शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
3
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
4
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
5
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
6
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
7
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
8
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
9
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
10
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
11
Mind Soul: थकवा, ताण की राग? तुमच्या प्रत्येक मानसिक समस्येवर आहे आहे एक सोपा उपाय
12
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
13
भारत-न्यूझीलंडदरम्यान ऐतिहासिक ट्रेड डीलवर शिक्कामोर्तब! ७०% भारतीय सामानांवर ड्युटी नाही, जाणून घ्या
14
टॅक्स बचतीसाठी पत्नीच्या नावे मालमत्ता खरेदी फायद्याची? 'ही' एक गोष्ट तुमच्यासाठी ठरू शकते डोकेदुखी
15
Jara Hatke: शहाळ्याची मलई की गोड पाणी? तुमची निवड कधीच चुकणार नाही; जाणून घ्या सिक्रेट!
16
IPL 2026: अंगक्रिश रघुवंशीने रागाच्या भरात ओलांडली सीमा, BCCIने दिला कठोर कारवाईचा दणका
17
पुढील ५ दिवस देशभरात पावसाचे सावट; ७२ तास तीव्र वादळी वारे वाहणार, हवामान विभागाचा अलर्ट
18
मुंबईत 'त्या' हॉटेलमध्ये भरायचा ‘व्हीआयपी’ दरबार; मनोहरमामाच्या भक्तांची यादी पोलिसांच्या रडारवर
19
'काकी आय लव्ह यू', म्हणणं टवाळखोरांना पडलं महागात, तरुणीने भररस्त्यात शिकवला धडा
20
तेहरानमध्ये भीषण संकट! इंधन टाक्यांच्या स्फोटात ८ कोटी लीटर तेल वाया; राज्यपालांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

देवदातील गावकऱ्यांचा जीवघेणा प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2019 06:00 IST

रेगडी जलाशय दिना नदीवर बांधण्यात आले आहे. सदर जलाशय ओव्हरफ्लो झाल्यानंतर याचे पाणी दिना नदीत सोडले जाते. त्यामुळे ओव्हरफ्लो सुरू असताना दिना नदीच्या पाण्याची पातळी वाढते. देवदावरून रेगडीला जाण्यासाठी दिना नदी ओलांडून जावे लागते.

ठळक मुद्देदिना नदीवर पूलच नाही : एटापल्लीतील अनेक गावकरी करतात या मार्गाचा वापर

लोकमत न्यूज नेटवर्कएटापल्ली : चामोर्शी तालुक्यातील रेगडी जलाशयाजवळ असलेल्या देवदा येथील नागरिकांना रेगडी व पुढचा प्रवास दिना नदीतून करावा लागतो. मात्र या ठिकाणी पूल नसल्याने नागरिक जीव धोक्यात घालून नदीतील पाण्यातून प्रवास करतात.रेगडी जलाशय दिना नदीवर बांधण्यात आले आहे. सदर जलाशय ओव्हरफ्लो झाल्यानंतर याचे पाणी दिना नदीत सोडले जाते. त्यामुळे ओव्हरफ्लो सुरू असताना दिना नदीच्या पाण्याची पातळी वाढते. देवदावरून रेगडीला जाण्यासाठी दिना नदी ओलांडून जावे लागते. एटापल्लीसह परिसरातील अनेक नागरिक सरळ रस्ता म्हणून देवदा मार्गे रेगडी, घोट, चामोर्शीला येतात. त्यामुळे या मार्गावरून कर्मचारी व इतर दुचाकीस्वारांची नेहमीच वर्दळ राहते. काही दुचाकीस्वार नदीतून पाणी वाहत असतानाही वाहन टाकतात. स्थानिक गावकरी १०० रुपये घेऊन दुचाकी वाहन काठ्यांच्या सहाय्याने उचलून दुसºया बाजूला नेऊन देतात. काही नागरिक नदीतून पाणी असतानाही पायदळ प्रवास करतात.सदर मार्ग अतिशय महत्त्वाचा असल्याने नदीवर पूल बांधावे, अशी मागणी देवदासह परिसरातील अनेक नागरिकांनी लोकप्रतिनिधी व प्रशासनाकडे केली आहे. मात्र प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष झाले आहे. उन्हाळा व हिवाळ्यात या नदीत पाणी राहत नाही. मात्र पावसाळ्यात पाणी राहत असल्याने प्रवास धोकादायक आहे.रेगडी जलाशयाने वाढते पाणीपातळीरेगडी जलाशयाचे ओव्हरफ्लोचे पाणी दिना नदीत सोडले जाते. त्यामुळे पावसाळ्यात या नदीतून पाण्याचा प्रवाह अधिक राहतो. तरीही अनेक नागरिक जीव धोक्यात घालून या मार्गावरून प्रवास करतात. त्यामुळे या ठिकाणी पूल बांधण्याची मागणी केली जात आहे. याकडे लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची गरज आहे.

टॅग्स :riverनदीfloodपूर