शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
2
तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित
3
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
4
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
5
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
6
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
7
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
8
मराठी अभिनेता झाला जुळ्या मुलांचा बाबा! लग्नाच्या ८ वर्षांनी पाळणा हलला, नावंही ठेवली खूपच खास
9
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
10
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
11
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
12
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वानवा
13
आजारपण अन् आयुष्यभराची कमाई साफ; कुटुंब अडकते वर्षानुवर्षे कर्जाच्या खाईत, मध्यमवर्ग संकटात
14
‘त्यांना’ मराठीची परीक्षा देऊन पदवी घ्यायची नाही; परिवहन मंत्र्यांनी मांडली स्पष्ट भूमिका
15
तुम्ही रिक्षा-टॅक्सीवाल्यांची उपजीविका नष्ट करताय; मराठी सक्तीला शशांक राव यांचा आक्षेप
16
हम ‘आप’ के हैं कौन? सत्तेसाठी पक्ष फोडणे ही प्रवृत्ती लोकशाहीच्या आत्म्याला नख लावणारी
17
महामुंबईतील वॉटर मेट्रोला वेग! २६ टर्मिनल्स उभारणार; शहरांना नवे कनेक्शन, काय बदलणार?
18
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
19
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
20
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
Daily Top 2Weekly Top 5

भंडाराच्या घटनेने मन सुन्न; पण भीती नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 04:30 IST

गडचिराेली : भंडाराच्या जिल्हा सामान्य रुग्णालयातील शिशू केअर युनिटमध्ये शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास शाॅर्टसर्किटने लागलेल्या आगीत १० बालके मृत्युमुखी पडली. ...

गडचिराेली : भंडाराच्या जिल्हा सामान्य रुग्णालयातील शिशू केअर युनिटमध्ये शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास शाॅर्टसर्किटने लागलेल्या आगीत १० बालके मृत्युमुखी पडली. ही घटना ऐकल्यानंतर मन सुन्न झाले. मात्र, गडचिराेलीच्या रुग्णालयातील काळजीवाहक यंत्रणा व व्यवस्थेमुळे मनात मुळीच भीती नाही, अशी भावना येथील जिल्हा महिला रुग्णालयातील आयसीयूमध्ये बालके असलेल्या प्रसूत मातांनी व्यक्त केली.

गडचिराेली जिल्हा मुख्यालयी १०० बेडचे जिल्हा महिला व बाल रुग्णालय आहे. येथे गडचिराेली, चंद्रपूर व गाेंदिया जिल्ह्यांतील रुग्ण औषधाेपचारासाठी येतात. सद्यस्थितीत या रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये २० बालके औषधाेपचार घेत आहेत. जन्मल्यावर न रडणाऱ्या बालकाला तसेच कमी वजनाच्या बाळाला अतिदक्षता विभागात औषधाेपचारासाठी ठेवले जाते. बाळाच्या प्रकृतीत पूर्णत: सुधारणा हाेईपर्यंत दाेन ते तीन दिवस व त्यापेक्षाही अधिक दिवस येथे ठेवून औषधाेपचार दिला जाताे.

प्रस्तुत प्रतिनिधीने बुधवारी या रुग्णालयाला भेट देऊन प्रसूत मातांशी चर्चा केली. शिवाय, येथील साेयीसुविधांची माहितीही जाणून घेण्यात आली. बुधवारी या रुग्णालयात सर्व मिळून एकूण १३० रुग्ण दाखल हाेते. यामध्ये जवळपास ४० नवजात बालके औषधाेपचार घेत आहेत. या रुग्णालयात वयाच्या १२ वर्षांपर्यंतची मुले व मुलींवर औषधाेपचार केला जाताे. तरुण १८ वर्षांपर्यंतच्या मुलींना तशी समस्या असल्यास त्यांच्यावर औषधाेपचार केला जाताे. या रुग्णालयात २४ तास सुरक्षारक्षक तैनात करण्यात आले आहे. त्यामुळे नातेवाईकही बिनधास्त राहतात.

काेट...

माझ्या बाळाची प्रकृती ठीक नसल्याने त्याला आयसीयूमध्ये औषधाेपचार दिला जात आहे. प्रकृतीत सुधारणा हाेत आहे. येथील डाॅक्टर व नर्स तपासणी करून औषधाेपचार करीत आहेत. यंत्रणेच्या दक्षतेमुळे आधार वाटत आहे.

- रवीना निंबार्ते, प्रसूत माता

काेट...

माझ्या बाळाचे वजन कमी असून, ताे जन्मल्यावर रडला नाही. त्यामुळे त्याला जिल्हा महिला रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये ठेवण्यात आले आहे. सहा दिवस माझा मुलगा सलाइनवर हाेता. आता दूध पित आहे. प्रकृतीत सुधारणा असल्याने भीती नाही. ५ जानेवारीपासून माझा बाळ रुग्णालयात आहे. दिवसा व रात्रीसुद्धा डाॅक्टर, नर्स तसेच इतर कर्मचारी ड्यूटीवर असतात. येथे बाळाची व मातेच्या प्रकृतीची काळजी घेतली जात असल्याने भीती वाटत नाही.

- निशा मानकर, प्रसूत माता

काेट....

महिला रुग्णालयात दरराेज २५ ते ३० गर्भवती महिलांची प्रसूती हाेते. यापैकी कमी वजनाचे व अशक्त असलेल्या पाच ते सहा बाळांना आयसीयूमध्ये ठेवून औषधाेपचार दिला जाताे. सध्या आयसीयूमध्ये २० नवजात बालके आहेत. आयसीयूमध्ये तीन शिफ्टमध्ये डाॅक्टर व कर्मचाऱ्यांची २४ तास ड्यूटी लावली जाते. सकाळी एक डाॅक्टर व चार कर्मचारी, दुपारी व रात्री एक डाॅक्टर व एक नर्स कर्तव्यावर असते. आयसीयू व प्रसूतिपश्चात सर्व बालकांची दरराेज तपासणी केली जाते.

- डाॅ. दीपचंद साेयाम,

वैद्यकीय अधीक्षक, जिल्हा महिला व बालरुग्णालय, गडचिराेली