शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
2
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
3
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
4
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
5
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
6
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
7
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
8
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
9
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
10
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
11
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
12
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
13
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
14
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
15
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
16
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
17
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
18
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
19
‘धुरंधर’चा वाद सामंजस्याने सोडवावा, दिग्दर्शक आदित्य धर, निर्मात संतोष कुमार यांना उच्च न्यायालयाच्या सूचना
20
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
Daily Top 2Weekly Top 5

वाहनाच्या धडकेत पाच दुकाने उद्ध्वस्त

By admin | Updated: April 1, 2016 01:47 IST

देसाईगंजवरून गडचिरोलीकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या अज्ञात वाहनाने जुना बसस्थानक परिसरातील रस्त्याच्या बाजुला असलेली फुटपाथवरील दुकानांना धडक

लाखो रूपयांचे नुकसान : वाहनचालक वाहनासह झाला पसारआरमोरी : देसाईगंजवरून गडचिरोलीकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या अज्ञात वाहनाने जुना बसस्थानक परिसरातील रस्त्याच्या बाजुला असलेली फुटपाथवरील दुकानांना धडक दिल्याने पाच दुकाने उद्ध्वस्त झाली. यामध्ये दुकानदारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आरमोरी जुना बसस्थानकाजवळ मुख्य मार्गाच्या बाजुला अनेक व्यावसायिकांनी दुकाने थाटली आहेत. रात्री आपली दुकाने बंद करून गेले असता, बुधवारी रात्रीच्या सुमारास गडचिरोलीकडे जाणाऱ्या वाहनचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यामुळे वाहन रस्त्याच्या बाजुला गेले. वाहनाच्या धडकेत पाच दुकानांचा चुराडा झाला. वाहन चालक मात्र वाहन घेऊन पसार झाला. त्यामुळे नेमक्या कोणत्या वाहनाने हे नुकसान केले. हे अजूनपर्यंत स्पष्ट झालेले नाही. यामध्ये दुकानदारांचे लाखो रूपयांचे नुकसान झाले. नुकसान झालेल्या दुकानांमध्ये युवा सेनेचे शहर प्रमुख विनोद निखुरे यांचा बुट हाऊस, योगेश धकाते यांचा पान सेंटर, प्रफुल कोल्हे यांचा भाजीपुरीचा दुकान, राजू जुआरे यांचा स्वीट मार्ट व गणेश लांजेवार यांचा सलुनचे दुकान उद्ध्वस्त केले. याबाबतची तक्रार आरमोरी पोलीस स्टेशनमध्ये देण्यात आली आहे. या मार्गावर दिवसभर नेहमीच वाहनांची वर्दळ राहते. त्यामुळे या ठिकाणी गतिरोधक देण्याची मागणी मागील अनेक दिवसांपासून करण्यात येत आहे. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाचे तसेच ग्रामपंचायतीचे याकडे दुर्लक्ष झाले आहे. परिणामी या परिसरात भरधाव वेगातील वाहनांमुळे अपघातांमध्ये वाढ झाली आहे. (वार्ताहर)