शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
2
तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित
3
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
4
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
5
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
6
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
7
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
8
मराठी अभिनेता झाला जुळ्या मुलांचा बाबा! लग्नाच्या ८ वर्षांनी पाळणा हलला, नावंही ठेवली खूपच खास
9
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
10
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
11
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
12
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वानवा
13
आजारपण अन् आयुष्यभराची कमाई साफ; कुटुंब अडकते वर्षानुवर्षे कर्जाच्या खाईत, मध्यमवर्ग संकटात
14
‘त्यांना’ मराठीची परीक्षा देऊन पदवी घ्यायची नाही; परिवहन मंत्र्यांनी मांडली स्पष्ट भूमिका
15
तुम्ही रिक्षा-टॅक्सीवाल्यांची उपजीविका नष्ट करताय; मराठी सक्तीला शशांक राव यांचा आक्षेप
16
हम ‘आप’ के हैं कौन? सत्तेसाठी पक्ष फोडणे ही प्रवृत्ती लोकशाहीच्या आत्म्याला नख लावणारी
17
महामुंबईतील वॉटर मेट्रोला वेग! २६ टर्मिनल्स उभारणार; शहरांना नवे कनेक्शन, काय बदलणार?
18
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
19
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
20
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
Daily Top 2Weekly Top 5

देसाईगंजचे कारले दुबईत

By admin | Updated: September 6, 2016 00:55 IST

देसाईगंज तालुक्यातील शेतकरी आता नगदी पिकांकडे वळला असून तालुक्याच्या ठिकाणी दररोज परिसरातील शेकडो क्विंटल कारल्याचा माल बाजारपेठेत येत आहे.

२० किलोचे पॉकेट बनविले : नागपूरवरून शारजाला होतात रवानादेसाईगंज : देसाईगंज तालुक्यातील शेतकरी आता नगदी पिकांकडे वळला असून तालुक्याच्या ठिकाणी दररोज परिसरातील शेकडो क्विंटल कारल्याचा माल बाजारपेठेत येत आहे. तो नागपूर मार्गे सरळ दुबई येथे रवाना होत असल्याची माहिती ठोक व्यापारी रमेश चुऱ्हे यांनी लोकमतशी बोलताना दिली. सध्या देसाईगंज तालुका भाजीपाला उत्पादनात आघाडीवर असून कोबी हे पीक वगळता इतर सर्व भाजीपाला परिसरातच उत्पादीत होत असल्याने रोज सकाळी ठोक माल विक्रीसाठी परिसरातील शेतकरी सकाळीच बाजारपेठेत दाखल होत आहेत. त्यादृष्टीने सर्वात फायदेशीर पीक म्हणून कारले पिकाकडे बघितले जाते. रबी व खरीप या दोन्ही हंगात कारल्यांचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन होत आहे. दररोज शेकडो क्विंटल कारले बाजारपेठेत येत असून इतर भाजीपाल्यापेक्षा कारल्याला अधिक भाव मिळत असल्याचे शेतकरी सांगतात. आलेला माल ठोक व्यापाऱ्याला विकून तो २० किलो ग्रॅमच्या बॅगमध्ये पॅक करून ट्रकच्या माध्यमातून नागपूर मार्गे दुबईच्या शारजा येथे पाठविला जात आहे, अशी माहिती चुऱ्हे यांनी दिली. नागपूरच्या बाजारपेठेत देसाईगंजच्या कारल्यांना मोठी मागणी असून अतिशय चवदार व स्वादीष्ट कारले म्हणून देसाईगंजचे कारले प्रसिध्द आहेत. (तालुका प्रतिनिधी)सणाच्या तोंडावर भाजीपाल्याची मागणी वाढलीगणेश चतुर्थी व त्यानंतर लगेच येणाऱ्या गौरी पुजन यामुळे सध्या चिल्लर बाजारात भाज्यांची मागणी प्रचंड प्रमाणात वाढली आहे. सणासुदीच्या काळात गडचिरोली येथील गुजरी बाजारात ग्रामीण भागातूनही मोठ्या प्रमाणावर भाजीपाला येतो. तरीही भाव वधारलेलेच आहे. गत आठवड्यापेक्षा काही प्रमाणात दर घसरल्याचे दुकानदार सांगतात.