगंज नगर पालिकेतंर्गत करण्यात आली. त्यात कुठेही अनियमितता झालेली नाही. ज्या लेआऊटमध्ये विकासकामे करण्यात आली. त्यांच्याकडून डेव्हलपमेंट चार्जेस नगर पालिकेने घेतलेले आहे. बैठकीत याबाबत ठराव पारित झाले. हे शहराचे जुने लेआऊट आहे. तेथे विकासकामे करून देण्यात आले. जिल्हाधिकारी महोदयांच्या नियंत्रणात सर्व काम चालते. त्यामुळे या संबंधिचे आरोप चुकीचे आहे. सर्व काम कायदेशीर बाबींची पूर्तता करूनच करण्यात आले. - तैमूर मुलानी, मुख्याधिकारी, नगर परिषद देसाईगंजदलित वस्तीचा निधीही इतरत्र खर्चदलित वस्ती विकास योजनेसाठी शासनाने मंजूर केलेला निधी दलित वस्तीत खर्च न करता बिगर दलित वस्त्यांमध्ये पळविण्यात आला आहे. नगर परिषदेने कायदा धाब्यावर बसविला असून या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी माजी नगरसेवक प्रकाश सांगोळे, भीमराव नगराळे, मंगेश शेंडे, क्षीरसागर शेंडे, अभय वासणिक, आशिष शेंडे यांनी सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांच्याकडे केली आहे. अरूण सहारे देसाईगंज ते जयराम राऊत जुनी वडसा रस्ता खडीकरण, मजबुतीकरण व डांबरीकरण करण्यास नगर परिषदेने तांत्रिक मान्यता दिली व यासाठी ५३ लाख ३५ हजार १०० रूपयांचा दलित वस्ती सुधार योजनेचा निधी हे पूर्णत: बेकायदेशिर आहे. या ठिकाणी अनुसूचित जातीच्या एकाही नागरिकाचे घर नाही. दलित वस्ती निधी पळविण्याचे प्रकार देसाईगंज नगर परिषदेत वाढले आहेत, असे या निवेदनात म्हटले आहे.